अनामिका ती..
आज सुट्टीचा दिवस. म्हणजे रविवार होता. शारदा ताई पुस्तकात डोके घालून बसल्या होत्या.
घड्याळात चार चे टोल पडले.
तसे शंकरदादा शारदाताईंना म्हणजे त्यांच्या पत्नीला म्हणाले,"अहोऽ चहा ठेवा ना जरा."
हे ऐकून त्या 'बरं' म्हणाल्या.पुस्तकात वाचण्यासाठीची निशानी ठेवुन त्यांनी ते मिटले, आणि टेबलावर ठेवून त्या उठल्या.
काही वेळातच त्यांनी दोघांसाठी चहा करून आणला. आणि चहा पिता पिता दोघांच्या गप्पाही सुरू झाल्या.
तेव्हा शारदाताई म्हणाल्या,"आहो तुम्हाला गेल्या काही दिवसापासून मला काहीतरी सांगायचे आहे पण…!"
"पण काय?"यावर शंकर दादांनी विचारले.
"मी पंधरा दिवसांपूर्वी नाही का माहेरी गेले होते. त्यावेळी बस मध्ये काय झाले..…"
त्यांचे वाक्य पुर्ण होण्या अगोदरच शंकर दादांनी विचारले,"एवढ्या म्हणजे पंधरा दिवसांनी तु मला सांगते आहेस."
"हो ना. एवढा असा निवांत वेळच नाही मिळाला.या दिवसांमध्ये." त्यानंतर शारदाबाई घडलेला प्रसंग सांगू लागल्या..
*******
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
हातातली पर्स आणि बॅग सांभाळत, शारदाताई बस स्टॅन्ड मध्ये येऊन बसलेल्या. त्यांना येथे सोडून शंकर दादा निघून गेले. म्हणजे त्यांचे मिस्टर.
शारदाताई च्या माहेरी छोटासा कार्यक्रम होता. म्हणून त्या एकट्याच निघाल्या होत्या. त्यांना सोडून मिस्टरही निघून गेले होते. त्यांना त्यांच्या ड्युटीवर जायचे होते म्हणून. तसे शारदाताई याही शिक्षिकाच होत्या, प्राथमिक शाळेवर. पण या कार्यक्रमाला जाणे आवश्यक होते, म्हणून त्या एकट्याच निघाल्या होत्या.
थोड्याच वेळात बस आली. आणि त्या बस मध्ये बसल्या.गर्दी नसल्याने जागा व्यवस्थित मिळाली. खिडकी जवळ बसल्या मुळे बाहेरचे दिसणारे सृष्टी सौंदर्य त्यांना बघता येणार होते.
त्यानंतर पहिल्या स्टॉप वर गाडी थांबली. आणि तिथे गाडी गाडी गच्च भरली. मग यांच्या शेजारी त्यांनी एका मुलीला बसवले. मुलगी म्हणजे वीस/एकवीस वर्षाची असेल. तिच्याबरोबर दोन तरूण होते. तिचा नवरा होता की आणखी कोण? माहीत नाही.
काही वेळाने कंडक्टर तिकीटही काढून गेला. तो गेल्यानंतर शारदाताईने त्या मुलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण ती तुटक आणि तेवढेच बोलत होती.
"कुठे जायचे?"
"कुठून आला?"
हे साधे सरळ प्रश्न.. पण तिने त्याचेही तुटकच उत्तर दिले.
'जाऊदे.. असेल कुठलीही काय करायचे आपल्याला!!'असे मनाला त्यांनी समजावले.
अन् त्या परत आपल्या मोबाईल मध्ये हरवल्या.
काहि वेळ गेल्यानंतर..
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
तिच्याबरोबर असणाऱ्या एका युवकाचा फोन वाजला. साहजिकच यांचे कान तिकडे टवकारले.
त्याने फोन उचलला आणि हॅलो म्हणायच्या आत तिकडून व्यक्ती बोलला,"हॅलोऽ काय हाल आहे?"
गाडीचा आवाज येत होता,तरीही शारदा ताईंच्या तीक्ष्ण कानानी फोन वरील संवाद ऐकला.
