फॉलोअर

गोष्ट किरणची

गोष्ट किरणची 



मोबाइल ची बेल वाजली.म्हणून किरणला जाग आली.तशी ती दररोजच लवकर  उठत असे.पण आज जरा विशेष होते.
उठुन तिचं स्वतःचे सर्व आवरून झाले होते. आईही उठुन, तिचीही आवरण्याची लगबग सुरू होती. तरीपण वृषाली उठली नव्हती.म्हणुन आई किरणला म्हणाली,
"वृषालीला उठवना, किरण,आवरायला पाहिजे ना?"
"हो उठवते." किरण  म्हणाली.
चहा घेऊन  झाल्यावर ती वृषालीला उठवु लागली.


सोनाली आणि वृषाली दोघीही उठल्या.
वृषाली स्वतःहाचे कान पकडत सोनालीला म्हणाली."स्वारी दी.आज माझ्यामुळे तुला बघायला येणार्या पाहुण्यांना 'नंतर या'असे सांगावे लागले.

अंथरुणाच्या घड्या करत करतच सोनाली म्हणाली,"त्यात काय विशेष,  येतील ना परत कधीतरी."
असे म्हणत तिने सर्व अंथरुणं व्यवस्थित ठेवले.
या दोघींचे आवरेपर्यंत किरणताईने स्वयंपाक केला.

आज वृषालीचा आई-वडीलां सहित सत्कार समारंभ  पुणे येथील 'तनिष्क' हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला होता.

या कार्यक्रमासाठी तीघींना म्हणजे, किरणताई आणि तिच्या दोन्ही लेकी सोनाली अन् वृषाली जाणार होत्या.आई येणार नव्हंती.

तरीपण 'आवरा' असे म्हटले की समोरील व्यक्तीस हुरूप  येतो.तसेही किरणताई दररोजच साडेनऊ पर्यंत  दुकानात जातच होत्या.

………..

 " एस. वृषाली किरण"
 हे नाव उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट झाला. कडकडाटात तिचे स्टेजवर आगमन झाले.
ठेंगण्या बांध्याची, निमगोरी, मध्यम देहयष्टी असलेली ही तरुणी.. तरुणी कसली??
 ही तर क्लास वन अधिकारी.! क्लास वन च्या पोस्टवर सलेक्ट झालेली.

काही  दिवसापूर्वीच स्पर्धा  परीक्षेचा रिजल्ट लागला होता.' गरुड झेप क्लासेस' चे बरेच विद्यार्थी या परिक्षेत सलेक्ट झाले होते.या सर्वांमध्ये 'एस वृषाली किरण' ही सगळ्यात अव्वल होती.  म्हणून क्लासेसने या सर्वांचा आई वडिलांसहित सत्कार व गौरव सोहळा, क्लासेसच्या हेड सरांनी, म्हणजेच श्रीरंग सरांनी ठेवलेला होता.

शिक्षणाधिकारी साहेब, या सत्कार सोहळ्याला, 'अध्यक्ष' म्हणून लाभलेले होते.

सत्कारासाठी वृषालीचे औक्षण केले गेले. स्टाफ मधील शिक्षिका गौरी मॅम ने तिला औक्षण केले. 
हेड सरांनी  "वृषाली मॅम, तुमचे आई-वडील आले असतील तर त्यांनाही इकडे बोलवा." असे सांगितले.
"ठीक आहे सर." असं वृषाली म्हणाली. म्हणून तिने आईला स्टेजकडे बोलावले.

समोर बसलेल्या किरण ताई उठून स्टेजकडे आल्या. आणि वृषाली जवळ जाऊन उभ्या राहिल्या.
हे पाहून गौरी मॅम म्हणाल्या, "आणि पप्पा  नाही का आले?"
"नाही मॅम." असे वृषालीने सांगितले.

 स्टेजवर किरणला पाहुन जे क्लासेस चे हेडसर होते, ते तर अवाकच झाले. आणि तिच्याकडे पाहून ते उद्गारले.
" किरण तू!!अन् इथे??" 
 हा अनपेक्षित प्रश्न ऐकून किरण ताई ही कावर्या बावर्या झाल्या.आणि सरांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागल्या. नुसती किरणताईच नव्हे. तर.. स्टेजवरील सर्वच जण प्रश्नार्थक चेहऱ्याने एकमेकाकडे बघू लागले.

