गोष्ट गणुची...
गणिताचा तास संपला.. आणि मधली सुट्टी झाली.. म्हणून सगळी मुलं वर्गाबाहेर पडली.. गणुही त्याच्या मित्रां बरोबर बाहेर आला.. त्यानंतर एका झाडाखाली बसून त्यांनी डबा खाल्ला शाळा भरण्यासाठी वेळ आहे.. म्हणून त्याला वाटले आपण एक चक्कर मारून यावी..
गणेश हा इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी.. अभ्यासात पहिल्या पाचात येणारा.. त्याचं गाव तसं शहर नाही पण सुस्थितीत.. त्यामुळे शाळेच्या व्यतिरिक्त अवांतर ज्ञानही भरपूर होतं.. अभ्यासा व्यतिरिक्त इतर वाचनही करायला त्याला खूप आवडत होते..रविवारचे पेपर मधील 'मुलांचे पान' हे तर तो आवर्जून वाचत असे.. त्यामधील 'बालकथा' हा भाग त्याच्या विशेष आवडीचा.. घरात वडील सर्विसला होते.. आई गृहिणी होती.. त्याला एक छोटी बहिणी होती..
गणूची शाळा दहावीपर्यंत असलेली होती.. गावातील मोठ्या रोड जवळ ही होती.. त्या रोडवरून सर्वच वाहन येत आणि जात असत.. रोडला लागून छोट्या मोठ्या दुकानाही होत्या.. त्यामुळे त्या रोडवर नेहमी वाहने उभी असायची.. काही प्रवासी पाणी पिण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी येथे उतरायचे..
त्यामुळे गणूलाही वाटले.. आपणही एक चक्कर मारून यावी.. तो त्याच्या मित्रांना म्हणाला, पण त्यांनी नकार दिल्यामुळे तो एकटाच निघाला.. शाळेपासून थोडंपुढे आल्यावर त्याला तिथे एक जीप उभी दिसते.. मोठा रोड असल्यामुळे त्यालाहेही नवीन नव्हते.. तो जीप जवळून जात असता.. एका व्यक्तीने त्याला हाक मारली.. त्या व्यक्तीला, याला काहीतरी बोलायचे म्हणून..त्याने "
हा रस्ता इकडे कुठे जातो? आम्ही येथे नवीन आहोत?" जीप जवळ उभे असलेल्या तीन जणांपैकी एकाने विचारले..गणुने सहज सांगण्यास सुरुवात केली.. तो सांगत असताना त्याच्या मागे एक जण येऊन उभा राहिला.. व त्याने त्याच्या नाकासमोर स्प्रे मारला.. त्यामुळे त्याला लगेच ग्लानी आल्यासारखी झाले.. आणि त्याला काय होत आहे काहीच कळाले नाही..त्याला त्या तिघांनी उचलून जीपमध्ये टाकले.. भरधाव वेगाने त्यांनी गाव सोडले.. जीपचा वेग हवेची स्पर्धा करत होता.. एक जण गाडी चालवत होता. बाकी दोघेजण गणू जवळ बसलेले होते.. त्यांनी गणूला पोत्यात भरले व पोते बांधून टाकले.. गणू मात्र बेशुद्ध अवस्थेत होता..
शाळेची घंटा झाली.. सर्व मुलं आपापल्या वर्गात जाऊन बसली.. गणूची वाट पाहून, पाहून त्याचे मित्रही वर्गात येऊन बसले.. सोबत त्याचे दप्तरही ते घेऊन आले.. नेहमीप्रमाणे तास सुरू झाला.. शिक्षक येऊन
शिकवू लागले.. पण गणूचे मित्र मात्र बेचैन होते.. दहा मिनिट झाले.. पंधरा मिनिट झाले.. असं करता करता पूर्ण तासही संपला.. तरी पण तो आला नाही.. त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं?? एवढेच नव्हे तर पूर्ण तासभर त्यांचे शिकवण्याकडे लक्ष ही नव्हते.. तास संपल्यानंतर एकाने हे सरांच्या कानावर घालायचे ठरवले.. व तो लगेच उठून सरांकडे आला.. व त्यांना म्हणाला,
"सर.!" त्याच्या ह्या उच्चारात भीती जाणवत होती..
"काय! काही समजलं नाही का तुला?" सरांनी विचारले.
"नाही.. तो गणू अजून आलेला नाही.."
काळजीयुक्त स्वरात तो म्हणाला.
"कुठे गेला?" सरांनी जरा घुश्यातच विचारले. "सर, तो जरा चक्कर मारून येतो. असं सांगून गेला.. तो अजून आलेलाच नाही."
त्यांने एका दमात सर्व सांगून टाकले. मग सरांनी वर्गातील सर्व मुलांकडे गणुची चौकशी केली.. आणि वर्गातील काही मुलांना त्याला शोधण्यासाठी पाठवले..
