असे हे रेशमी बंध...
'डॉक्टर्स डे' निमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा, 'विशेष गौरव' जागृती महिला संस्थेने ठेवला होता. आज तनिष्क हॉल मध्ये..
त्यामध्ये आजूबाजूच्या, म्हणजे शहरा व्यतिरिक्त बाजूच्या गावात. त्यांच्या टीमने सर्वे करून, काही महिला डॉक्टर निवडल्या होत्या. आणि या निवडीमध्ये डॉक्टर वर्षा हिची निवड झाली होती.
कार्यक्रमाची वेळ सकाळी दहाची होती. डॉक्टर वर्षा ही बरोबर दहा वाजता, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तनिष्क हॉल ला पोहोचली.
कार्यक्रम वेळेवरच सुरू झाला. पहिल्यांदा दीप प्रज्वलन, शहराध्यक्षा माननीय सौ. रूपालीजींच्या हस्ते झाले. स्टेजवरील सर्व मान्यवरांचे सत्कार झाले. त्यानंतर गौरवाच्या मानकरी यांचा एकेक करून, आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
त्यानंतर 'इथवरचा प्रवास' या सदराखाली, सन्मानित झालेल्या डॉक्टरांना व्यक्त होण्याची संधी दिली गेली. जेणेकरून इतर सर्वांना देखील त्यांच्या कार्याचा परिचय होईल.
हळूहळू एक एक जण आपापले मनोगत व्यक्त करून, कार्याचा परिचय देत होत्या. प्रत्येकीत असलेले वेगळे पैलू सर्वांच्या समोर येत होते. सर्वांना परिचित होत होते.
इतक्यात "डॉक्टर वर्षा यांनी, आपल्या कार्याची माहिती येथे विशद करावी."
असे तिच्या कानावर पडले .आणि ती उठली. स्टेजवर आली. व्यासपीठांसमोर उभी राहिली. 'पण काय बोलावे? असं विशेष कार्य माझं नाही. पण मग ज्या व्यक्तीमुळे माझा प्रवास हा या दिशेने सुरू झाला. त्याच व्यक्ती विषयी बोलावे.' म्हणून तिने बोलायला सुरुवात केली. "मला आजही तो दिवस स्पष्ट आठवतो…
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
वर्षा ही सर्व आवरून शाळेत जायला निघाली. तिची सकाळी सातला शाळा भरत होती. अक्षयची दुपारी होती. अक्षय म्हणजे वर्षाचा भाऊ. वर्षा आठवीत, तर अक्षय चौथीत होता. कालींदाबाई म्हणजे यांची आई. ह्या पण, सकाळी वर्षाबरोबरच घराबाहेर पडायच्या. त्या धुणी,भांडी करत होत्या.पतिने चार वर्षांपूर्वी भावकीतल्या वादावरून आत्महत्या केली होती. तेव्हापासून कुटुंबाचा सगळा भार कालींदा बाई वर येऊन पडला होता. उत्पन्नाचे दुसरे असे साधन काहीच नव्हते. म्हणजे हातावरचे पोट होते. म्हणाना. त्यामुळे बाईला पदर खोचून कामासाठी उभे राहावे लागले होते.
बाहेर पडता पडता कालींदाबाई वर्षाला म्हणाल्या," वर्षे, आज ना आडसकर बाईच्या इथे कार्यक्रम आहे. त्यांच्या सरांचा 51 वा वाढदिवस आहे. आणि तो ते मोठा करणार आहेत. म्हणजे सर्व मित्रांना, मैत्रिणींना आणि शालेय स्टाफला बोलावणार आहेत. आणि मग त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था पण केली आहे. मलाही मदतीसाठी त्यांनी यायला सांगितले आहे. म्हणून मग मी माझं काम आवरलं की तिकडे जाईल. वाट बघू नको. तू पण अक्षय ला घेऊन ये. तो शाळेतून आल्यावर."
"केवढं लांब लचक सांगितलं आहे."वर्षा म्हणाली. थोडं चालल्यानंतर दोघींचे रस्ते वेगळे झाले.
संध्याकाळी वर्षा अक्षय ला घेऊन आडसकर मॅडमच्या घरी गेली. छान पैकी दोघेही तयार होऊन गेले.
वाढदिवसाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. ही दोघे अगदीच वेळेवरती तेथे पोहोचले. घराच्या टेरेस वर मंडप दिला होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी.
उत्सव मुर्तीला, औक्षण करुन हार घालण्यात आला. मग अकरा सुवासिनींनी त्यांना ओवाळले.आणि सर्वांना मिठाई वाटण्यात आली.सर आणि मॅडम आज खूप खुशीत होती. त्यांची खूप जवळची नातेवाईक ही या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेली होती. या दोघांना मूलबाळ नव्हते.
