संसार सावरताना...
छाया गेट उघडून मध्ये आली. तर तिने पाहिले की, आज भांडी जशीच्या तशीच आहेत. सावित्री आज भांडे घासायला आलीच नव्हती. कपडे वाली कपडे धुऊन गेली होती.
मग ती घरात आली, घरात दोन्ही मुलं आपापला अभ्यास करत बसली होती.
म्हणून तीनी विचारले,”का रे आज सावित्री आली नाही का?”
“मला नाही माहित मम्मी.” असं जय ने उत्तर दिले.
“तुला माहित आहे का रे मग?” तिने राजला विचारले.
“ ये मला नाही माहित गं. मी आलो तेव्हा कोणीच नव्हते इथं!” असं त्यानेही सांगितलं. कारण सावित्रीची भांडी घासायला यायची वेळ आणि राज शाळेतून यायच टाईम एकच होता.
म्हणून मग तिने जास्त वेळ न घालवता पुढील कामाला लागली. आधी हात पाय धुऊन तिने चेंज केले. किचनमध्ये जाऊन प्रथम चहा करून घेतला. किचन ओट्यावरील घासायची भांडी तिने आधी बाहेर ठेवली. मनात आले की, ‘तिला फोन करावा’ पण तिने मनाला आवरले की,’ राहू दे ना एखाद दिवस तिलाही कामाचा आराम नको का?’ असं तिच्या मनात आलं आणि मग फोन करण्याचा मोह तीनं टाकला.
सकाळी उठल्यावर ती मुलांची डबे करण्यात व्यस्त होती, तर तेव्हा मग सावित्रीचा फोन आला.
“हॅलो बाईसाहेब, मी माझ्या मुलाला काल दवाखान्यात ऍडमिट केले आहे. तेव्हा मी आजही नाही येऊ शकणार. सॉरी बरं का.” तिने तिकडून रडवेल्या सुरात सांगितले.
“अगं काय झालं तुझ्या मुलाला?” छायाने तिला प्रश्न केला.
“सांगेन उद्या आल्यावर. इथे नको, अन् फोनवरही नको.” असं ती म्हणाली.
“बरं ठीक आहे, काही लागलं तर सांग, संकोच करू नको किंवा फोन कर. आता कशी आहे तब्येत त्याची?”
“ठीक आहे बाईसाहेब.” असं म्हणून तिने फोन ठेवला.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
दुसऱ्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ही छायाने वाट बघितली नाही.
सावित्री ही छायाकडे गेल्या चार वर्षापासून काम करत होती. दोन वेळा भांडी आणि फरशी पुसने. असे तिचे काम होते. इतर सर्व ठिकाणी ती फक्त भांडी घासत होती. पण छायाकडे मात्र ती फरशी ही पुसून घेत होती. कारण छाया तिच्या दोन्ही मुलांना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर वह्या पुस्तक घेऊन देत होती.प्लस दोन दोन युनिफॉर्म सुद्धा ती घेऊन द्यायची. तिचा मोठा मुलगा नववीत होता, तर लहान मुलगी ही सातवीत होती. मुलाला सावित्रीने ट्युशन लावले होते.
म्हणुन त्याला ट्युशनला जाण्यासाठी येण्यासाठी सायकल सुद्धा छायानेच घेऊन दिली होती. त्यामुळे तो शाळेतही सायकलवर जात होता. म्हणूनच मग सावित्रीला छाया ही अगदी छाये सारखीच होती.
छाया ही एक शिक्षिका होती. तिचे मिस्टरही हायस्कूल मध्ये शिक्षक होते. त्यामुळे तिचे असे हे कार्य ती करत होती.त्याला तिच्या मिस्टरांचाही पूर्ण पाठिंबा होता. छाया ताईच्या सासुबाई ही तिथे असत तेव्हा त्यांच्या आणि सावित्रीच्याही छानच गप्पा सुरू असायच्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्री नेहमी प्रमाणे आली.