थोड्या वेळानंतर सगळ्या ठिकाणी शोधून मुलं परत आली पण कुणालाही तो कुठेच सापडला नाही..
इकडे, गाडीत गणु हळूहळू शुद्धीवर येऊ लागला.. शुद्धीवर आल्यानंतर तो ज्या अवस्थेत होता.. ते पाहून तो खुपचं घाबरून गेला.. आपल्याला एका पोत्यात कोबलेलं आहे.. असं त्याच्या लक्षात आले आणि विशेष म्हणजे आपण प्रवासही करत आहोत.. हेही त्याच्या लक्षात आले.. पण! मी इथे कसा? असा प्रश्न त्याला पडला हळूहळू सर्व चित्र त्याच्या डोळ्यासमोर आले.. तसा तो समजदार आणि प्रसंगावधानी होता.. आता आपली यातून सुटका कशी? त्या दृष्टीने तो विचार करू लागला..
शाळा सुटेपर्यंत मुलांचा शोध चालूच होता.. कुणालाच कुठेही गणु सापडला नाही.. सर्व शिक्षक मंडळी शाळेतच थांबली होती.. कोणीच घरी गेले नव्हते..
निम्म्यापेक्षा अधिक मुले सुद्धा शाळेतच थांबली होती.. गणु कुठे गेला असेल? सगळ्यांसमोरच हा प्रश्न दत्त म्हणून उभा राहिला होता.. त्याच्या काही मित्रांनी त्याच्या घरी जाऊन
त्याच्या आईला ही बातमी सांगितली होती.. वडील घरी नव्हते म्हणून त्याची आई लगेच शाळेत यायला निघाली.. रस्त्याने तिच्या मनात नाही नाही ते विचार यायला लागले होते.. गणूची निरनिराळी चित्र तिच्या डोळ्यासमोरून पटापट सरकू लागले.. खोडकर म्हणून.. हट्टी म्हणून.. तो एवढा मोठा झाला तरी त्याची बरीच काम हिलाच करावी लागत होती.. घरात त्याचे तिच्या वाचून पानही हलत नसते.. शाळेच्या सगळ्या रस्त्याने तिचे डोळे त्यालाच शोधत होते… जणू तिचा सारा प्राण डोळ्यात एकवटला होता त्याला पाहण्यासाठी!!
शाळेत पोहोचल्यानंतर तिने सगळ्यांना विचारले," कुठे माझा मुलगा? असा अचानक तो कसा गायब झाला" पण कोणाजवळही त्याचे उत्तर नव्हते.. सगळेजण चुपचाप बसलेले होते.. आईच मन !! आतापर्यंत डोळ्यांमध्ये रोखून झालेले अश्रू पटापट डोळ्यातून बाहेर ओघळले..शिक्षकांमध्ये दोन तीन शिक्षीका आहेत.. त्या त्यांचे सांत्वन करू लागल्या.. हे चित्र पाहून त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले होते.. आईच्या ममतेचा कधीच कुणाला ठाव लागत नाही.. तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे पडत होत.. त्यापैकी काही सांगत होते "पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायला हवी." बऱ्याच जणांचे यावर एकमत झाले पण आमुचे वडील येईपर्यंत थांबायचं असं ठरलं..
जीप जसजशी पुढे जात होती.. तसे तसे गणूचे विचार चक्र सुरू होते.. त्याने आपले हात हळूहळू सोडवायला सुरूवात केली..
त्याच्याजवळ आता तिघांपैकी त्याला कोणीच दिसत नव्हते.. पोत्याच्या बारीक बारीक छिद्रातून तो पहात होता.. पण जीपचे मागचे दार मात्र बंद असल्यामुळे जरा अवघडच झाले होते.. त्यांनी खूप प्रयत्न केला दार उघडण्याचा पण त्याला ते उघडले नव्हते.. त्यामुळे पोत्यासकट खाली उडी मारण्याच्या बेतावर त्याला पाणी सोडावे लागले होते.. एका क्षणी त्याला वाटले आपल्याजवळ अशी जादूची कांडी वगैरे असती तर आपण एका क्षणात या पोत्यातून बाहेर पडलो असतो.. अशातच त्याला वाटले गाडीतील माणसांची बोलणे तरी ऐकूया असं म्हणून त्याने का टवकारले.
"अच्छा माल है. बहुत पैसे मिलेंगे." असं होय म्हणजे मला विकायला घेऊन चाललेत असं तो मनातल्या मनात म्हणू लागला.. "यार अपना गाव तो बहुत दूर है. चलो कुछ खा पी लेते है.."