कार्यक्रम संपल्यानंतरही मित्रमंडळींचे येणे सुरू होते. त्यानंतर त्यांचे भोजन. असे करत करत रात्रीचे नऊ वाजले. कालींदा मावशी घरी गेल्या नाहीत. म्हणून मुलंही तिथेच थांबलेली होती.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
कार्यक्रम उत्साहात पार पडला होता.थोड्या वेळानंतर सरांना अचानक चक्कर येऊन ते जागीच आडवे झाले.यामुळे सगळेच एकदम घाबरून गेले. लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले, उपचार सुरू होते.तरीही दोन दिवसानंतर सर गेले.
…...
काही दिवस मॅडमचे नातेवाईक त्यांच्यासोबत राहिले. कधी बहीण, कधी भावजय, तर कधी आई, जास्त तर आईच होती. म्हणून मग कालिंदा मावशींचाही जास्तीत जास्त वेळ तिथे जाऊ लागला. त्यांचे स्वयंपाकापासूनची सगळीच कामं ह्याच करायला लागलेल्या होत्या.मॅडम दुपारी घरी असल्यामुळे त्यांच्या सोबतीला मग त्या तिथेच थांबायच्या.
…..
दहावीचा रिझल्ट लागला. म्हणून मग वर्षांनी आडसकर बाईंना पेढे देऊन नमस्कार केला. आशीर्वाद देताना त्यांनी विचारले," किती मार्क्स पडले गं."
" 92 टक्के पडले मॅडम." वर्षांनी सांगितले.
हे ऐकून त्यांची सगळी इंद्रिये जणू जागी झाल्यासारखी झाली. मग त्या म्हणाल्या,
" कायऽ, माझा विश्वास बसत नाही गं."
" हो बाई, तिला दरवर्षी चांगले मार्क पडत होते. हुशार आहे माझी लेक."कालिंदा बाईने सांगितले.
"हो मॅडम, मी खूप अभ्यास केला. मला आईने ट्युशनही चांगलं लावलं होतं. दरवर्षीच ८०, ८५ च्या वरच मार्क पडत होते."वर्षा.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
आडसकर बाई खूप खुश झाली. आणि तिने भरभरून आशीर्वाद दिला," शिकून खूप मोठी हो. चांगली डॉक्टर हो." तिने आशीर्वाद दिल्यावर विचार केला, 'की हिची आई धुणीभांडी करून हिला डॉक्टर कशी करणार?'
यावर कालींदाबाई म्हणाली,
"खर्चाचे बघायला पाहिजे नाऽ.मी काय हे करू शकत नाही बघा."
"होईल काहीतरी. तु काळजी नको करु."
जरा वेळ विचार करुन मग त्याच म्हणाल्या,"मी घेते तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी.अन् या मुलीला मला डॉक्टर करायचंच आहे."
असं म्हटल्यावर कालींदाबाई ने त्यांचे पाय धरले.आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरले.
वर्षा ही ऐकून खूप खुश झाली.की आता मला पुढे शिकता येणार आहे म्हणून.
……
अकरावी बारावी नंतर नीट च्या परीक्षेसाठी तीनं खूप अभ्यास केला. मॅडमने दाखवलेल्या विश्वासाचे चीज करायचे होते. म्हणून तिनेही जिद्दच ठेवली.
एक दिवस एमबीबीएस ला नंबर लागला.
तर तिचं, मोठा बुके देऊन मॅडमने अभिनंदन करून खूप खूप शुभेच्छा दिल्या.
पुढील शिक्षणासाठी…
तसा या बाईचा स्वभाव मायाळूच होता. दुसऱ्यांची मदत करायला त्या नेहमीच पुढे असत. पण हे म्हणजे.. त्यांची ही काही स्वप्न होती आयुष्यात. पण ती अपुर्णच राहिली होती.त्यांचे आई होण्याचे स्वप्न, स्वप्नच राहिले होते.तर मुलांना उच्च शिक्षण देण्याचे हि…
त्यामुळे ती आता वर्षाच्या रूपाने पूर्ण होताना त्यांना बघायचे होते. म्हणून त्या खूपच खुश होत्या. आणि आपल्या नोकरी करण्याचे सार्थक होत आहे. हे पाहताना धन्यताही वाटत होती. आयुष्यातली जणू ही उत्तम गुंतवणूक ठरणार होती.
….
