झाले मोकळे आकाश - अंतिम भाग
लग्नाला सहा महिने झाले होते. दोघांनीही भरपुर वेळ घेतला होता.पण अजुन ही हे नाते….
तशी वैष्णवी या घरात छान रमली होती.हां थोडे आईचे आणि तीचे तू तू-मै मैं होत होते. पण काही वेळाने ते विसरुन त्या दोघीही गोड बोलत असे.
असेच मग या दोघी हाॅलमध्ये सकाळचा नाष्टा झाल्यावर, गप्पा मारत बसल्या होत्या.दुपारच्या स्वयंपाकाचे ठरवत असताना विजयची आई म्हणाली,”अगं विजुचा वाढदिवस आहे, दोन दिवसांनी.”
“हो का?” वैष्णवी.
“आम्ही काही सेलिब्रेट वगैरे करत नाही. त्याच्या आयुष्यात जे घडले, तेव्हा पासुन पोराला आवडच राहिली नाही कश्यात.”असं आई जरा खंतावतच म्हणाल्या.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
असं ऐकल्यावर वैष्णवी काहीच बोलली नाही.
पुन्हा आईचं म्हणाल्या,”मीच सकाळी त्यांचे औक्षण करते.आणि गोड काहितरी करून खायला देते.त्याचे काही असो,पण माझ्या साठी हा दिवस फारच मौल्यवान आहे.”
विजुच्या आणि वैष्णवी च्या
नात्यातला दुरावा तीला ही जाणवत होता.पण…
यावर मग वैष्णवी म्हणाली,”आपण करू वाढदिवस सेलिब्रेट!”
आता पुढे..
“काय मग तू केक आणतेस..?”
त्यांना पुढे बोलू न देता वैष्णवी म्हणाली,
“बरोबर. मी करते आता, काय करायचे ते.” असं म्हणत ती उठून किचन मध्ये गेली.
रात्री बेडवर पडल्यावर तीने ठरवलं वाढदिवसाचे प्लॅनीग.
#गुलाबाची कळी बघा हळदीने माखली.
वाढदिवसाचा दिवस.सकाळी सकाळी,
‘आज यांचा वाढदिवस आहे, आणि नेमकं आजच मित्रांसोबत पुण्याला गेले आहेत.’
असा विचार करत वैष्णवी ने चहा गळ्याच्या खाली ढकलला.सकाळी आज ‘मीच औक्षण करेन.’असं तीनं ठरवलं होतं .
आज उठल्या पासुन तीला एकटं एकटं वाटत होतं.लग्न झाल्यापासुन आज पहिल्यांदाच विजय सकाळी तीला दीसला नव्हता.
शिवाय त्याला ऑफिसला जायचे आहे अशी घाई ही नव्हतीच.यामुळे तीचे मन त्याच्या अवतीभवती भटकू लागले.
म्हणुन तीचे कोणत्याही कामात लक्ष लागेना.आणि त्या मध्ये रसही वाटेना. किचन मध्ये येऊन मग ती स्वयंपाक करू लागली. पण!!
तीथेही तीचे चित्त थार्यावर नसल्या सारखेच तीला वाटत होते.
मग तीने स्वतः लाच प्रश्न विचारला,’की आज असे हे सारखे काहीतरी हरवल्या सारखेच का वाटते आहे?’
ती लग्नानंतर माहेरी ही गेली, तरी सकाळी जाऊन, संध्याकाळी परत यायची.खुप दिवस माहेरी राहिले.आता नको त्यांच्या संसारात आपली लुडबुड म्हणुन.
तीने केकची ऑर्डर दिली संध्याकाळी सहा पर्यंत येईल असं त्याने सांगितले.
दुपारी ही शॉपिंगला गेली. ‘विजय साठी काहीतरी गिफ्ट घ्यायचे’ असे तिने ठरवले होते.
गिफ्ट शॉप मध्ये गेल्यावर बऱ्याच वस्तू तिने बघितल्या. पण काय घ्यावे? तेच तिला कळेना. त्याच्या जास्तीत जास्त जवळ राहिलं. असं काही तरी तीला घ्यायचे होते.