"हो, काम झाले आहे. नो प्रॉब्लेम." यानी सांगितले.
"ठीक आहे. मी सांगेन तिथे उतर. तिथे मी गाडी पाठवतो."
"ओके." हा म्हणाला.
हा फोनचा संवाद पुसटसाच त्यांच्या कानावर पडला. त्यामुळे शारदाताई थोड्या सावध झाल्या. आणि काहीतरी गडबड नक्कीच आहे. असं त्यांच्या मनात आलं. त्या युवकाच्या आणि बसलेल्या मुलीच्या हालचालीचे बारीक निरीक्षण त्या करू लागल्या.
न राहवून त्यांनी परत विचारलेच,
"लग्न झालं का गं तुझं?" असं विचारुन त्या मुलीला छेडण्याचा प्रयत्न केला.
"हो." ती म्हणाली.
"हे तुझे मिस्टर आहेत का बरोबर?"
"नाही." ती म्हणाली.
"मग कोण आहे?" शारदाताई.
"नाहीऽ ते.." ती असं चाचरत चाचरतच म्हणुन लागलीहोती. पण तिने काहीच सांगितलं नाही. कारण तो युवक तिला रागावू लागला. बोलू देत नव्हता. त्याने डोळ्यांनीच तिला खुणावले होते. काही सांगू नको म्हणून…
बहुतेक याला माझा संशय आला की काय..?
म्हणून मग ह्या शांत बसल्या,आणि खिडकीतून बाहेरचे निसर्गदृश्य न्याहाळू लागल्या.
पण मनात मात्र विचारांचे भुंगे सारखी कुरतडतच होते.प्रश्न आणि प्रश्न यांचें युद्ध सुरू होतं. हे गौड बंगाल नक्की काय आहे? कसं शोधायचं बरं? यासाठी काय करावे? असे अनेक प्रश्न फिरून फिरून त्यांच्या मनाला ढवळीच होते.
म्हणून मग त्यांनी हलकेच डोळे मिटून घेतले. आणि अंतर मनात डोकावून पाहू लागल्या. आणि एक दुसरा मार्ग त्यांना सापडला..
क्षणाचाही विलंब न लावता…
त्या पर्स घेऊन उठल्या ..
आणि त्या मुलीला त्यांनी सांगितले," मला मळमळ होत आहे. मी पुढे चाललेआहे. पण माझी बॅग वरती आहे लक्ष ठेव."
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
असे म्हणून त्या हळूहळू पुढे आल्या.आणि त्यांनी कंडक्टरच्या कानात काहीतरी सांगितले.
त्या नंतर ती गाडीच्या पायऱ्यावर बसली. कंडक्टरला काय समजायचे ते समजले. त्याने मागे चक्कर मारली.आणि त्या दोन मुलांची चौकशी केली असता त्याला ही जरा संशय आला.
त्याने ड्रायव्हरला योग्य सूचना दिली. गाडी सरळ परत फिरवून ती पोलीस स्टेशन कडे निघाली.
जात असताना गाडीतील प्रवासी ओरडू लागले.. तर मग त्यांना शांत करण्यासाठी कंडक्टरने सर्वांना सांगितले की..
"गाडीतील एक विशिष्ट पार्ट खराब झाला आहे. पुढे गाडीला तो धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सर्वांनी शांत रहा आणि सहकार्य करा."
हे असे त्याने सर्वांना सांगितले, त्यांना कुठलाही संशय यायला नको म्हणून…
गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली. पोलिस स्टेशन मध्ये आल्यानंतर, तीला मग भीती वाटायला लागली.
इथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारपूस चालू केली. तर त्यांनाही या मुलांवर आणि मुलीवर संशय आला. तिच्या बॅगेची झडती घेतली असता ज्वेलरी आढळून आली. आणि जी सोन्याची होती. त्यामुळे संशय आणखीनच बळावला. त्या तिघांनाही त्यांनी ताब्यात घेतले.
काही प्रोसिजर कंप्लीट होईपर्यंत कंडक्टर ड्रायव्हर या दोघांनाही तिथे थांबावे लागले.