यावर सगळ्यांचे एकमत होतो आणि ते कुठेतरी गाडी थांबवून उतरायचं ठरवतात असं ऐकल्यावर गणूच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो ही आपल्याला सुटण्यासाठी नामी संधी आहे ही संधी जर का मी गमावली तर आपली यामधून सुटका होणे फारच कठीण आहे.. असे त्याला वाटले होते हात त्यानी हळूहळू सोडवले होते.. पोटत्याची तोंडही तो सोडण्याचा प्रयत्न करू लागला.. खिशात पेनाशिवाय काहीच नव्हते गणूचे नशीब आणि प्रयत्नांची जोड यावर त्याची सुटका अवलंबून होती ...
इकडे -
काही वेळानंतर गणुचे वडील आले.. झालेला प्रकार सर्व त्यांच्या कानावर घातला.. त्यानंतर गावातील काही प्रतिष्ठित मंडळी पण तिथे आली.. गणुची ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.. पोलिसांना तेथे बोलवण्यात आले.. झाल्या प्रकाराचे व्यवस्थित वर्णन त्यांना सांगण्यात आले.. मुलाचे वर्णन त्यांना सांगितले.. तसे त्यांनी तपास कार्य हाती घेतले..
त्यानंतर गणुची आई घरी आली.. आपल्या दुःखाच्या वेळी सर्वात जवळची जी व्यक्ती असते ती म्हणजे देव.. म्हणून तिने श्री गणेशाला पाण्यात ठेवायचे ठरवले.. म्हणुन देव्हाऱ्यातल्या गणपतीला साकडे घातले आणि पाण्यात ठेवले.. "जोपर्यंत माझा गणु घरात येत नाही, तोपर्यंत तुला पाण्यातच राहावे लागेल." असं म्हणून ती देवापुढेच सुन्न मनाने बसून राहिली..
पंधरा-वीस मिनिटानंतर एक गाव येते.. गाव बरेच मोठे होते. म्हणून ते गाडी एका साईडला उभी करून खाली उतरतात तिघेही. पण.. उतरण्यापूर्वी मागच्या पोत्यावर एकदा दृष्टी टाकतात की.. हाती आलेली शिकार निस्सटायला नको.. ते पोते अगदी जशास तसे आहे.. म्हटल्यावर ते अगदी निश्चित मनाने नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये निघून जातात..
पण अचानक एक जण परत येतो.. व गाडीपाशी थांबतो.. पोत्त्याचे तोंड गणुने सोडलेले असते पण त्याची जाणीव त्याच्याशिवाय कोणाला झालेली नसते. तो ते जाण्याचीच वाट पाहत होता.. ते गेल्याची चाहूल त्याला लागली.. आणि त्याने एक क्षणही वाया न घालवता पोत्यातून बाहेर पडला.. व हळूच पुढे आला त्याने खिडकीच्या काचातून इकडे तिकडे पाहिले. एक जण गाडी जवळ थांबलेला होता.. त्याला चुकवून त्याने जीपचा मागील पडदा स्वतः ला निघण्याइतका बाजूला सारून तो गाडीतून उतरला. आणि एका दुसऱ्या गाडीच्या आडोशाला जाऊन लपला.. पण मनात मात्र भीती होती.. हृदय धडधड करत होते.. मनावर एक प्रकारचं प्रेशर आलो होतं.. काय होईल.. काय नाही.. या चे..
असेच लपत छपत एका हॉटेलच्या मागच्या बाजूला जाऊन तो थांबला..
तेथील नोकराने त्याला बघितले आणि विचारले, "ए पोरा, इथे काय करतोस?"
"मला इथे थोडा वेळ थांबू द्या." असं गणुने विनंती करून त्या नोकराला सांगितले. असे ऐकल्यावर त्याचेही कुतूहल जागे झाले. की यामागे काय आहे. हा असं का म्हणतोय. असे एक नाही त्याला अनेक प्रश्न पडले.. त्याने आपल्या मालकाच्या कानावर ही बातमी घातली.. मग त्या मालकाने गणुला आपुलकीने सारे विचारले.. त्यानेही सांगितले. आणि मला त्या लोकांच्या तावडीतून वाचवा..असे कळवळुन सांगितले.
त्या हॉटेल मालकाने ती जीप शोधण्यासाठी माणसे पाठवली..पण त्या जीपने तेथुन पोबारा केला होता.
त्यानंतर तेथील काही जणांच्या म्हणण्यानुसार
गणुला त्यांच्या गावी सुखरूप नेवुन सोडावे..असे ठरले.
दोघेजण गणुला त्यांच्या गावी घेऊन आले.
आणि त्यांनी गणुच्या वडिलांना सांगितले की,
"या तुमच्या मुलाच्या हुशारी मुळे आज हा परत तुम्हाला भेटला आहे."
गणुचे हे धाडस आणि प्रसंगावधान पाहुन सर्व जण त्यांचे तोंडभरून कौतुक करू लागले.
सौ. शुभांगी सुहास जुजगर.
2 टिप्पण्या
👌🏻👏🏻😇
उत्तर द्याहटवाछान साहस कथा वर्णन🙏
उत्तर द्याहटवा