वर्षाचे एमबीबीएस कम्प्लेंट झाले. बाईने खूपच कौतुक करून आनंद साजरा केला. आईला आणि भावाला देखील खूपच आनंद झाला. अक्षयला मात्र डॉक्टर, इंजिनियर होण्याची आवड नव्हती. तर तो ग्रॅज्युएशन करता करता स्पर्धा परीक्षेची तयारी करणार होता.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
यादरम्यान बाईंना किडनीचा त्रास होऊ लागला होता. त्यासाठी त्यांच्या दवाखान्याच्या फेऱ्या वाढल्या होत्या. आता कालींदा मावशी आणि अक्षय त्यांच्याच घरात किरायाने राहत होती. एक चांगली आणि विश्वासू सोबत त्यांनाही हवीच होती.
त्यांना होणाऱ्या त्रासामुळे वर्षालाच त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागत होते. पण त्रास वरचेवर वाढतच जाऊ लागला. वेळेवर औषध पाणी करून ही परिणाम दिसेना. शेवटी त्यांना दुसरी किडणी प्रत्यारोपण करण्याचे ठरले.यामुळे मग वर्षाने इतर हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करून, तिने सांगितले,' की मला अशी अशी गरज आहे.'
पण उपयोग झाला नाही.मग हिने स्वतःचीच किडनी द्यायची ठरवली. तशी तिने टेस्ट केली.पण मॅच नाही झाली. म्हणून ती खुपच नाराज झाली.
तिची ही घालमेल बघुन आई म्हणाली,"अगं माझं तरी ते टेस्ट की काय ते करून बघ. झालं तर झालं. मी देते त्यांना माझी किडनी.तेव्हढंच जरा उतराई होता आले तर बरं वाटेल या जीवाला."
कारण या बाईंचे डोंगराएवढे हे उपकार होते.
आईची टेस्ट झाली. पॉझिटिव्ह रिझल्ट आला. हे पाहून वर्षा खुप खुश झाली.
योग्य वेळी दोघीचेही ऑपरेशन झाली. तिच्या मेडिकलच्या काही मैत्रिणी तिच्यासाठी वेळ काढून मदतीला आल्या. म्हणून तिला खूपच आधार वाटला. कारण घरातील दोघीही कॉटवर झोपून होत्या.
"वर्षा खूप खूप धन्यवाद बाई तुझे. तुझ्यामुळे आणि कालींदा मावशी मुळं मी आज जिवंत आहे. असे आडसकर बाई हात जोडून म्हणाल्या.
"धन्यवाद कसं म्हणताय? तुमच्यामुळेच ही पोरगी आज डॉक्टर म्हणून मिरवत आहे. हेच माझ्यासाठी आज स्वर्गसुख आहे. तिच्या शिक्षणाच्य बाबतीत तुम्ही तुमचा हात तिच्या डोक्यावर ठेवून जे केले आहे! त्याच, तुम्ही केलेल्या उपकाराची ही परतफेड केली आहे."असं म्हणून त्यांचे डोळे टिपं गाळु लागले.
यावर बाई म्हणाल्या, "नाही हो कालींदा मावशी. मला आज 'पैशापेक्षा माणसं महत्त्वाचे असतात' हे कळले. मी आयुष्यात, दाग दागिने भरपूर केले. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी ते घालूनही मिरवले. जागाही (प्लॉट) घेऊन ठेवली आहे. पण या गोष्टीपेक्षा माझ्या संकटकाळी तुम्ही दोघींही माझ्यासाठी धावुन आलात.. अगदी मरणाच्या दारातुन मला परत आणलेत.तुम्हि कसचे आभार मानतात माझे, उलट मीच तुमची खूप खूप आभारी आहे. आणि आज मला वर्षा तुझाही खूप खूप अभिमान वाटतो. मी आजपर्यंत केलेल्या कामांमध्ये माझे हे काम म्हणजे,'सौ टक्का सोना' असंच मी म्हणेन."
हे सर्व सांगताना त्यांनाही खूपच भरून आले होते.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
…..
काही दिवसातच वर्षाला गव्हर्मेंट चा जॉब मिळाला. तो करत करत तिने स्वतःचा दवाखाना ही चालू केला, गावातच.
आडसकर बाईंचे नाव तिने क्लिनिकला दिले. त्यांचे नाव साधना होते म्हणून
'साधना क्लिनीक'
हळूहळू हे क्लिनिक चांगले चालु लागले.
दररोज येणाऱ्या पेशंटच्या नावाची यादी करून प्रत्येक नावाची चिठ्ठी बनवायची. आणि मग त्या सर्वा मधून एक चिठ्ठी काढायची, आणि त्यामध्ये जे नाव असेल त्यांची फीस त्यांना परत करायची. अशी स्कीम तिने स्वतःच्या दवाखान्यात ठेवली. परंतु ज्यांना ती परत घ्यायची नसेल तर ती रक्कम 'गरीब होतकरू मुलांच्या शैक्षणिक उन्नती साठीची आर्थिक मदत' म्हणूनही तिने चालू केली होती.
