अबोल प्रीत भाग:१
"अगं माऊ, शांत होऽ नाऽ. आलंच बघ आता आपलं गाव." सुमेधा तिच्या छोट्या म्हणजे चार वर्षाच्या मुलीला म्हणाली.
तिची कितीतरी वेळेपासून सारखी अशीच भुणभुण चालू होती.
" मम्मा कधी येणाल? मम्मा कधी येणाल मामाचे गाव?"
सुमेधा आणि माऊ या दोघींना, जयदीप ने म्हणजे माऊच्या पप्पांनी रात्री ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसवून दिले होते. सुमेधाच्या बहिणीचे लग्न आठ दिवसावर आलेले होते. म्हणून," तुम्ही पुढे जा. मी नंतर येईल." असं तो म्हणाला होता.
…..
"आईऽ एऽ आई" गेटमधून आत आल्यावर पायऱ्या चढत चढतच, तिने आवाज दिला. रिक्षातून सर्व बॅगा घेऊन, विकी मागून आला. ती पटकन माऊला घेऊन पुढे आली.
आईने दार उघडले आणि," तिथेच थांब". म्हणाली. तिने घरात जाऊन भाकर तुकडा आणून ओवाळून टाकला, आणि मग या दोघी मायलेकी घरात आल्या. आणि सगळ्यांच्या गळाभेटी झाल्या.माऊलाही सगळ्यांना घ्यावे वाटले पण ती.
स्वतःच्याच आईला घट्ट बिलगली होती. कोणाकडेच गेली नाही. कारण ओळखीचे कोणीच नव्हते. सुजाता मावशी ला तेवढं म्हणजे दोन-चार शब्द ती बोलली. कारण तिला सांगितले होते की," सुजाता मावशीचे लग्न आहे" म्हणून..
"तुझे लकनं, आहे का सुजाता मावशी?" एवढेच ती बोलली होती.
ही कथा तुम्ही kusumanjali.com.वर वाचत आहात.
दुपारचे जेवण झाले, आणि सुमेधा आईला म्हणाली,"आई मी जरा झोपते गं, गाडीत झोपच नाही लागली मला. त्यात माऊनीही त्रास दिला."
"हो, जा झोप, माऊलाही झोपी घाल. सुजाता तुही जागं तिच्यासोबत. गप्पा ही मारा. काही नियोजनही करा. वरच्या रूम मध्ये जा. इथे खाली कामं सुरू आहेत लग्नाची. शिवाय येणारी जाणारी असतातच". असं आई म्हणाली.
वर आल्यावर प्रथम तिने, माऊला थोपटून थोपटून झोपी घातले. पडल्या पडल्या दोघी बहिणींच्या गप्पा ही चालूच होत्या.' नवरा मुलगा कसा आहे?". सासर कसे आहे?' सगळं छान छान होतं. "माझं, जसं केलं पप्पांनी, नशीब तुझे तसंच नाही केलं. तुला छान, मनासारखं स्थळ त्यांनी शोधलं आहे. असं सुमेधा सुजाताला म्हणत होती."
"तुझ्या लग्नाच्या वेळी, मी लहान होते गं ताई. मला काय झालं नीटसं काहीच आठवत नाही. सुजाता म्हणाली.
"मी जर हे असं केलं नसतं तर.. आज हे वैभव राहिले नसते. चित्र फारच वेगळे दिसले असते. सुमेधा म्हणाली.
"काय केले आहे तू? सांग ना मला, मी ही आता या घरची, म्हणजे आठ दिवसानंतर पाहुणीच होणार आहे." सुजाता म्हणाली. बोलता बोलता अचानक तिचे लक्ष वरती सज्जावर ठेवलेल्या फ्रेमकडे गेलं.
आणि ती म्हणाली,"सुजाता, ती फ्रेम काढ बरं जरा."
सुजाताने उठून ती फ्रेम काढली.
"ही फ्रेम म्हणजे माझ्या, त्या दिवसातल्या फुलपंखी आठवणी आहेत. ते दिवस मला, आजही जसेच्या तसे आठवतात."
"सांग ना ताई. मला ऐकायला आवडेल."सुजाता म्हणाली.
kusumanjali.com.वर ही कथा तुम्ही वाचत आहात.
