गुलाबाची कळी बघा ..हळदीने माखली
प्राजुची फायनल ची एक्झाम चालु होती. आज लास्ट पेपर होता.
तो पेपर देऊन ती होस्टेल वर परतली. आज तिच्या डोक्यावरचे खूप मोठे ओझं कमी झाले होते.
फ्रेश होऊन तिने आपले सामान आवरायला सुरुवात केली, कारण संध्याकाळी तिला गावी जायला निघायचे होते.
इतर मैत्रिणी ही होस्टेलवर परतल्या. त्यामध्ये रूममेटही होत्या. त्या सर्वांनी ठरवले होते, ‘आज कोणीही गावी जाणार नाही, तर आज आपण सर्वांनी मिळून काही पार्टी करू, किंवा एखाद्या छान प्रेक्षणीय स्थळी जाऊन येऊ, फिरून येऊ आपण सर्वजण एकत्र राहण्याचा हा शेवटचा दिवस आहे तो आपण साजरा करू’ असं मैत्रिणींनी सांगितल्यावर मग तिलाही येण्याचा निर्णय कॅन्सल करावा लागला.
*****
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
प्राजु गावी म्हणजे घरी आली होती.
आठ दहा दिवसानंतर..
“अगं प्राजु, उद्या मला अक्की (बहिण)सोबत सोनालीच्या गावी जायचे आहे. येतेस का तू?” आईने प्रजुला विचारले.
हे एकूण ती म्हणाली,” त्या निमित्ताने तिच्या घरच्यांना भेटताही येईल,तसंही भेटायचेच होते गं मला.”
असे सांगितल्यावर मग आई म्हणाली,” मग उद्या सकाळी लवकर उठून आवरायचे बघ.” असं म्हणून आई झोपायला निघून गेली.
‘सोनाली’ म्हणजे प्राजुच्या सख्ख्या मावशीची मुलगी. म्हणजे हीची मावस बहीण.
तिचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. छान दिसायला देखणी, गोरीपान,अन् सडपातळ बांधा असलेली होती. तीला नवरा ही छान भेटला, गहू वर्ण असलेला उंचापुरा, अंग काठी ही मस्त असा प्रशांत.हा चारचौघात उठून दिसणारा होता.एका चांगल्या कंपनीत जॉबला होता.तसं तीचं सासर बसने एक तासाच्या अंतरावरच होते.
सोनाली आणि प्राजु भेटल्यावर इतक्या गप्पांत रंगुन जात होत्या, की वेळेचे भानच राहत नसे.या बहिणी कमी आणि मैत्रिणीच जास्त होत्या.प्राजु ही शिकायला लांब म्हणजे कोल्हापूरला होती. पण, सोनालीने खूप लग्नाला येण्याचा आग्रह केला म्हणून ती प्रिन्सिपल ला सांगून लग्नासाठी आलेली होती. या सोनाली साठी उद्या ती तिच्या सासरी जाणार होती.
*******
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
घरात सोनालीचा फोटो हार घालून ठेवलेला होता. फोटो समोर दिवा होता.
त्या फोटोला फुलं वाहुन या तिघीही आत येऊन बसल्या. सगळेच घरात आपापल्या कामात होते. तिची सहा महिन्याची मुलगी पाळण्यात झोपलेली होती. गेल्या गेल्या या दोघीही बहिणींना भरून आले होते. पण दु:ख लपवत त्या दोघीही बोलायला लागल्या. तीच्या सासुबाईंना. आणि तिच्या नवऱ्याला म्हणजेच प्रशांतरावांना.
काही वेळाने पाळण्यात, त्या बाळाची वळवळ सुरू झाली. अन् तीचे रडके सुरू निघाले. असं बघुन प्राजु उठली. तीने त्या सोनालीच्या मुलीला पाळण्यातुन काढुन मांडीवर घेतले. तिच्याशी खेळावे म्हणुन, पण..
ती मांडीवर रडु लागली.
मावशीने मग तिला सांगितले,” बाई तिला घेऊन जरा इकडे तिकडे फिर.”
“बरं.” असं म्हणत ती हळुच त्या बाळाला घेऊन उठली. मग थोडंसं बाहेर येऊन ती इकडुन तिकडे फिरू लागली. पण तरीही तिची ठुसठुस काही कमी होईना. तिला काहीच कळेना ‘हीचं असं काय चालू आहे?’ म्हणुन तिने तिला परत घरात आणली. आणि आईला सांगितले, “आई ही रहात नाहीये ना गं!”
आई,”अग तिला भूक लागली असेल, थांब मी तिला दुधाची बाटली आणून देते.”