 समोर असे अचानक श्रीरंगरावांना पाहून किरण ताई ही गोंधळून गेल्या. असं हे पाहून श्रीरंग सर उठून किरण ताईकडे आले. आणि त्यांनी विचारलं," किरण, ही वृषाली मॅम म्हणजे तुझी…?" वाक्य पूर्ण होण्याअगोदरच.
……

 किरण ताई म्हणाल्या," होऽऽ ही माझीच मुलगी आहे. ज्या मुलीला नकोशी म्हणून, वडिलांसहित त्यांच्या घरातील, इतर लोकांनी नाकारले होते. त्याच मुलीने स्वतःच्या मेहनतीने. जिद्द ठेवून अभ्यास केला आणि आज शासनाच्या मानाच्या खुर्चीवर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे."
 आईचे हे बोलणे ऐकून, वृषाली ही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
 म्हणून किरण ताईने, तिच्या पाठीवरून हळूच हात फिरवला आणि तिला समजावत म्हणाली, "होय बाळा, तुझ्या बाबतीतीलच हे विधान आहे. मी माझ्या दोन्ही मुलींना हिऱ्याप्रमाणे समजून पैलु पाडत राहिले. मोठी मुलगी ही उच्च शिक्षण घेऊन. चांगल्या पदावर काम करत आहे.अश्या या मुलींचा मला अभिमान आहे."

 हे बोलणे चालू असतानाच शिक्षणाधिकारी साहेबांनी  टाळ्या वाजवल्या. आणि त्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. पण किरणताई मात्र, आपल्या भूतकाळात हरवल्या.

……..


किरणला दिवस होते.आठ महिने पूर्ण झाले होते. नववा महिना लागला होता. सोनाली तीन वर्षाची होती.म्हणजे पहिली मुलगी.या दुसर्‍या बाळंतपणासाठी माहेरी जायचे नव्हते. 

पण सासूबाईंचा, हेकेखोर आणि कजाक स्वभाव असल्यामुळे तिला माहेरी जावे लागणार होते. आणि घर खटल्याचे!! काळजी घेणारे असे कोणी नव्हते. ज्याला त्याला आपआपली कामे प्रिय होती. सासूबाईंच्या या तिखट स्वभावामुळे कोणीही तोंड उघडण्याचे धाडस करत नव्हते.

 सोनालीचे बाबा.. त्यांना सध्या तरी हातात काहीच काम नव्हते. त्यामुळे बेकाम म्हणून सर्व हीनवत होते. बीकॉम चे 'बेकाम' झाले. असे…
 किरण ताई म्हणाल्या," होऽऽ ही माझीच मुलगी आहे. ज्या मुलीला नकोशी म्हणून, वडिलांसहित त्यांच्या घरातील, इतर लोकांनी नाकारले होते. त्याच मुलीने स्वतःच्या मेहनतीने. जिद्द ठेवून अभ्यास केला आणि आज शासनाच्या मानाच्या खुर्चीवर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे."
 आईचे हे बोलणे ऐकून, वृषाली ही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
 म्हणून किरण ताईने, तिच्या पाठीवरून हळूच हात फिरवला आणि तिला समजावत म्हणाली, "होय बाळा, तुझ्या बाबतीतीलच हे विधान आहे. मी माझ्या दोन्ही मुलींना हिऱ्याप्रमाणे समजून पैलु पाडत राहिले. मोठी मुलगी ही उच्च शिक्षण घेऊन. चांगल्या पदावर काम करत आहे.अश्या या मुलींचा मला अभिमान आहे."

 हे बोलणे चालू असतानाच शिक्षणाधिकारी साहेबांनी  टाळ्या वाजवल्या. आणि त्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. पण किरणताई मात्र, आपल्या भूतकाळात हरवल्या.

किरणला दिवस होते. आठ महिने पूर्ण झाले होते. नववा महिना लागला होता. सोनाली तीन वर्षाची होती.म्हणजे पहिली मुलगी.या दुसर्‍या बाळंतपणासाठी माहेरी जायचे नव्हते. पण सासूबाईंचा, हेकेखोर आणि कजाक स्वभाव असल्यामुळे तिला माहेरी जावे लागणार होते. आणि घर खटल्याचे!! काळजी घेणारे असे कोणी नव्हते. ज्याला त्याला आपआपली कामे प्रिय होती. सासूबाईंच्या या तिखट स्वभावामुळे कोणीही तोंड उघडण्याचे धाडस करत नव्हते.

