मायेची शिदोरी..
उज्वलाने मोबाईलवर व्हाट्सअप वरील मेसेज बघितले. काही जणींना रिप्लाय पण दिला. आणि फेसबुक वरही जाऊन ती फेरफटका मारून आली. पण आज कुठेच चित्त स्थीरावले नाही. म्हणून थोडेसे उदासल्यासारखेच तिला वाटले.
मुलं दोघेही, म्हणजे पार्थ आणि शुभ्रा चार वाजता ट्युशनला गेली होती. त्यांची रुटींग ठरलेले होते.
सकाळी आठला शाळेला, दुपारी दोन ला घरी. घरी आल्यावर फ्रेश होऊन शाळेचे काहीतरी करत बसायचे.
शुभ्रा ही चौथीला तर पार्थ हा सहावीला होता. दोघेही एकाच शाळेत होती.
संध्याकाळचे पाच वाजले होते. तिला यावेळी मस्त चहा लागायचा. म्हणून ती किचन कडे वळली.आणि तिने चहा ठेवला. मग सहजच भाज्या काय आहेत? म्हणून फ्रीज उघडून बघायला गेली. तर त्यात भाज्या अशा काहीच नव्हत्या.फक्त बाहेर बटाटे आणि कांदेच तेवढे शिल्लक होते. म्हणून मग तिने मिस्टरांना फोन केला," अहो ऐका ना."
तिकडून," बोला राणी सरकार." राजने म्हणजे हिच्या अहोनीं विचारले.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
"येताना भाज्या आणा ना संध्याकाळी. भाजीला काही नाही. आणि सकाळीच्या डब्याच्या भाजीसाठी पण काही नाही." उज्वला म्हणाली.
"माझी आज सात वाजेपर्यंत मीटिंग आहे. मलाच उशीर होणार आहे आज. तुला जमत असेल तर तु जा,आणि घेऊन ये." असे तिकडून राजने सांगितले.
एवढे बोलेपर्यंत तिचा चहा उकळून तिने गाळूनही घेतला होता. तिने चहा पिता पिता, 'आता आपल्यालाच भाजी घेऊन यावी लागेल. चला जाऊया' असं म्हणून तिने आवरायला घेतले.
घरापासून दहा मिनिटावर भाजी मार्केट होते. चला तेवढे चालणे होईल म्हणजे जरा शरीराला व्यायामही होईल. आणि भाजी आणणे होईल,असा विचार करत करतच ती तयार झाली.
भाजी मार्केट जवळच तिला शिल्पा म्हणजे तिची मैत्रीण भेटली. तिची भाजी खरेदी करून झाली होती. आणि ती परत निघालीही होती. "काय गं, किती दिवसांनी भेटते आहेस!"असे तिला पाहताच उज्वलाने उत्साहाने विचारले.
यावर शिल्पाने तितक्याच आनंदाने सांगितले, "अगं बाई डिलिव्हरी नंतर या आठ दिवसातच मी बाहेर पडायला लागलेआहे. म्हणूनच तुझी माझी कदाचित भेट झाली नसेल.आज झाली की नाही? असंच आता भेटत जाऊ."
"बरं बाई, ठीक आहे.मी तेच म्हटलं इतक्या दिवसानंतर तू दिसतेस म्हणून?" उज्वला म्हणाली.
"मी भाजी घेण्याच्या निमित्ताने येते इकडे मार्केटमध्ये. त्याचवेळी काही इतर सामानही, म्हणजेच किचन मधील काही वस्तू किंवा
बाळासाठी असं काही वेगळे दिसले तर, आपल्याला घ्यावे वाटले की घ्यायचे."शिल्पा.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
"हो का! बरं झालं.आपल्याला लागणार्या वस्तूही मग आपल्या पसंतीने घेता येतात."उज्वलने सुचक असं सांगितलं.
तिचे हे ऐकून शिल्पा म्हणाली," होना म्हणुनच मी येते."
"हे काय तु भाजी घेतलेली दिसते आहे."उज्वला.
"हो. आज ही छान दिसली मला. मस्त गोल गोल पान आणि लाल किनार असलेल्या पानांची ही भाजी आहे. मला ही भाजी फारच आवडते. आणि या भाजीचे थालीपीठ किंवा धपाटे हे तर माझ्या खूप आवडीचे आहेत. आज माझा तोच बेत आहे."शिल्पाने एका दमात सगळे सांगून टाकले.
"मुलं वगैरे कशी आहेत?"उज्वलाने विचारले. "मुलं बरी आहेत. मोठा ट्युशनला गेला आहे. आणि लहाना त्याच्या आजीजवळ खेळतो आहे."शिल्पा.
थोडं थांबुनपरत ती म्हणाली,"चल येते, उशीर नको व्हायला. ठीक आहे, बायऽ बायऽ." असं म्हणून ती चालू लागली.
शिल्पा ही उज्वलाच्या माहेरची. दोघीही एकाच शाळेतल्या. पण उज्वलाही पुढील वर्गात होती. आणि शिल्पा मागील वर्गात होती. दोघींच्या घरातले अंतर जास्त नव्हते,म्हणून या दोघीही शाळेला बरोबरच जात होत्या.
