अबोल प्रीत भाग:२ अंतिम भाग
सुमेधा, सासरी आली. रितीप्रमाणे, सगळे विधी चांगले पार पडले. त्यानंतर सगळी पाहुणे मंडळी, आपापल्या गावी निघून गेली.
आता घरात सासू-सासरे, सासऱ्यांची आई म्हणजे आजी सासू आणि एक नणंद होती. एकीचे लग्न झाले होते. घरात सासूबाईंना, आज्जी सासूबाईचे सगळे करावे लागत होते. त्या जागेवरचं हलत नव्हत्या. म्हणुन त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागत होते. याच कारणामुळे त्यांनी सगळ्या कामाला बाई लावली होती. फक्त स्वयंपाक तेवढा, त्या करत होत्या. त्यामुळे हीलाही काही कामाचे टेन्शन नव्हते.
"खायचे, प्यायचे आणि मस्त आनंदी राहायचे. आणि सगळ्यांशी प्रेमाने वागुन, आपुलकीच्या धाग्याने सर्वाना एकत्र जुळवून, बांधुन ठेवायचा प्रयत्न करायचा. हे सासूबाईंनी हिला सांगून ठेवले होते.
सासऱ्यांविषयी तिला वाटले होते कीे फार 'कडक' आहेत पण घरात अतिशय प्रेमळ वागत होते.
हिला ते म्हणाले,"बाई काही लागलं तर हक्काने सांग. संकोच न करता. तुला वाटेल, मी यांना कसं सांगू?? पण तसं अजिबात करायचं नाही."
लगेच सासुबाई म्हणाल्या,"हो. तुला काय पाहिजे असेल तर लगेच मला सांगत जा. लगेच तुला संध्याकाळी हजर."
नणंदही फार जीव लावत होती.
हे लग्न, ज्या परिस्थितीत झालं..
त्यामुळे सुमेधाच्या मनात चीड होती. पण.! घरातील या खेळीमेळीच्या वातावरणामुळे ती चीड मात्र लोप पावत चालली.
ही कथा तुम्ही. kusumanjali.com. वर वाचत आहात.
घरात काही विशेष काम नव्हते.
त्यामुळे मग रिकाम्या वेळात तिचा अभ्यास, तिने सुरू केला. कारण कॉलेजमध्ये तिचे, फायनल ला ऍडमिशन होते. आणि परीक्षा ही जवळ आलेली होती. लग्नाच्या या गडबडीमध्ये, तिचा अभ्यास झालाच नव्हता.
म्हणून तिने, त्याच्याकडे लक्ष द्यायचं ठरवल.
पण जयदिपचे जरा हिला, टेन्शन आले होते. म्हणजे नवऱ्याचे. तो जरा बाहेरख्याली चा मुलगा होता. घरात तो सहसा थांबतच नसे. बाहेरचीच मित्रमंडळी आणि काय? काय?? त्याचे उद्योग असायचे? ते त्याचे त्यालाच माहित.
वडिलांनीही काही विशेष जबाबदारी त्याच्यावर सोपवली नव्हती.
जयदिपचे हे असे वागणे, आता घरात सगळ्यांना खटकू लागले होते.
विशेष म्हणजे आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. "आतापर्यंत नाही ऐकले माझे, पण आता तरी ऐक, दुसऱ्याची लेक घरात आणली आहे. ती काय शोभेची बाहुली म्हणून नाही. तर ते एक नाते आहे. आणि त्यातूनच तुझ्याआयुष्याचा प्रत्येक क्षण तिच्याशी बांधला गेला आहे. त्याचे मोल शब्दात होऊ शकत नाही. आमचा, आमच्या सांगण्याचा, नाही कधी विचार केलास. पण आता, तिचा विचार कर. तुझ्यासाठी ती तिचं घर सोडून आली आहे. तुझे हे सर्व फालतू उद्योग बंद कर. आणि काहीतरी कर."
आईचे हे सर्व ऐकून घेतल्यावर जयदिप म्हणाला, "मी काय लग्न करा. लग्न करा. म्हणून मागे लागलो होतो का?? तुम्हालाच घाई झाली होती."
