त्रावनकोर ची झाशीची रानी 'अकम्मा चेरियन'
"मी या सर्वाची नेता आहे, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला मारण्याआधी तुम्हाला मला गोळी मारावी लागेल."
ब्रिटिश कर्नल वाॅटसन यास बेडरपणे आणि निक्षुन सांगणारी तेजस्वी युवती म्हणजेच अकम्मा चेरियन होय.
या मुलीचे धैर्य आणि निडरता पाहुन कर्नल वाॅटसन याला आपला आदेश परत घ्यावा लागला. आणि मोठेच संकट टळले नाही तर कीती जीव नाहक मारले गेले असते.
अकम्मा चेरियन यांचा जन्म 1909 कांजीरपल्ली हे, त्रावणकोर (वर्तमान केरळ) या छोट्या गावात झाला. अकम्मा एक शिक्षिका होत्या. पण शाळेत शिकवत असताना त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले.पाहात होत्या. काही दिवसांनी मग त्यांनी शिक्षिकेची नोकरी सोडून दिली. आणि भारतीय स्वतंत्रता आंदोलनात सक्रीय सहभागी झाल्या. 1938 च्य नंतर केरळमध्ये सविनय कायदेभंग चळवळीचा जन्म झाला. हे आंदोलन केरळमधील पहिले आंदोलन ठरले. म्हणुन या आंदोलनातील कार्यकर्त्याना अटक करण्यात आले. म्हणुन आंदोलनाचे कार्य ठप्प झाले. पण पार्टीचे अध्यक्ष यांना अटक होण्यापूर्वी त्यानी 'अकम्मा चेरियन' यांना आपले उत्तराधिकारी म्हणजे पार्टी अध्यक्ष बनवले. या मुली मधील साहस आणि धैर्य त्यांना पुरेपूर माहित होते.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात
अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्या नंतर अकम्मा नी विशाल रॅलीचे आयोजन केले जिचा उद्देश होता, जेलमध्ये असलेल्या नेत्यांना सोडा. आणि एक जबाबदार सरकार स्यापन करण्याची परवानगी द्या असा होता. अकम्मा या वेळी फक्त 29 वर्षाच्या होत्या. त्यांनी आपल्या आत्मकथेत, "जीवथम: ओरु समारम" (लाईफ :अ प्रोटेस्ट) असे लिहून ठेवले आहे. मला माहिती आहे की या कार्याची गंभीरता , याचे होणारे परिणाम पण तरीही मी हे स्वीकारले आहे. कारण ,मला माझा देश स्वतंत्र झालेला पाहायचा आहे.
बहादूर अकम्मा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विरोध प्रदर्शनात 20,000 पेक्षा जास्त लोक होते. पूर्ण देशातुन या नेतृत्वावर आणि अकम्माच्या या साहसावर लोकांनी स्तुती सुमने उधळली. माहात्मा गांधीजींनी तर या वीर कन्येला 'त्रावणकोर ची झाशीची रानी' असे म्हणुन गौरव केला होता.
या नंतर 1938 नंतर अकम्मा पार्टी द्वारेच 'देश सेविका संघ' (महिला स्वंयं सेवी दल) बांधण्याचे काम सोपवले गेले. या कामासाठी त्यांनी देशभर भ्रमंती केली, अथक परिश्रम घेतले आणि महिलांना या संघामध्ये काम करण्यास प्रेरित केले.
24 डिसेंबर 1939 या वर्षी त्रावणकोर येथील वार्षिक राज्य काँग्रेस संमेलनामध्ये सहभाग नोंदवला. याच साठी इंग्रज सरकारने त्यांना एक वर्ष कारावास ही सजा दिली. या करिता जेलमध्ये पाठवले. जेल मध्ये ठेवल्या नंतर त्यांचा मानसिक तोल जावुन खच्चीकरण व्हावे यासाठी त्यांना त्रास दिला गेला होता. शाब्दिक मारानेही घायाळ केले जाई. पण अकम्माला या सर्वाचा तसुभर ही फरक पडला नाही. त्या अधिकाधिक मजबुत बनत गेल्या.
जेल मधुन सुटल्यावर त्यांनी आपला पुर्ण वेळ पार्टीसाठी खर्च करायचे ठरवले. आणि पार्टीचे अध्यक्ष पद त्यांनी स्विकारले.
वेळोवेळी त्यांना अटक होत होती. पण त्यांनी देशसेवेचे कार्य चालुच ठेवले. काही दिवसांनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या विधान सभेत निवडुन ही आल्या.
राजकारणात काही काळ काम करुन ते सोडून दिले.
पुढे त्यांनी आत्मकथा लिहीली, त्यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, शेक्सपिअर च्या नजरेतुन दुनिया एक रंगमंच आहे, सर्व माणसे अर्थात स्त्रिया आणि पुरुष दोन्ही ही एक कलाकार आहेत. त्यांना दिलेली म्हणा किंवा वाट्याला आलेली पात्रे ती जगत असतात. पण माझे जीवन म्हणजे, एक विरोधच आहे. तो म्हणजे रुढीवाद, अर्थहीन कर्मकांड, सामाजिक अन्याय, भेदभाव या विरुद्ध मला प्रंचड चिड आहे.
या धीरोदात्त आणि साहसी अकम्मा चा 5 मे 1982 ला मृत्यू झाला.
या वीर क्रांतिकारक वीरांगणेला शत शत नमन.
🇮🇳🇮🇳 वन्दे मातरम ,वन्दे मातरम.🇮🇳🇮🇳
- सौ. शुभांगी सुहास जुजगर
0 टिप्पण्या