ती मार्केटमध्ये आली. इकडून तिकडे जरा फिरली. तिला दोन-तीन ठिकाणी ताजी ताजी मेथी दिसली. आणि तिलाही मग,'मेथीच घ्यावी, आणि छान आपणही धपाट्याचा बेत करावा' असं तिच्या मनात चमकून गेलं.
झालं.. मग तिनेही ती भाजी घेतली.आणि आणखी दोन भाज्या तिने घेतल्या.
आणि परत घराकडे निघाली. घरी येऊन मुलं ट्युशनहुन आली होती, आणि बाहेर खेळायला गेली होती.
आणलेली भाजी तिने आधी व्यवस्थित निवडुंग घेतली.मग स्वच्छ धुऊन घेतली. आणि धपाट्या साठीची इतर तयारी करायला घेतली. लसुन, मिरची, कोथिंबीर, जिरे, थोडेसे तीळ, आणि न विसरता ओवा ही तिने घेतला. ओवा घेताना मात्र तिला सासूबाईंची तीव्रतेने आठवण झाली. त्या कधीच ओवा टाकल्या शिवाय, धपाटे आणि भजी करत नसत.
सासुबाई ची आठवण झाली. म्हणून तो दिवसही तिला आठवला.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
"अगं राधा, मला माझ्या मित्रांसोबत तीन दिवस देव दर्शनाला जायचे आहे. तेव्हा मला काही शिदोरी करून दे." असं उज्वलाच्या सासर्यांनी सासूबाईंना सांगितले.
"बर देते करून, थोडे दामट्याचे लाडू करून देते. आणि थोडे धपाटे आणि दशम्याही करून देते." सासूबाई म्हणाल्या.
"बरं काही सामान आणायचे असेल, तर मला सांग. मी तुला आणून देतो."सासरे म्हणाले.
"हो चालेल, जाण्याचे एक दिवस आधी लाडू करून ठेवते. आणि ज्या दिवशी निघायचे आहे, त्या दिवशी धपाटे आणि दशम्या करून
देते." असं म्हणून मग त्यांनी काय काय आणायचे तेही सांगितले.
तेव्हा हिचे, म्हणजे उज्वलाचे नवीनच लग्न झाले.
तर मग. ज्या दिवशी सासर्यांना निघायचे, त्या दिवशी सासुबाईंनी थोड्या दशम्या आणि जास्त धपाटे केले होते.दुधातली दशमी ही नरम राहते आणि खायला ही छान लागते.म्हणुन दशम्या ह्या दुध टाकुन केलेल्या होत्या. आणि धपाटे हे ताकात केले होते.हे खाताना चवदार तर लागतातच, आणि खाता असताना कोरडेपणा जानवत नाही. त्या सोबत भरपुर लसुन आणि जिरे घालुन केलेली शेंगदाण्याची किंवा खोबर्याची चटणीही पाहिजे.अशी ही शिदोरी प्रवासात नक्कीच बरोबर घेऊन जावी.
तर त्या दिवशी खाल्लेल्या धपाट्याची चव अजुनही जिभेवर रेंगाळते आहे.
अशी सासु सुगरण होती.तिच्याच हाताखाली उज्वलाबाईनेही खुपश्या अशा गोष्टी शिकुन घेतल्या होत्या.
पण काहीच दिवसांपूर्वी तीचे सासुबाईं आणि सासरे दोघेही गेले.आता फक्त त्यांच्या आठवणींची सोबत होती.अश्याच काही
वेळप्रसंगी त्यांची आठवण काढायची. झाले..
या आठवणीत ती क्षणभर रमली.
पण लगेच पुढे घेतलेले पीठ, त्यात टाकलेले सर्व चवीचे पदार्थ आणि मस्त बारीक चिरून ठेवलेली मेथी ही टाकली. आणि पीठ छान मळून ठेवलं.
त्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी केली. या चटणी मध्ये दही टाकून छान मिक्स करून, नंतर वरून फोडणी टाकली. तर त्या फोडणीतल्या हिंगाचा वास घरभर दरवळला. नंतर तिने धपाटे करायला घेतले.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
रात्री सगळे जण जेवायला बसले.
"आज काय धपाटे केलेस का काय?" राजनी विचारले.
"हो भाजी आणली होती मेथीची. म्हणून बनवले." उज्वलाने सांगितले.
"वाऽ वाऽ छान केलं. वेगळी डिश बनवली." मुलांकडे बघत तो म्हणाला,"काय आवडलेत का मुलांनो?"
"होऽ, मला खूप आवडले आहे. खूप दिवसानंतर आईने अशी ही जाड तिखट पोळी केली आहे. हो ना आई?" आईकडे पहात पार्थ ने तिला विचारले.