असं म्हणत अक्की मावशी उठली आणि तिने तिच्या व्याहिनबाईकडून बाळाच्या दुधाची बाटली आणली.
ती प्राजु जवळ देत ती म्हणाली,” घे, आता तिचे हे दूध पिऊन पोट भरेल. मग शांत होईल ती.”
पण ती काही दूध पीतच नव्हती. मग अक्की मावशीने पण तीला
घेऊन बघीतले. तरीही नाहीच. तीचे ट्याहा ट्याहा चालुच होते.आजीबाईला तर वेळ नव्हता.
काही वेळेनंतर “प्राजु तु हिला घेऊन वरच्या रूम मध्ये जा.येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ आहे.तीला शांत नसेल वाटत.” असं हळुच सोनालीच्या सासुबाई ने तीच्या कानात सांगीतले.
वरच्या रूम मध्ये ही हिच्या साठी झोका बांधलेला होता.
आज म्हणजे सोनालीचे महीनमास होते.तीला जाऊन सहा महिने झाले होते.
सोनाली ही बाळंतपणात दगावली होती. पण तीचे बाळ मात्र डॉक्टरांनी वाचवले होते.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
तर प्राजु तीला वर घेऊन आली. वरती गेल्यावर बाटलीने तीला शांतपणे दूध पाजु लागली. अगदी थोडसं तिने पिलं नंतर मात्र इकडून इकडून बाहेर काढू लागली. पण तिची किरकिर चालूच होती. ‘नवीन माणसाकडे लहान मुल राहत नाही’
अगदी तसेच हिच्याकडेही ते राहीना? मग तिला तिने हीने झोक्यात टाकले.आणि झोका देऊ लागली.
दोनच मिनिट ती शांत राहिली. पुन्हा तीचे रडणे सुरू झाले.
मग मात्र तिने आईला बोलावले. “अगं आई ही राहत नाहीय तू वरती ये बरं.”
असा प्राजुचा आवाज ऐकून, सोनालीच्या सासुबाई हातातले काम ठेवून बाळाकडेआल्या.
त्यांनी बाळाला झोक्यातून अलगद काढून खांद्यावर ठेवून, हळूच तिला मायेने थोपटले. आणि थोपटत इकडे तिकडे फिरता फिरता एक छोटीशी अंगाई पण म्हणली.
त्यानंतर ती लगेच शांत झाली. हे असं पाहून प्राजूला थोडं वेगळंच वाटलं.
पण लगेच त्या म्हणाल्या,” नवीन व्यक्तीकडे लहान मुल राहत नाही. त्या व्यक्तीची बाळाला ओळख नसते. म्हणून त्याला तिच्याकडे असुरक्षित वाटते.” असं प्राजुला सांगत असताना त्या बाळाचे पप्पाही वरती आले. कारण आपल्या परीचा रडण्याचा आवाज त्यांनाही अस्वस्थ करत होता. ती मग शांत झाल्यावर परत तिला झोक्या मध्ये टाकले. आणि त्या आपल्या कामासाठी खाली निघून गेल्या.
प्रशांत मात्र तटस्थ होऊन प्राजुची बाळासाठीची चाललेली धडपड पाहत होता. तिची तळमळ ही पाहत होता. आता ही परी छान झोपलेली पाहून तिने प्रशांतला सांगितले,” जीजू परी झोपली आहे. मी खाली चालले लक्ष ठेवा.”
असं म्हणत ती पायऱ्या पर्यंत आली तोच.. मोठ्याने बाळाचे रडणे तिच्या कानावर पडले, म्हणून ती लगेच परतली. झोक्यापर्यंत येईस्तोवर प्रशांतही तिथे आलाच होता. दोघेही एकदम घाईत तिथे आल्याने दोघांचीही टक्कर झाली होती. पण लगेच वेळेचे भान ठेवून दोघेही सावरले. आणि झोका देऊ लागले.
“अगं प्राजु मी होतोना इथे.”प्रशांत म्हणाला.
“हो पण माझाही पाय पुढे न पडता हिचा रडण्याचा आवाज ऐकून परत इकडे वळला.” प्राजुने स्पष्टीकरण दिले.
अनोखी गुंफण असलेली ही कथा नक्की वाचा
“ठीक आहे तु जा, मी आहे इथेच.” प्रशांत.
त्या ने असे म्हटले म्हणुन मग ती पायऱ्या कडे निघाली. पायऱ्या उतरताना मात्र एक वेगळाच फील तिला येत होता.
संध्याकाळी परत निघताना, परी आजीच्या मांडीवर होती. तिचा पापा घेऊनच ती निघाली. तिचा तो ‘माऊ स्पर्श’ तिने मनात साठवला.