 सोनालीचे बाबा.. त्यांना सध्या तरी हातात काहीच काम नव्हते. त्यामुळे बेकाम म्हणून सर्व हीनवत होते. बीकॉम चे 'बेकाम' झाले. असेच सगळेजण म्हणत होते. त्यामुळे तिलाही तशीच वागणूक होती. अशातच हे दुसरं बाळंतपण.. मग तर पहायलाच नको.
 खाण्यापिण्याचे काही नव्हते. पण अवांतर खर्चाला रुपया सुद्धा हातात राहत नव्हता.तिला म्हणजेच किरणला सगळ्यांचा शब्द झेलून, कामं करावी लागत होती. पहिली मुलगी असल्याने, आता सर्वांनाच मुलगा हवा होता.

किरण बाळंतपणाला माहेरी आली.मोठा भाऊ शिक्षक होता. त्याचेही लग्न झाले होते. नुकताच त्यालाही मुलगा झालेला होता. त्याच्याही मागे त्याचा संसार होता. आई-वडील होते. वडील असेच हातावर काम करून पोट भरत होते. पण भाऊ नोकरीला लागल्यामुळे परिस्थितीला हातभार होती.

अशा एकूण परिस्थितीमुळे, तिला माहेरी बाळंतपणासाठी जायचे नव्हते. जसे होईल तसे सासरीच करायचे होते. पण नवऱ्याचे घरात काहीच चालत नव्हते. त्यामुळे इच्छा असूनही, तो काहीच बोलू शकत नव्हता.

 दिवस पूर्ण झाले. आणि किरणला मुलगी झाली. छान गुटगुटीत, बोलक्या डोळ्यांची, जणू बाहुलीच. किरणला ही बाहुली कुशीत घेताना खूप आनंद झाला होता. पण मनात भीतीचे काजवे चमकत होते. की 'आता घरी गेल्यावर आपली जास्तच कसरत होणार आहे.' 

झालंऽऽ सासरी  तर खडा जंगीच झाली. मुलगी झाली. असे कळाल्यावर. 


असं कळाल्यावर. साधी चौकशी सुद्धा कोणी केली नाही. कशी आहे? बाळ कसे आहे? वगैरे..
 नवऱ्याला तर मुलगी झाली, याचा आनंद व्यक्त करावा की दुःख. हेच समजेना. घरातले वातावरण बघून.. आई तर खूप रागावली होती त्याच्यावर.

 एकूणच काय घरात कोणालाच ही मुलगी हवीशी वाटली नव्हती. फक्त  किरण चा नवरा येऊन भेटून गेला होता. तेही उभ्या उभ्याच एक चक्कर त्यांनी टाकली होती. 

आईला हे कळाल्यावर तिने किरणला परत आणण्यास स्पष्ट नकार दिला होता. 'पोरगी झाली तिला, तिला आणि तिच्या पोरींना, माझ्या घरात जागा नाही. त्यामुळे आणू नकोस.' असे आईने स्पष्ट सांगितले होते.


 आईच्या या म्हणण्याचा त्याच्यावर परिणाम झाला. म्हणून काही दिवसानंतर त्याने घर सोडले आणि शहर गाठले.
 वाट पाहून पाहून, किरण थकली.. पण सासर हुन, कुणीच तिला न्यायला आले नाही. 

मग भावानेच एकदा सासरी जाऊन चौकशी केली. "की, तुम्ही नाही येणार? तर मग मी घेऊन येतो."
पण.. त्यालाही अपमानित होऊन परतावे लागले. चार महिने, सहा महिने, हळूहळू वर्ष..

 मुलगी आता पाऊल उचलु लागली होती. म्हणून एक दिवस किरणच मुलींना घेऊन, वडिलांसोबत सासरी आली. आणि तिने विनंती केली.
"अहो काहीही करा. मला घरात घ्या. आणि मी आणि माझ्या मुलींने कुठे जायचे? काय खायचे? कसे राहायचे?"

 अशी तिची कळकळीची विनंती ऐकूनही, कुणालाच पाझर फुटला नाही. दोन्ही मोठ्या जावांनी, बघून नाकं मुरडली आणि आपल्या आपल्या कामाला निघून गेल्या. काहीही मात्रा चालली नाही.
"चल पोरी,अशा या दगडाचे काळीज असलेल्या माणसात, मी आता तुला राहूही देणार नाही. मुली झाल्या म्हणून काय झालं? एक दिवस याच मुलींच्या जीवावर, मानानं मिरवशील तूऽऽ. चल."
 असं  किरणचे वडील  तिला म्हणाले.

 ज्या घरात, वाजत, गाजत, मानाने प्रवेश केला होता, आज त्याच घरातून लाचार होऊन, परतावं लागत होते.