पार्थने सांगितल्यावर लगेच शुभ्राही म्हणाली. "हो मला पण आवडली, ही तिखट पोळी. पण मला तिखट लागतेआहे ना गं. तू ना मला उद्या फिकी चटणी आणि अशीच पण फिक्की पोळी करून दे डब्यामध्ये.," असं तिने सांगितले.
तिचं ऐकुन मग पार्थ ही म्हणाला," मलाही उद्या डब्यात अशीच पोळी बनवून दे. देशील ना?"
"हो हो देईल, बरं का दोघांनाही. चला आता जेवा पोटभर." असं म्हणून ती जेवायला लागली. आणि आणखीन कोणाला काय पाहिजे असं विचारायला लागली.
पण जेवता जेवताच राज मात्र शून्यात पहात स्वतःमध्येच हरवला, आईच्या आठवणीत..
राज तेव्हा नववी मध्ये होता. नवरात्राचे दिवस होते. आणि वर्गातील काही मुलांनी जवळच असलेल्या देवीच्या दर्शनाला मिळुन जायचे ठरवले.तर मग प्रत्येकाने दुपारच्या जेवणाचा डबा तिथे खाण्यासाठी घ्यावा असेही ठरले.
म्हणुन आईने मला डब्यात नेण्यासाठी मस्त मेथीची धपाटी करून दिली.
सगळे मग फिरत फिरत डोंगर चढुन देवीच्या दर्शनासाठी गेलो.
दर्शन घेऊन आम्ही सर्व छान गोल रिंगण करून बसलो. आणिअंगत पंगत करत जेवणं केली. तर हे आईने दिलेले धपाटे सर्वाना आवडली होती.
जेवणं झाल्यावर तीथं मोठं मैदान असल्याने, मग कबड्डी खेळायचं ठरलं. दोन टीम केल्या.आणि खेळायला सुरुवात झाली.थोडे खेळुन झाल्यावर,खेळता खेळता राजचा पाय थोडा नाही चांगलाच मुरगळला. त्यानंतर मग खेळच थांबला. आणि सर्वजण परतली. घरी येईपर्यंत पाय चांगलाच जड वाटत होता. आणि दुखायला ही लागला होता. आईने पायाला बाम लावून हलकासा चोळून दिला. थोडा शेकूनही काढला. बरे व्हावे म्हणून. आणि जास्त होऊ नये म्हणून. मग तो घरातच अभ्यास करत बसला.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
पण रात्री पाय बराच सुजला आणि तापही आला. वडिलांना यातले काही सांगितले नव्हते. ते घरी नव्हते. रात्री आले. त्यावेळी फक्त 'काही नाही, पाय थोडा लचकला आहे' असेच सांगितले.
पण रात्री तो जास्तच फन फन करू लागला. आणि अंगात तापही भरला. तापाची गोळी घेतली. आणि आई मात्र रात्रभर माझ्या जवळ बसुन,पायाला अधून मधून शेकत होती. तिनेही रात्र जागून काढली होती माझ्याबरोबर. तिच्या जीवाची होणारी घालमेल, मी रात्री बघितली.
'हे करू का?' 'ते करू?' का 'पाणी देऊ का?' 'भूक लागली असेल तर बिस्किट खाना' असं तिचं चालूच होतं.
मग उशिरा चार वाजता मला झोप लागली. त्यानंतर मग तीही झोपली असेल.
सकाळी परत सहाला उठून तिची काम सुरू होती.
सकाळी मग वडिलांनी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी चेक करून तीन दिवसाच्या गोळ्या दिल्या. आणि 'आजच्या दिवस शाळा आणि खेळ बंद ठेवा. उद्या नक्कीच बरे वाटेल' असे सांगितले.
"आहो जेवता ना?" राजच्या तोंडासमोर हात फिरवत उज्वला म्हणाली.
तेव्हा कुठे राज आठवणींच्या तंद्रीतून बाहेर आला.
"अहो कुठे हरवलात?" उज्वलाने विचारले.
"हे, ते लहानपणीची आईच्या आठवणीत हरवलो होतो.तिच्या हातचे धपाटे खूपच खमंग आणि चविष्ट असायचे. अगदी तसेच आज तू बनवले आहेस. थेट आईच्या हाताचीच चव आहे.तू ही खा." असं म्हणत राज जरा भावुक झाला. आई-वडिलांच्या आठवणीने त्याचे डोळे ही पाणवले.
राजला असं पाहून उज्वला ही थोडी दु:खी झाली.
म्हणून मग ती म्हणाली," मला तुम्हाला हर्ट करायचे नव्हते. सॉरीहं."
"असू दे, तसं काही नाही. आई-बाबा जरी आज आपल्याबरोबर नसले, तरी खूप सुंदर अशा आठवणी तर आहेत ना! त्या आठवणीत रमायचे, त्यामुळे मनाला शांत आणि छान वाटते."
"हो नक्कीच," उज्वलाने मान हलवत म्हटले. आणि सर्वांनी आनंदाने हसत खेळत जेवण केली.
सौ. शुभांगी सुहास जुजगर.
(ही कथा पुर्ण पणे काल्पनिक आहे.)
0 टिप्पण्या