….
बेल वाजली म्हणून सुमेधाने दार उघडले. आणि "कोण आहे?" असे विचारले.
"मी विजय, तुमच्या रूम मधील किरायदार."तो म्हणाला.
"हो का. काही काम होते का पप्पांकडे? तिने विचारले.
"हो, हे पैसे द्यायचे होते." विजय म्हणाला.
"पण पप्पा नाहीत घरी. माझ्याकडे द्या मी त्यांना आल्यावर देईल."सुमेधा म्हणाली.
"ठीक आहे, हे घ्या." सुमेधाने ते पैसे घेतले, पण पैसे घेताना तिने विजयला अपादमस्तक न्याहाळून घेतले.
वडिलांना नक्की सांगा हे." विजय पैसे देताना म्हणाला.
" हो, नक्की सांगते." सुमेधा म्हणाली.
तो निघून गेला तरी हिला सारखे सारखे काहीतरी झाल्यासारखे वाटू लागले. त्याचा तो मंदस्मित करणारा चेहरा, तिच्या नजरेसमोर परत परत येऊ लागला.
त्यानंतर दररोज एकदा तरी त्या दोघांची भेट होऊ लागली. बोलणेही होऊ लागले. आणि या भेटी मधूनच दोघेही एकमेकांच्या प्रेमात कधी पडले? कळलेच नाही.
त्याचे वागणे, बोलणे, विशेष म्हणजे त्याच्या नजरेतला आत्मविश्वास तिला जास्त मोहित करत गेला.
असेच विजयचेही झाले होते. सुमेधा एवढी सुंदर नव्हती. पण, फॅशनेबल राहणीमुळे ती आकर्षक दिसत होती. त्यात आता या प्रेमाची जादू तिच्यावर झाली होती. नेहमीपेक्षा ती अधिकच आनंदी दिसत होती. जणू तिच्या रोमा रोमात विजयच्या प्रेमाने जादू केली होती.
सुमेधाचे वडील, शेतकरीच होते. वडीलोपार्जित भरपूर शेती होती.हिचे वडील पहिला मुलगा म्हणून लाडात वाढलेले होते. त्यामुळे कामावर त्यांची विशेष पकड नव्हती. त्यांचे भाऊ, म्हणजेच सुमेधाचे काका ते मात्र शिकून नोकरीला लागले होते. त्यांना शेतीच्या कामात विशेष आवड नव्हती. किंवा रसही नव्हता. आणि ते नोकरीच्या निमित्ताने परगावीही राहत होते.हिच्या वडिलांचे शेतीत विशेष लक्ष नसल्याने, वरचेवर तिचे नुकसानच होत होते.मार्केटमधील काही दुकाने होती.ती सर्व किरायाने दिलेली होती.हिला एक भाऊ दोन बहिणी होत्या.त्यापैकी मोठीचे लग्न झाले होते.
सुमेधाला शिक्षणात विशेष रस नव्हता. म्हणून तिने मेहंदी क्लास, पेंटिंग क्लास, आणि कॉम्प्युटर क्लास, असेच काय काय तीचे चालू असायचे. तिला शॉपिंगची मात्र, विशेष आवड होती.
ही कथा तुम्ही वाचत आहात kusumanjali.com
विजय हा, या गावातील शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाला होता. स्वतःच्या गावापासून तो बरेच लांब आलेला होता . त्याला चित्र काढण्याची आवड होती. निरनिराळ्या पेंटिंग्स करणे, कल्पना चित्रे ही तो खूप छान काढत होता त्याच्या रूम मध्येही त्याने सुरेख अशा, आणि मन प्रफुल्लित करणाऱ्या काही पेंटिंग्स लावलेल्या होत्या.
त्याच्या आणि सुमेधाच्या, या प्रेमाच्या संगमामुळे, त्याने एक सुंदर घराचे चित्र काढले होते. ते चित्र तो सुमेधाला दाखवत म्हणाला, "हे बघ, आपल्या प्रेमाचे मंदिर!!"