"का? तुला काय लग्न करायचे नव्हते का? की होती कोणी दुसरी?"आईने ही मग त्याच सुरात विचारले.
" एऽऽ असं काही नाहीये."जयदिप जरा खालच्या सुरात म्हणाला.
संभाषण चालू असतानाच जयदिप चे वडील आले.
" बरं झालं. तुम्हीच विषय काढलेला आहे.
त्या पोरीला जर तू दुखवलेस. आणि तिच्या डोळ्यात पाणी आले, तर मग.. तू आहे आणि मी आहे. तिच्या आई-वडिलांना आम्ही शब्द दिला आहे. तुमच्या मुलीला आमच्या घरात अजिबात त्रास होणार नाही."असे किशोरला म्हणजे सुनबाईच्या वडिलांना मी सांगितलेले आहे.
"हो रे. मुलीसारखं सांभाळू तिला आम्ही. असं मी पण, म्हणाले आहे तिच्या आईला."आई म्हणाली.
"ते काही नाही, उद्यापासून तू दुकानावर जायचे. आणि ते सांभाळायचे. आणि हो तुझ्या मित्रमंडळींना तिकडे फिरू देऊ नकोस. काय? समजलं का?" असं वडिलांनी तंबी देऊन सांगितले.
आईकडे चोरटा कटाक्ष टाकत दिप म्हणाला.
"अं हो हो."
असं म्हणून जय दिप त्याच्या रूम मध्ये आला. तर सुमेधा अभ्यास करत बसली होती. ती मनात चरकली.
"काही झाले का?" असे जरा भीत भीतच तिने विचारले.
" काही नाही." तिच्यावर डोळे रोखून तो म्हणाला.
"मला जरा कॉफी हवी आहे. तुम्हाला आणि मला दोघांनाही आणा. आणि हो अण्णा ही आत्ताच आले त्यांनाही विचारा."जयदिप
ही कथा तुम्ही kusumanjali.com.वाचत आहात.
"ठीक आहे." असं म्हणून सुमेधा किचनडे वळली.
तत्पूर्वी आणखी कोणाला घ्यायची आहे का? हेही तिने विचारले. फक्त अण्णा "हो" म्हणाले, बाकी सर्व नको म्हणाले.
कॉफी घेताना त्याने, सुमेधाला जवळ बसवले.
हिच्या मनात आधीच धडधडत होतं.
त्याचा स्वभाव तापट असल्याची जाणीव, तिला या पंधरा दिवसात, चांगलीच झाली होती.
कॉफी पिऊन झाल्यावर, तिचे दोन्ही हात त्याने हातात घेतले, आणि म्हणाला,
"छान आहेत."
"फक्त हातच?" असे तिने विचारले.
यावर उभे राहुन त्याने तिला जवळ घेतले. आणि म्हणाला, "तुम्ही पण सुंदर आहात. जणु कस्तुरीच.."
हे ऐकल्यावर ती स्वतःशीच लाजली.
"हंऽ आम्ही जरा बाहेर जाणार आहोत.यायला रात्री जरा उशीर होईल.तुम्ही वाट पाहु नका.काही हिशोब बाकी आहेत, ते करून येतो."असं म्हणत तो निघुन गेला.
…..
सुमेधा, फायनल ची परीक्षा देऊन परत आली होती. त्यामुळे आता अभ्यासही नव्हता. जयदिपही व्यवस्थित दुकानात जावु लागला होता.
माहेरी गेली तेव्हा विजयच्या आठवणीने तिला थोडे घायाळ केले होते. पण.. त्यामुळे शिक्षका विषयी तिच्या मनात एक आदर्श निर्माण झाला होता. किंवा त्या पात्राने, तिच्या मनात घर केले होते. नकळतच तिने विजय मधल्या शिक्षकावर प्रेम केले होते.
या सर्व आठवणींच्या मंथनातून, तिनेही मग 'आपण शिक्षक झालो तर.. घरच्यांना आवडेल का'? हा प्रश्न तिने मनाला विचारला.
म्हणून एक दिवस..
किचनमध्ये स्वयंपाक करता करता तिने, सासूबाईंना सहज हा प्रश्न विचारला.
