फॉलोअर

दैव लेखना कुणा कळला... भाग -२

 दैव लेखना कुणा कळला भाग -२ 


मागील भागात..

तसा "वहिनी तुझाही उखाणा छानच होता.बाळसे येईल बघ आता घराला. यात शंकाच नाही."

हे ऐकुन विश्वासला बरे वाटले.उखाणा ऐकुन,' मस्त' 'छान' असं सर्वांच्या तोंडातून सहजच बाहेर पडले.

त्यानंतर उंबऱ्यावर ठेवलेल्या मापाला हलकासा धक्का देऊन, त्या तांदळाच्या राशीवरून मीराने गृहप्रवेश केला.


आधी देवघरात जाऊन, दोघांनीही देवदर्शन घेतले. त्यानंतर आजीचे दर्शन घेतले.

नंतर आईसमोर ते वाकले. तर आई म्हणाली, "माझ्या आधी तुझ्या बाबांचे दर्शन घ्या.नंतर माझे." आई असं म्हणाल्यावर ते दोघेही वडिलांच्या फोटोपुढे येऊन उभे राहिले.

तिथे विश्वास त्यांच्या फोटोकडे पाहत म्हणाला, "बाबा ही तुमची सुन. तुमचे आशीर्वाद असेच सदैव तिच्याही पाठीशी राहू द्या." असं म्हणत दोघांनीही हात जोडून नमस्कार केला.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

त्यानंतर मग आईला वाकुन नमस्कार केला. तर आईचे डोळे भरभरून वाहत होते. तिला नवऱ्याची उणीव पदोपदी जाणवत होती. जवळजवळ दहा महिने उलटून गेले होते. पण ती अजूनही दुःखातून सावरलीच नव्हती.

असं बघून मीरा त्यांच्या जवळ बसली. आणि त्यांचे अश्रू पुसत म्हणाली,"आई, एक माणूस गेले, पण एक माणूस आता घरात आले आहे. मी सात वर्षाची असतानाच माझी आई देवा घरी गेली.लहान होते. दुःख खूप होते, ते पदोपदी जाणवत होते.'आई नाही' ही जाणीव ठेवूनच आम्ही बहीण, भाऊ मोठे झालो.पण ती उणीव आज तुमच्या रूपाने भरून निघाली आहे. कराल ना माझ्यावर मुलीची माया?"

तिचं हे बोलणं ऐकून, ताराबाईला म्हणजेच विश्वास च्या आईला आणखीच गलबल्यासारखे झाले. आणि त्यांनी तिला आपल्या मिठीत घेतले. आणि दोघेही विरघळत राहिल्या मायेच्या प्रवाहात! वात्सल्याच्या डोहात!!

****


दिवस जात होते. मीराची गरीबीची चटके, आणि मायेची उणीव या दोन्ही पासून सुटका, इथे आल्याने झाली होती. त्यामुळे ती आनंदात होती. विश्वास लाही मिरेच्या सोबतीने 'घरात चैतन्य नांदतय' याचा पदोपदी प्रत्यय येऊ लागला. वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली, औदासिन्याची पोकळी मीराच्या असण्याने हळुहळू भरायला लागली होती.

विश्वासला एक म्हणजे लहान भाऊ होता. पण शिक्षणाच्या निमित्ताने तो बाहेरगावी म्हणजे शहरात राहत होता.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

 लग्नानंतर काहीच दिवसात मीरा आई झाली. तिला मुलगा झाला. आणि त्याच्या चिवचिवाटाणे घर अगदी भरून गेले.


मीराच्या लग्नानंतर तीन-चार वर्षांनी विद्येचे लग्न झाले. मुंबईला कंपनीमध्ये नोकरीला असणारा मुलगा, तिला नवरा म्हणून मिळाला. चांगल्या पोस्टवर तो काम करत होता. घरची माणसंही बरी होती. त्यामुळे सगळेच खुश होते. तिच्या मनासारखे तिला नवरा आणि सासरघर मिळाले म्हणून.


लग्नानंतर काहीच दिवसात.

विद्या नवऱ्यासोबत म्हणजे अरुणसोबत मुंबईला राहायला आली. छोट्या छोट्या दोन रूमचं घर किरायाने केलं होतं.

ऑफीसला जाण्यासाठी सकाळीच साडेआठला अरुणला घरून निघावे लागत होते. नाश्ता करून आणि दुपारचा टिफिन घेऊन. त्यामुळे विद्याला लवकर उठून अरुणचा डब्बा आणि नाश्ता करून द्यावा लागत होता.