काहीच दिवसात तिचा रिझल्ट लागला. तिचे डिग्रीचे शिक्षण कंप्लीट झाले होते.
म्हणून मग आईने लग्नाचा तगादा लावला.
त्या हिशोबाने थोडं शोधायलाही सुरुवात झाली. बाबांनी मग काही नातेवाईकांकडे लग्नाच्या मुलांची चौकशी करायला सुरुवात केली.
एक दिवस अक्कीचा म्हणजे प्राजुच्या मावशी चा फोन आला. तो आईने घेतला,” हॅलो,बोल गं नलु अक्का?”
“अगं रोहिणी, तुझ्यासाठी एक निरोप आहे. माझ्या व्याहिनबाईचा.”
“काय निरोप आहे, तुझ्या व्याहिनबाईचा ?” प्रश्नार्थक मुद्रेने आईने विचारले.
“त्या, तुझ्या प्राजू साठी विचारत होत्या.”
“त्यांचा मुलगा तर शिकतोय ना अजून.?” चेहऱ्यावरील प्रश्न तसाच ठेवत रोहिणीने विचारले.
“लहान नाही बाई. मोठ्या मुलासाठी, म्हणजे माझ्या जावयासाठी.” अक्की मावशीने सांगितले.
“काय?? अवघडच प्रश्न केला आहे तू मला. अक्की!!” आई म्हणाली.
रोहिणी बाईने हे मग हे प्राजूच्या वडिलांना सांगितले.
तेव्हा मात्र दोघांचीही अवस्था दोलायमान झाली. काय करावे त्यांना काहीच कळेना.
मग त्यांनी प्राजुला विचारले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
तिने ‘दोन दिवस वेळ द्या, नंतर सांगेन.’ असं सांगितलं.
रात्री झोपायला ती बेडवर आली पण झोप येईना म्हणून खिडकीतून तिने खाली डोकावुन बघीतले. तर बाजुच्या घराची गच्ची हिच्या खिडकीतून स्पष्ट दिसत होती. वर स्वच्छ शीतल चांदणेही पडले होते. बाहेरून अधुन मधुन हवेची झुळूकही मध्ये येऊन भिंतीवरच्या कॅलेंडरचे पान उडवीत होती तर समोरच्या गच्चीवर एक मांजर आपल्या दोन पिल्लांना कुशीत घेऊन मस्त झोपले होते सोनालीच्या लग्नात एक अनोपिक्षित पणे घडलेली गोष्ट तिला आता राहून राहून आठवू लागली ती म्हणजे नवरदेवाची गोष्टी हळद ही करवली म्हणून घेऊन येत होती नवरीकडे तर तिच्यासोबत कोमल म्हणजेच सोनालीची लहान चुलत बहीण होती या दोघी पायऱ्या चढत असताना तिच्या हिलच्या चप्पल मुळे तिचं तोल गेला आणि हळदीची वाटी तिच्या हातातून तिच्या अंगावर पडली तर त्या वाटीतल्या हळदीने तिचे कपाळ आणि गाल पिवळे केले होते तशी हीने वाटी खाली पडू दिली नाही हातातच झेलली. पण हळदीने मात्र तिचे काम केले होते राजू तिचा गाल आणि कपाळ रंगवले होते तिनेही आजपर्यंत कुठेच सांगितले नव्हते आईला फक्त एकदा सांगितले होते आई म्हणाली त्याचं काय असतं पण तिलाही आता सारखं सारखंच आठवत होते शिवाय लग्नातही या नात्या कारणाने जीजू सोबत झालेला संवाद आणि आता त्या दिवशी झालेली ही डोक्याची टक्कर यातूनच झालेली मित्रांची सुखद भेट असं हे सर्व घुसळून तिच्या मनाच्या डेरा चालू होतं स्त्री ही जन्मताच आईही असती पण हा असलेला वासल्याचा कोपराही तिला जणू साद घालत होता. त्या सहा महिन्याच्या बाळाची ही अनामिक ओढ असेल कदाचित!! ती तिच्यात निर्माण झाली होती.
शिवाय प्रशांत हा दिसायला देखणाच आहे. आणि चांगली नोकरी ही आहे. विशेष म्हणजे स्वभावाने ही खुप चांगला आहे. त्या त्यांच्या बरोबर सोनाली खुप सुखात होती.
आज प्राजु आणि प्रशांत च्या डोईवर अक्षता पडल्या होत्या. आणि प्राजु ही सासरचा उंबरठा ओलांडून गृहप्रवेश करून पत्नी सुन आणि त्याचबरोबर चिमुकल्या प्रीतीची आईही झाली होती.
(ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे. तीचा कुणाशीही काहीही संबंध नाही.)
@सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या