यावर सुमेधा म्हणाली," छानच आहे. तुमच्या बोटात खरंच जादू आहे." त्या चित्राचे निरीक्षण, करत ती म्हणाली. "पण यामध्ये रंग तर भरलेलीच नाहीयेत.? बाकी आहे का ?अजून भरायचे भरायचे आहेत."
"आपण दोघांनी मिळून, प्रेमाचे रंग त्यामध्ये भरायचे आहेत." असं विजय म्हणाला.
" ते कसे?" सुमेधाने विचारले.
"चल दाखवतो." विजय जरा फिरकी घेण्याच्या मूडमध्ये म्हणाला.
"ईश्श." असं म्हणत ती लाजली. आणि तेथून निघून गेली.
दिवस जात होते. दोघांनीही योग्य वेळ आल्यानंतर आई-वडिलांना सांगून, रीत सर चारचौघांच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने लग्न करायचे ठरवले होते.
शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली.
आणि विजय त्याच्या गावी जायला निघाला.
सुमेधासाठी विजयला निरोप देणे अतिशय जड गेले. त्यानंतरचा एक एक दिवस हिला मात्र खूप मोठा मोठा भासू लागला, कशातच तिचं मन लागेल की रमेना.
ही सुट्टी लवकर संपु दे.
…….
त्या दिवशी, एक व्यक्ती घरी आली. नवीन व्यक्ती म्हणण्यापेक्षा तो नातेवाईकच होता पण लांबचा. त्याच्याकडून दोन वर्षांपूर्वी सुमेधाच्या वडिलांनी, मोठ्या मुलीच्या लग्नासाठी काही रक्कम, कर्ज स्वरूपात घेतली होती. त्यानंतर काही दिवस व्याज भरले.परंतु.. त्यानंतर मात्र काही कारणास्तव ते व्याज भरू शकले नव्हते. व्याज आणि मुद्दल मिळून आज बरीच रक्कम झालेली होती. वडीलाकडून ती काही भरली जाणे शक्यच नव्हती. कारण पूर्वीचा डामडौल लक्षात घेऊनच मुलीचे लग्न त्यांना करावे लागले होते.
पण आजची परिस्थिती तशी नव्हती. म्हणून मग त्याने, "तुमची मुलगी द्या. माझा मुलगा लग्नाचा आहे." "नाहीतर, मी आजच्या आज पूर्ण रक्कम घेतल्याशिवाय इथून जाणार नाही." असे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले.
आणि दोन्हीही जमत नसेल तर मग मी काय करीन.सांगता येत नाही."अशी जणु त्याने धमकीच दिली.
हिच्या वडिलांना मात्र इकडे आड तिकडे विहीर असे झाले.
"हो" म्हणावे? की "नाही" म्हणावे.? काहीच कळेना."मुलगी द्यावी तर सूडबुद्धीने वागून काहीतरी विपरीतच व्हायची" मुलगा तसा चांगला होता पण श्रीमंतीने धुंद झालेला होता. घरी करोडोची संपत्ती होती. आणि एकटा मालक होता. त्यामुळे एखाद्या जरी गोष्टीत त्याने लक्ष घातले, तरी तो आरामात जगू शकत होता. शेवटी सुमेधा जर दिली तर, ती करोडपती नक्कीच होणार होती.
ही बाजू जमेला धरून शेवटी त्यांनी लग्नाला होकार दिला.वेगळे काही विपरीत होण्यापेक्षा..
सुमेधाला तर हे ऐकून धक्काच बसला. आणि क्षणभर तिला वाटले की 'भूकंप व्हावा आणि आपण त्यामध्ये कायमचे विसावावे' जगणे तिला नकोसे वाटु लागले.त्यापेक्षा आपण कुठेतरी जाऊन जीव द्यावा. मग हा गुंता आपोआप सुटेल. पण छे!! का त्या आधी विजयला कळवुन 'मला यातुन सोडव' असे सांगावे.
पण फोनला पप्पांशिवाय कुणीही हात लावत नसे.
नेमके काय करावे ??काहीच तिला कळेना.
एकीकडे प्रेम होते तर दुसरीकडे वडिलांची प्रतिष्ठा!!