 मुंबईत आल्यावर येथील झगमगाट बघून तिला खूप छान वाटलं. सगळ्या प्रकारची वस्त्र घालणाऱ्या महिला आणि मुली. त्यांची विविध प्रकारच्या हेअर स्टाईल बघून तिला वाटायचे, गावी म्हणजे तिच्या माहेरी सगळ्यांची वेणी किंवा मग मागे केसांना क्लिप लावलेली, क्लच लावलेली, अशाच तिने पाहिलेल्या होत्या. तसं तिचं शहरात जास्त कधीच येणं जाणं नव्हतं. मामाच्या गावी जाणं व्हायचं सुट्टीत. पण तेही खेडेगावातच होते. हा फक्त दोनदा मावशीच्या गावी म्हणजे धुळ्याला ती जाऊन चार चार दिवस राहून आली होती. पण ते चार दिवस राहणं वेगळं, आणि आता हे कायमचं राहणं वेगळं.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

फ्लॅटमध्ये घर होतं. दार बंद करून दिवसभर घरातच राहावं लागायचं. शेजारी कोण आहेत ?तिला कल्पनाही नव्हती. 

नवीन नवीन हे खूप तिला छान वाटत होतं. खेड्यातील वातावरणापासून आपली सुटका झाली आता. पण काहीच दिवसात तीला हे जीवन नकोसे वाटू लागले.


अरुण सुट्टीच्या दिवशी तिला घेऊन जायचा फिरण्यासाठी. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, चौपाटी, महालक्ष्मी, हाजी अली, सिद्धिविनायक असे भरपूर फिरण्याचे पॉईंट तिला दाखवले. हे मुंबईचे वैभव पाहून तिला कळाले की, का लोक एवढे मुंबईच्या प्रेमात पडतात ते!!


नंतर नंतर मग ती साडेचार पाच वाजता थोडंसं घराबाहेर पडू लागली. काहीतरी आणण्याच्या निमित्ताने किंवा भाजी वगैरे आणण्याच्या निमित्ताने. आणि आजूबाजूच्या परिसराचा थोडा थोडा परिचय पण करून घेऊ लागली.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

असेच एक दिवस ती आवरून पायऱ्या उतरत असताना मागून तिला एक बाल येऊन लागला. तिने मागे वळून पाहिले तर एक तीन वर्षाची मुलगी आणि तिची आजी उभी होती. तिला पाहतच आजीने विचारले," लागलं का हो ताई?" 

हे ऐकून विद्याने बोल उचलला.आणि तो त्या छोट्या मुलीला देत म्हणाली,"मी हा बोल देईन, पण एका अटीवर."

हे ऐकुन आजी थोड्याशा कोड्यात पडल्या.

 तिचं हे बोलणं ऐकून,"कशाची??"

त्यांनी विचारले.

"तुम्हा दोघींना माझ्याशी मैत्री करावी लागेल. चालेल? नाहीतर मी बोलत नाही." विद्यानी सांगितले.

 

तिचं हे बोलणं ऐकून आजीला बरं वाटलं. नाही तर त्यांना वाटले की,' अशी कोणती अट घालती ही बाई आता, काय माहित??'

"होऽऽ अगदी चालेल, चालेल नाही तर पळेल बरंका?कुठे राहाता तुम्ही?"आजींनी आनंदाने तिला विचारले.

"हे काय,माझे घर इथे आहे."घराकडे बोट करत विद्याने सांगितले.

"आम्ही पण इथेच तर राहातो.अगदी तुमच्या घरा समोर." 

अशीच मग या आजीची आणि विद्याची मैत्री झाली.ती लहान मुलगी म्हणजे 'प्राजु' हिची पण छानच तिला करमणुक होऊ लागली.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

असेच मग तिचे आनंदात दिवस जात होते. प्राजूच्या मम्मीचे आणि हिचेही छानच गुळपीट जमले. तिच्या दोन्ही प्रेग्नेंसी मध्ये या दोघी सासु सुनांनी तिचे डोहाळे पुरवले. हवं नको बघितलं. शिवाय अडचणीलाही त्याच असायच्या.

 विद्याला दोन्ही मुलंच झाली.तिला दुसर्या वेळी मुलींची खुप अपेक्षा होती पण!!