“काय गं कसं आहे मुलाचं?” छाया ने तीला विचारलं. तिचं आपलं पोरांचे डब्बा करणे सुरू होते. हे करता करताच तिने विचारले.
“हो बरी आहे आता.” असं म्हणताना तिचे डोळे भरून आले.
“अग असं रडू नको. वाटतंना बरं त्याला.मग नको असे आसवं गाळू. बस येथे,चहा ठेवते तुला.” असे धीराचे शब्द ऐकून तिलाही बरेच वाटले.
व्यक्तीच्या दुःखात खरेच असे धीराचे ‘दोन शब्द’ही मोलाचे कार्य करतात!!
“आज माझ्या पोरीमुळे हे पोरगं हाती लागलं. नाहीतर…?”
असं म्हणताना परत तिचा बांध फुटला.
“राहू दे ना आता. नकोच सांगूस काही. मी तुला विचारले आहे का? शांत हो बरं.” मग ती शांत झाली. आणि नंतर तिने चहा घेतला. “आता फरशा पुसुन घे.भांडी राहू दे. नंतर चारला ये.”
असे छायाने तिला सांगितले,”बरं बाई.”
ती काम करून निघून गेली.
पण छायाच मनातून काही सावित्री जाईचना!!
तिच्या मुलाला नेमके काय झाले असेल? ‘तो आजारी आहे’ असे कधी म्हणजे या दोन-चार दिवसात ती काही बोलली नाही. मग नेमके काय झाले आहे? काहीच अंदाज लागेना. असू दे, सांगेन जेव्हा सांगायचे तेव्हा. असं म्हणून तिने मनाला त्या विचारापासून मागे ओढले आणि ती आवरून शाळेला निघून गेली.
सावित्री ही गेल्या पाच वर्षापासून, या गावात म्हणजे या शहरात राहत होती. ती आणि तिची दोन पिल्लं म्हणजे मुलं. मुलांचं पालन पोषण करून त्यांना शिकवून योग्य मार्गाला लावणे. हेच तिचं ध्येय. मुलांचे वडील येईपर्यंत, ही जबाबदारी एकट्या सावित्री वरच होती.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
एका दुरच्या नातेवाईकाच्या ओळखीने तिने इथे आपले बस्तान मांडले होते. काही कारखान्यात आणि कंपनीत कामासाठी तिने प्रयत्न केले. तिथे हिला कामही मिळाले होते. पण पूर्ण दिवस तिकडे जायचे आणि मग मुलं शाळेच्या व्यतिरिक्त एकटीच राहणार होती. ती लहानच होती. म्हणून मग तिने अशी घरकाम करायला सुरुवात केली. ती रहात होती तेथील आजु बाजूच्या परिसरातच. त्यामुळे मुलं बाहेर खेळत असली तरी तिच्या नजरेच्या टप्प्यातच ती खेळत असत. त्यामुळे त्यांनाही ‘आई कुठे बाहेर गेली आहे’ असं वाटत नव्हतं. तर ती आजपर्यंत तेच काम करत होती. त्यात तिला काही माणसं छायासारखी भेटली होती. जी तिच्यावर बेतलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवत होती.
सावित्री ही एक साधारण परिस्थिती असलेल्या आई बापाची लेक होती. ती दोघेही शेतात मोलमजुरी करून संसार चालवत होती. त्यात सावित्री साठी शेजारच्या गावातील जयंतचे स्थळ आले, मुलगा चांगला होता. कामसू होता.व्यवस्थित कामही करत होता.शिवाय निर्व्यसनी होता. त्यामुळे वडिलांनी लगेच होकार दिला.
लग्न झाले. ती सासरी आली. तर घरात मोठे दीर, जाऊ आणि सासू ,सासरे असे कुटुंब होते. या कुटुंबात राहून तिचा संसार सुरू झाला. दोन मुले झाली. एक मुलगा आणि एक मुलगी.