असे द्वंद्व तिच्या मनात सुरू होते. प्रीत जपायची म्हणल्यास वडील कात्रीत सापडत होते. शिवाय आणखी एक बहीण आणि भाऊ यांचेही भवितव्य होते.नाहि तर मी काय करेन असेही तो म्हणाला होता.शिवाय, हा कर्जाचा डोंगर वाढत गेला तर काय होईल? असा विचारही तिला करवत नव्हता.
विजय.. कुठून कसा तिच्या आयुष्यात आला? आणि आपणही कसे त्याच्यात गुंतत गेलो? हे प्रश्न ती स्वतःलाच विचारू लागली. पण उत्तर सापडेना.. म्हणून दोषही स्वतःलाच देऊ लागली. हा तारुण्यातील एक हळुवार अविष्कार आहे. होता. असं तिचं मन तिला समजावू लागलं. असा विचार मनात आल्यानंतर ती थोडी सुखावली.
एवढ्यात एक थंड हवेची झुळूक, तिच्या शरीराला रोमांचित करून गेली. उन्हाळा असतानाही तिच्या तनुवर रोमांच उभी राहिली. तीने हळूच खिडकीबाहेर नजर टाकली. आकाशात चंद्र होता.. पण चांदण्या नव्हत्या. चंद्राची प्रभा चौफेर होती. चांदणी चंद्राकडे येण्यासाठी तळमळत असणार. जशी आत्ता मी इथे तळमळते आहे. विजयला भेटण्यासाठी.. पण विजयला मात्र याची तर तसुभरही कल्पना नव्हती.
प्रतिष्ठेचे पारडे तिच्यासाठी जड ठरले. आणि ते जे म्हणतील तेच करायचे. त्यांच्याविरुद्ध काही नाही. केलेल्या प्रेमाला विसरून जायचे. आणि बोहल्यावर च्या प्रेमाला आलिंगन द्यायचे. असे तिने ठरवले. हे ठरवताना मन दुखी होत होते. डोळ्यातून गंगा यमुना वाहात होत्या. जणु विजयच्या प्रेमाचा गंध, त्या अश्रूंना होता. जो तिच्यापासून दूर दूर जात होता.
लग्नाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला. तशी जोरात तयारी सुरू झाली. 'नवरीचे दागिने आणि साड्या, ह्या नवरीच्या पसंतीने घ्यायच्या' असा तिकडून निरोप आला.
पण हिने,'तुम्हाला जे आवडेल तेच घ्या, मी आवडीने घालीन' असे सांगितले. असे तिने सांगितल्या वर आईला जरा तिच्यावर शंका आली.
चिंतायुक्त आश्चर्य व्यक्त करीत ती म्हणाली,
"एवढी चोखंदळ रित्या शॉपिंग करणारी, तू मुलगी आहेस. अग साड्या दागिने तुला घालायचे आहेत म्हणून मुद्दाम तुझ्या पसंतीचे घेणार आहेत. आणि तु मात्र…??"
आईचे वाक्य पुर्ण होण्या अगोदरच सुमेधा म्हणाली,"असु देना, त्यांनी पसंत केलेल्या साड्या, दागिने मी आनंदाने घालीन." असं म्हणून तिने एक आवंढा गिळला. माझी पसंती तर केव्हाच गॅस चा फुग्यासारखी हवेत उडत गेली. असे ती मनातल्या मनात म्हणाली.
बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. मुहूर्तही आलाच. काळ कुणासाठी थांबत नाही. या क्षणी ती बोलल्यावर उभी होती.डोळ्यात अश्रू होते. आणि मनात विजय होता. त्यालाच आजपासून विसरायचे होते. त्याच्या आठवणींनाही जवळ फिरकू द्यायचे नव्हते. मंगलाष्टके चालू होती. आणि हिच्या मनात, 'माझं आणि विजयचं नातं नियतीने मंजूर केले नव्हते' असेच काहीसे विचार तिच्या मनात चालू होते. एवढ्यात" वाजंत्री सावधान" असं तिच्या कानावर पडलं. आणि ती भानावर आली.
हातातील पुष्पमाला तिने, तिच्याही नकळत, नियोजित पतिच्या गळ्यात घातली.
सौ. शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या