 घरात दोन मेंबर वाढल्यामुळे ते लहान पडू लागले. म्हणून मग दुसरीकडे राहायला गेली. समोरची फॅमिलीही दुसरीकडे राहायला गेली. पण कधीतरी भेट होऊ लागली. पण रविवारी ही मुलांना घेऊन चिल्ड्रन पार्कमध्ये जायची. तर तिथे प्राजु आणि तिचा लहान भाऊ आजी सोबत यायचा. मग तिथे गप्पांना रंग भरायचा. इतरही तिला मैत्रिणी झाल्या होत्या.

 हळूहळू ती छान रमली या शहरात. सासरच्या गावी सुट्टीमध्ये एखादी चक्कर असायची तिची. मुलांना घेऊन.

तिचा नवरा अरुण हा घरात मोठा होता. लहान भाऊ होता, पण तो सावत्र होता.अरुणची आई लहानपणीच वारली होती. लहान भावाचे लग्न झाल्यानंतर, वडिलांनी आहे ते सर्व या दोघांना वाटुन दिले होते.आणि ते मोकळे झाले. ती दोघेही वेगळे राहत होते.

 'तुम्ही तुमचं सांभाळा, म्हणजे झालं. आता माझ्या डोक्याला ताण नको.'

 असं म्हणून त्यांनी सगळ्यातून अंग काढून घेतले होते. असेच दिवस जात होते. मुले हळूहळू शाळेत जाऊ लागली.

 पण कुठे कोणाची नजर लागली काय माहित? कुठे माशी शिंकली काय माहित?


एक दिवस अरुणच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये आर्थिक गोंधळ झाला. तो कोणी केला माहित नव्हते?पण बॉसने अरुण आणि त्या त्याच्या टीमला जबाबदार धरले होते. या सगळ्यामुळे अरुणला कंपनीने तात्पुरते कामावरून कमी केले.


त्यामुळे अरुण खुपच डिस्टर्ब झाला. याचा परिणाम साहजिकच घरावर झाला. घरातील माणसावरही झाला. कंपनीत झालेले आर्थिक नुकसान पुर्ण टीमला भरुन द्यावे लागले. कोर्टात केस चालू होती. योग्य निकाल लागला की पैसे परत मिळणार होते.

पण तोपर्यंत काय होणार?? हा मोठा प्रश्न होता.दुसर्या कंपनीमध्ये काम मिळणे शक्य नव्हते. या मानसिक दडपणाखाली तो सतत वावरत होता.

एक दिवस घरात कोणीही नव्हते. असे पाहुन त्याने …

*****

झाले विद्या चे जग सुने सुने झाले. मुलांची संसाराची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली. तसा माहेरचा भक्कम आधार तिला होता. तर सासरी फक्त सासरेच जवळचे होते.

पण तेही एक वर्षापूर्वी गेले होते.आई ही सावत्र होती.त्यामुळे मायेचे कुणीच नव्हते.

'मुलांच्या शिक्षणा साठी येथेच राहायचे' असे तीने ठरवले.

आणि म्हणुनच लेडीज गारमेंटच्या फॅक्टरीमध्ये तिने नोकरी करायला सुरुवात केली.

हे तिला सुरुवातीला खुप जड गेले. पण केल्या शिवाय पर्याय नव्हता. मागे असं काही नव्हतं. गावी शेती होती पण त्या मधील काही शेती अरुणने विकुन पैसे भरले होते. त्यावर ती अवलंबून राहु शकत नव्हती.

म्हणुनच हिला पदर खोचून कामाला लागावे लागले.मुलांचं भविष्य चांगले घडवणे एवढेच तीचे ध्येय होते. अरुणच्या पाठीमागे.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

*****

मीराला हे सगळं आठवून एक वेगळीच जाणीव तिच्या मनात निर्माण झाली होती. विद्याविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. मीराने झालेल्या या आघातातून स्वतःला सावरत मोठ्या धीराने संसार सावरून धरला होता.जणु स्वतः ला सिध्द करण्यासाठी.

'मुलं आणि नवरा हेच स्त्रीसाठी विश्व असते.

यातील नवरा रुपी आधार निखळल्यावर मुलांना आधार देण्यासाठी, तिला स्वतः ला कणखर व्हावंच लागतं.मानसिक आणि शारीरिक रित्याही बलवान व्हावेच लागते.


विद्याविषयी असा हा विचार करून,' तीचे कौतुक करावे' असे मीराला मनोमन वाटायला लागले होते.

विद्याला छानसं एक गिफ्ट द्यावं. ही कौतुकाची थाप तीचे मानसिक बळ नक्कीच वाढवेल.

असे तिला वाटले. आणि ती उठली.

भाग १

सौ. शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या