या सर्व गडबडीत शारदा ताईंनी तेथील लेडी पोलिसचा मोबाईल नंबर घेतला.
त्या नंतर बस निघुन गेली.
******
तिथे गेल्यावर पोलिसांनी
त्यांच्या पद्धतीने चौकशीला सुरुवात केली.
त्या दोन युवकांना विचारले, "तुम्ही कोण आहात??"
आणि "तू यांच्याबरोबर कशी ग?" त्या मुलीलाही प्रश्न विचारला गेला. शिवाय
"ही ज्वेलरी तुझ्या सोबत.. म्हणजे घरातील दागिने घेऊन तू या मुलांसोबत भुर्रऽभुर्रऽ.."
असं म्हणाल्यावर ती आणखीनच घाबरली व तीने भीत भीतच सांगितले, "नाही असं काही नाहीये. माझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि आम्ही लग्न करणार आहोत."
असे तिने सांगितल्या वर,
"तुझं तर लग्न झालेलं दिसत आहे. तर मग…"
हे ऐकल्यावर ती जरा चपापली आणि तिने लगेच अंगावरच्या ओढणीने गळा झाकून घेतला.
मग तिला लेडी पोलिस ने आत नेऊन अधिक खोदून खोदून विचारले.
"अगं खरं बोलशील तर तुझं लाईफ वाचेल.नाहीतर जाशील नरकात."
ती मात्र आता काहीच बोलत नव्हती.
"काहीतरी तुझ्याबरोबर अशुभ घडू नये, यासाठीच हे प्रयत्न आहेत." या शब्दात लेडीज पोलिस ने तिला समजावून सांगितले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
हे सर्व ऐकून ती तीच्या मनालाच प्रश्न विचारू लागली. 'की मी हे काही तरी खरंच चुकीचे केले आहे का?' 'माझं प्रेमच मिळवण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे.'
'आपलं लग्न झालेलं आहे.' असं मनात येतात तिचा हात आपसूकच गळ्यातल्या छोट्याशा मंगळसूत्राकडे गेला.
आणि मंगळ सुत्रावर हात ठेवताच लग्नाचे सर्व विधी भराभर तिच्या डोळ्यासमोरून सरकु लागले.त्याची उष्टी हळद माझ्या या अंगाला लागलेली आहे,सप्तपदी करताना धरलेला त्याचा हात.
दुधी पाण्यात अंगठी शोधताना झालेला तो स्पर्श, त्या मुळे एक अक्षरही न बोलता झालेला डोळ्यांचा तो मुक संवाद.
शिवाय कन्यादान करताना चे आई आणि बाबा..
असे अनेक प्रसंग तिची परिक्षा घेऊ लागले.
तिला हे आठवत असतानाच,
"अगं बोल ना ऽऽ, अशी गप् का?"असे शब्द तिच्या कानावर पडले. ती दचकली, आणि भानावर आली. आता तीला तिच्या कडुन झालेल्या चुकीचा पश्चात्ताप झाला होता.
अन् मग तीने नाही नाही असे म्हणतच मान हलवली.
म्हणाली,"चुकले माझे, मला घरी जायचे आहे.आई बाबां कडे.."असं म्हणून तीने आता पर्यंत थोपवुन धरलेले आसवं वाहु लागले होते.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
******
सगळं ऐकुन झाल्यावर शंकरराव म्हणाले,"माझ्या शिक्षक मित्राच्या भावाची ती मुलगी आहे.दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्व शिक्षक याच मुलीच्या लग्नाला गेलो होतो.केवढ्या थाटात लग्न केले त्यांनी..तुला आठवत असेलच."
"होका, आठवलं ना मला."
"माझ्या कानावर ही बातमी आली आहे,पण ती तुच असशील?हे मला काय माहीत."असं म्हणून ते उठले आणि आपल्या बायकोच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत म्हणाले,
"व्वा मास्तरीण बाई,तुमचा हा पैलु मला आजच कळाला."असं म्हणत त्यांनी तीचे अभिनंदन ही केले.
@सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या