दोघीही म्हणजे ? या दोन्ही जावा जावा.दोघीनाही बाहेर कामासाठी जाण्याची परवानगी नव्हती.त्यमुळे मग सावित्रीने घरापासुन पाच मिनिटांच्या अंतरावर एक फुलाचे दुकान होते.तिथुन फुले आणुन ही हार करून देत असे.आलेले पैसे हिलाच मग स्वतः साठी खर्च करायला कामी येत असे. हळूहळू मुलं मोठी होत होती.
काही दिवसातच या हसत्या, खेळत्या घराला नजर लागली.सावित्रीचा नवरा जिथे काम करत होता, तेथील लोकांनी म्हणजे कामगारांनी पैश्याच्या व्यवहारात त्याला फसवले.
त्यामुळे जयंतराव यांना शिक्षा झाली.अन् त्यांना तुरुंगात जावे लागले. आपली बायको आणि मुलांना वार्यावर सोडून…
मुलाच्या बाबतीत घडलेल्या या घटनेने जयंताच्या वडिलांना मोठा धक्का बसला.
या धक्क्याने काही दिवसातच ते गेले.आईलाही खुप वाईट वाटले.त्याही मग खुपच अबोल राहू लागल्या.
वर्ष सहा महिने कसे तरी धकले पण नंतर ….
मग सावित्री ने आपल्या दोन मुलांना घेऊन गावा सोडले. कारण ‘गावापेक्षा शहरात राहून काहीतरी काम करता येईल’ हा उद्देश ठेवून..
शिवाय मुले ही शाळेत जात होती.त्यांचेही सगळेच व्यवस्थित व्हावे हेच तीला आता वाटत होते.
या शहरात येऊन तिला जवळजवळ पाच वर्षे कंप्लेंट झाली होती. दरम्यान सासुबाई ही देवा घरी गेल्या होत्या.
मुलाला वकील बनवायचे असे तीने ठरवले होते. कारण निर्दोष व्यक्तींना शिक्षा भोगावी लागल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे कसे हाल होतात हे तिने स्वतः अनुभवले होते. म्हणूनच तिला मुलाला वकीलच करायचे होते.
त्या दिवशी सकाळी दोन्ही पोरांची डब्बे करून तिने भरून ठेवले, आणि आपल्या कामासाठी बाहेर पडली. चार पाच घरांच्या पलीकडे राहणाऱ्या मगर मॅडमची भांडी घासायला तीने सुरुवात केली होती.. इतक्यात तिची मुलगी रेवा पळत पळतच तिच्याकडे आली.
आणि म्हणाली,”आई पटकन चल, भैय्याने काहीतरी केलं आहे.. सगळं रक्त पडलं आहे खाली, तू लवकर चल बरं.”असं ऐकताच ती लगेच उठली आणि जणु पळतच घरी आली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
घरी आल्यावर बघते तर काय..?
पोराने हाताची नस…”
असं पाहुन तीला काहीच सुचेना.पण दुसर्याच क्षणी तीने काॉटनचा कपडा त्याच्या हाताला बांधला.आणि त्याला तसेच उचलुन घेत, ती बाहेर पडली.अवघड जात होते.पण..
तशीच रोडवर आली.रिक्षा उभीच होती. मग रिक्षावाल्याने ही स्पीडने हाॉस्पीटल गाठले.
तिथे गेल्यावर त्याच्यावर त्वरीत उपचार सुरू झाले.हे उपचार सुरू होईपर्यंत रिक्षावालाही तीथेच थांबला.निघताना खीश्यातुन पैसे काढुन
त्याने सावित्रीच्या हातात दिले.हे पाहुन ती म्हणाली,”कशाला दादा? मी करेन ना व्यवस्था!”
“करा, होईल तेव्हा हे परत करा.पण आता हे राहु द्या.”
असं म्हटल्यावर तीला काहीच बोलता नाही आले. म्हणुन मग तीने डोळ्यानेच आभार मानले.
(ही कथा पुर्ण पणे काल्पनिक आहे.सत्य घटनेशी यांचा कुठलाही संबंध नाही)
@सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या