" आई,मी काहीतरी केले तर तुम्हाला आवडेल का?"
यावर सासूबाई म्हणाल्या," का ग? असं विचारतेस तू, म्हणजे नेमकं काय करायचंय?"
ही कथा तुम्ही kusumanjali.com.वर वाचत आहात
" म्हणजे मी बाहेर पडून काही केले तर तुम्हाला आवडेल का? किंवा सगळ्यांना घरात आवडेल का?"
"तुला नेमके काय म्हणायचे आहे. ते जरा स्पष्ट सांग." आईने काम थांबवुन विचारले.
"मला की नाही.. शिक्षिका व्हायचे आहे."सुमेधाने पटकन बोलुन टाकले.
"आज अचानक, असे का वाटले तुला?"
सासुबाईचा प्रश्न.
"हो. माझ्या काही मैत्रिणी बी.एड. करणार आहेत. त्यांचे ऐकून मलाही असे वाटले की. 'मी पण हे करू शकते."सुमेधा.
"म्हणजे तुला आणखी शिकावं लागेल."सासुबाई म्हणाल्या.
"होय. मी घरात नुसते बसून तर असते.त्यापेक्षा बी.एड.करावे असे मी ठरवले आहे."
"कर. मलाही आवडेल तू शिक्षिका झालेली. एकेकाळी.. मी पण, शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहिले होते. शाळेत शिकत असताना 'वैद्यबाई' म्हणून आम्हाला होत्या. त्या जेव्हा शिकवायच्या तेव्हा सगळी मुलं तल्लीन होऊन, त्यांचे शिकवलेलं ऐकत असत. ते पाहून माझ्याही मनात, शिक्षिका होण्याचे स्वप्न फुलू लागले. पण शालेय शिक्षण झालेकीच लग्न झाले. आणि हे घर म्हणजे मोठे खटल्याचे घर(मोठी फॅमिली) होते. एवढ्यांची कामे करता करताच, दिवस कसा संपत होता. काहीच कळत नव्हते. शिवाय सण, समारंभ ,व्रतवैकल्य सगळी यथासांग करावी लागत होती. या अशा वातावरणात माझे शिक्षिका होण्याचे स्वप्न, स्वप्नच राहिले."
सांगताना आई खूप भाऊक झाल्या होत्या. हे सुमेधा ने पाहिले.
म्हणुन ती म्हणाली, "तुम्ही मग अण्णांना का सांगितले नाही?"
"अण्णा. त्यांना काहीच कळत नव्हते यातले. स्वतःच्या शिक्षणाकडेही त्यांचे लक्ष नव्हते. घरात, शिक्षणाविषयी सज्ञान, असे कोणी नव्हते. तर यांना काय कळणार!! एकदा दोनदा म्हणाले मी. पण ते 'असले चोचले येथे नाही करायचे ते तुझ्या माहेरी'. असे म्हणून हात झटकून मोकळे झाले."
"हो .. अण्णा असे होते तर?" सुमेधा म्हणाली.
"आता खूपच बदलले ते.पण असुदे. तुझी इच्छा असेल तर, मी तुझ्या पाठीशी आहे. निदान तुझे स्वप्न पुर्ण होताना, मलाही कुठेतरी समाधान मिळेल."सासुबाई म्हणाल्या.
प्रथम आण्णांनी नकारच दिला.
"तर.. तुला आयुष्यभर काहीही कमी पडणार नाही.उगीच कशाला त्रास करून घेते."
उलट असेच म्हणावे.
जयदिपचे म्हणने की," माझे घर ,माझी माणसे नीट व्यवस्थित सांभाळ. माझी दुसरी काहीच अपेक्षा नाही.हे सगळे करून ते करत असशील तर माझी हरकत नाही."
हळूहळू दोघांचेही नकार मावळले.
…..
चार वर्षा नंतर..
सुमेधाचे बी. एड्. झाले की लगेच अण्णांच्या ओळखीने नामांकित अश्या शाळेवर तिला काम करण्याची संधी मिळाली.
आज तिच्या विद्यार्थ्यांची ती आवडती शिक्षिका झालेली आहे.
यादरम्यान ती एका मुलींची आईही झाली होती.
…...
सौ. शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या