या या योजनेला ही तिने 'साधनाबाईंचेच नाव दिले होते.तर ती रक्कम त्यामध्ये जमा करत होती. आणि या स्कीमचा लाभ बरेच विद्यार्थी घेत होते.
तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी स्त्रिया आणि मुलींचे हिमोग्लोबिन चेकअप ती, फ्रीमध्ये करून देत होती.आणि काही तक्रारी असतील तर त्यांच्या योग्य उपचाराचीही व्यवस्था, ती कमीतकमी फीस घेऊन करत होती.
हे सर्व म्हणजे, त्यांनी म्हणजेच आडसकर मॅडमच्या मदतीचे जे ऋण आहे ते ऋण या पद्धतीने फेडण्याचाच हा इवलासा प्रयत्न डॉक्टर वर्षा करत होती.
आणि हा प्रयत्न मी होईल तो पर्यंत नक्कीच करत राहणार आहे.असा तिचा निश्चयच होता.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
….
आत्याचे किडनीचे ऑपरेशन झाले. म्हणून मग आडसकर मॅडमचा मावस भाचा, जो मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशात होता. तर तो त्याचे शिक्षण पूर्ण करून,भारतात परतला होता. म्हणून मग तो आत्याला भेटायला आला होता.
ऑपरेशन होऊनही आत्या छान ठणठणीत आहे. हे बघून त्याला खूपच हायस वाटलं. कारण, तो तिसरी आणि चौथी या दोन
शालेय वर्षात आत्याकडे राहिलेला होता शिक्षणासाठी. म्हणून त्याला जरा त्यांच्याविषयी आपुलकी जास्त होती.त्यांनी केलेल्या मायेमुळे आणि प्रेमामुळेच.
त्यामुळे परत गावी आल्यावर, चार दिवसातच तो आत्याला भेटायला आला होता.
सकाळी वर्षाची भेट झाली, पण ती ड्युटी असल्यामुळे निघून गेली.
घरातील सर्व कामे कालींदा मावशीच करत होत्या. म्हणून मग त्यांची याच्याशी म्हणजे मेघराजशी ओळख करून दिली.
आणि,"या होत्या म्हणून मी आज जिवंत आहे. नाहीतर केव्हाच ढगात…"
पुढचे बोलण्या अगोदर मेघराज ने हात करून म्हटले की,"पुढचे आता काही सांगू नको." म्हणून त्या थांबल्या.
हे एकूण कालींदा मावशी म्हणाल्या," बाई तुम्ही असे हे मनावर ओझं घेऊन, दडपण येऊ देऊ नका. मला नाही चांगलं वाटत."
"ठीक आहे राहू दे, परत नाही असं म्हणणार. झालं तर."
पण त्यांच्या अशा बोलण्यातून हे स्पष्ट जाणवत होते की, त्या एक प्रकारच्या ओझ्याखाली वावरत होत्या.
यानंतर आडसकर बाईंनी वर्षाबद्दलही सगळे त्याला सांगितले. त्या पोरीनेही माझ्यासाठी खूप काही केले आहे.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
"मेघराज माझ्यासाठी काहीतरी करशील का?" असा त्यांनी बोलता बोलता मध्येच एकदम मेघराजला प्रश्न विचारला.
"हो करेन नाऽ तू सांगून तर बघ." मेघराज म्हणाला.
"मला काय वाटतं आहे.."
त्यांच्या मनातले मग त्याला सांगितले, प्रथम आढेवेढे घेतले पण मग तो तयार झाला.
डॉक्टर मेघराज, आणि डॉक्टर वर्षा यांचे आज लग्न होते.
मोजकीच पाहुणे मंडळी लग्नाला बोलावली होती. साधनाताईंच्या हातात अक्षदा होत्या. आणि त्या तिच्या म्हणजेच वर्षाच्या डोक्यावर टाकताना त्यांच्या मनावरचे ओझे मात्र हळूहळू हलके होत आहे. असे त्यांना वाटत होते. कालींदा मावशीने केलेल्या दानातून आज जरा उतराई झाल्यासारखे त्यांना वाटत होते.
तीचे हे मनोगत ऐकुन, सगळी कडुन टाळ्यांच्या कडकडाटा झाला.तेव्हा ती थांबली.
सौ. शुभांगी जुजगर.
(ही कथा पुर्ण काल्पनिक आहे 🙏🏻)
0 टिप्पण्या