परत आल्यावर..
 किरणने 'आता आपल्याला काहीतरी काम करावे लागेल.' असे वाटू लागले. दोन मुलींना वाढवायचं होतं. पण गावामध्ये (गाव तसे छोटेसेच होते) तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. 'नवऱ्याने टाकलेली' हा भाव त्यांच्या नजरेत कायम असायचा. या कडवट नजरा, तिच्या मनाला पोखरत होत्या. आणि तिच्या कोणत्याही कामावर विरजण टाकीत होत्या.

 पण..
 पुन्हा मन तिला सांगत असे, 'नाही किरण, तुला असे ठिसूळ होऊन चालणार नाही. कारण जसं लाचार तुला व्हावं लागलं. तसंच किंवा त्यापेक्षाही जास्त लाचार तुझ्या मुलींना व्हावं लागेल. त्यांचा कोणताही दोष नसताना. हे तुला आवडेल? नाही!!'

 दरम्यान मोठ्या भावाची बदली, पुण्याजवळच्या गावातील शाळेवर झाली. तो स्वतःची फॅमिली घेऊन तिकडे गेला होता. 

म्हणून मग.. किरणनेही तिकडे जायचे ठरवले. आणि तेथेच काहीतरी काम करून, मुलींनाही तेथेच शाळेत घालायचे.

त्या गावी मग भावाने हिला, छोटेसे लेडीज मटेरियल चे दुकान टाकून दिले. आई-वडिलांसोबत मग ती तेथे राहू लागली. आणि आजपर्यंत हा वसा तीने चालवलेला होता.

…………



टाळ्यांचा कडकडाट शांत झाल्यावर, हेड सर म्हणजे, श्रीरंग सर हात जोडून बोलू लागले.
"मी आज सगळ्यांची माफी मागतो."
असं म्हणत स्टेज वरच्या सगळ्यांकडे, अपराधी भावनेने बघीतले.नंतर किरणताई कडे येऊन म्हणाले.
"किरण तुझा अनंत अपराधी आहे मी."

सगळं हे काय चालु आहे कोणालाच  काहि समजेना? अचानक  हेड सर अशी माफी का? मागत आहेत.
"नकुशी' असलेल्या या मुलीचा, मीच पिता आहे.म्हणजे किरणताई माझी पत्नी आहे.गेल्या वीस वर्षांपासून मी यांच्या शोधात होतो.आणि आज असे हे अनपेक्षित पणे माझे सौभाग्यच म्हणेन मी माझ्या समोर प्रगट झाले.आजचा हा सत्कार  खरंतर या आईचाच  व्हायला पाहिजे.कारण तिच्यातील  जिद्दीनेच या  दोन्ही मुली  उच्च पदावर आहेत."
दरम्यान  सोनालीही स्टेजवर आलेली होतीच.


दोघींनाही आपले बाबा अचानक  समोर बघुन 
खुपच भारावल्या सारखे वाटले.
पण वृषाली गेल्या दोन वर्षांपासून, त्यांना ओळखत होती.नव्हे त्यांच्याकडेच शिकत होती.आजची ही नव्यानेच झालेली ओळख..


विलक्षण आनंदात  त्या दोघीही  होत्या.
आईला खुपदा हा प्रश्न विचारला होता."आमचे बाबा कुठे आहेत?"
पण आई एवढेच म्हणत होती की ,"वेळ आल्यावर नक्की सांगेन."

ती वेळ नियतीनेच अशी मॅनेज केली होती. 
दोन्ही मुलींच्या डोक्यावर हात ठेवून श्रीरंग  सर म्हणाले,"मुलींनो,मी तुमचा खुपच  अपराधी आहे.जी शिक्षा द्याल  ती मी भोगायला तयार आहे.पण आता मला सोडुन  जाऊ नका."

स्टेजवरील सर्वच जण निशब्द  होऊन,  हे पाहत होते.

मग शिक्षणाधिकारी साहेब  उठले.आणि त्यांनी किरणताई चा शाल आणि श्रीफल देऊन सत्कार केला.ते म्हणाले.
"आजच्या या सत्कार सोहळ्यामुळे एकमेकांपासून दुरावलेले कुटुंब जवळ आले.या दोन मुलींना त्यांचे बाबा गवसले आहेत. हेच मोठं साध्य अन् आजच्या कार्यक्रमाचे फलित आहे."

असे म्हणुन त्यांनी श्रीरंग सरांनाही पुष्प गुच्छ देऊन  त्यांचे अभिनंदन  केले.आणि खुप खुप शुभेच्छाही दिल्या.व पुढील  कार्यक्रमास सुरुवात  केली..


-सौ. शुभांगी सुहास जुजगर. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या