हेच तीच्या मनात घोळत होते.माॅल मध्ये फिरत असताना अचानक तीची नजर समोरच्या दुकानावर गेली. तीनं एक क्षणभरही विचार न करता त्या दुकानात गेली. तिथून तिने छानसं तिला पाहिजे तसं गिफ्ट तीनं घेतलं. येताना सुंदर असा बुकेही ती घेऊन आली.
घरी आल्यावर तिला आज मी विजय साठी शॉपिंग केली. याचा खूप खूप आनंद झाला होता. आनंद पेक्षाही समाधान वाटत होते. आता त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणे. म्हणजे त्याच्या येण्याची प्रतीक्षा. किती वाजता स्वारी उगवते काय माहित? असं म्हणत ती रूममध्ये आली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
आणि एकदा विजयला फोन करून विचारावे ‘कीती पर्यंत येणार आहे?’
म्हणुन तीने फोन केला.
“हॅलो मी बोलते आहे वैष्णवी,कीती वाजतील घरी यायला तुम्हाला?”
“मी साडेनऊ च्या पुढेच येईल.काही काळजी करू नका,आई बाबांना ही सांगा.”त्याने सांगितले.
मग तीनं त्याच्या आवडीचा म्हणजेच श्रीखंड पुरीचा बेत केला.
आई बाबांनी जेवण केले.हीने मात्र नाही केले.
विजय आल्यावर त्यांच्या सोबत तीला करायचे होते.
मग तीनं बाकीचेही इतर सर्व आवरून तीच्या रुममध्ये गेली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
त्याची वाट पाहत बसली.दहा वाजले,तरी विजय आला नाही. म्हणुन मग तीने फोन केला.तर फोन ची बेल वाजत होती.पण तो उचलत नव्हता.एक,दोन, तीन वेळा, चार, पाचवेळा, कितीतरी वेळा थोड्या थोड्या अंतराने फोन करूनही तिकडुन विजयने उचलला नाही.एव्हाना अकरा वाजत आले होते.
‘घड्याळाची टिकटिक जणुकाही आता तीच्या काळजावरच घाव घालत आहे.’ असे तीला वाटत होते.एक नाही अनेक शंकांचे तरंग मनाच्या जलाशयात उठु लागले.’
काय झाले असेल?असे प्रश्न…
एक नाही अनेक.तीला सतावु लागले. महत्प्रयासाने आपल्या वाट्याला आलेले हे सौभाग्य… आपल्या साठी हे सर्वस्व आहे.याची तीला राहुन राहुन जाणीव होऊ लागली.जसजसा वेळ होऊ लागला तसतशी तीच्या मनाची तडफड वाढु लागली.
आता बारा वाजुन गेले होते.वाढदिवस करायचा तसाच राहिला होता.पण ते काहीही असो ‘ह्यांनी लवकर घरी यावे’ अशी ती प्रार्थना करत होती.
परत तीने फोन ट्राय केला. पण आता तर बेलही नाही वाजली.
कधी एकदा हे समोर येतात आणि मी त्यांना डोळे भरून पाहते, असे तीला झाले होते.डोळ्यातुन तर गंगा यमुना वाहात होत्याच. रात्री अडीच च्या पुढे काटा गेला. आणि त्यानंतर मात्र तीला कशी झोप लागली ते कळलेच नाही.
पहाटे चार वाजता विजय घरी आला. आईने दार उघडले.
“किती उशीर रे? तसं सांगायचं ना मग.”आईचा घरात यायच्या आधीच प्रश्न.
“हो नाही गं करता आला फोन. मला कामामुळे.” असं तो म्हणाला.
हाता पायावर पाणी घेऊन तो हात पाय पुसेपर्यंत आईने त्याला सांगितले.
“आज तुझा वाढदिवस होता. तर वैष्णवी ने गिफ्ट केक आणि बुके ही आणलेले होते. पण तू मात्र….?”
पुढे बोलण्या आधीच विजय म्हणाला,
“हो कामामध्ये होतो. आणि त्यामुळे फोनही नाही घेत आला.”
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
असे तिला सांगून तो रूममध्ये आला. त्याने लाईट लावला. तर टेबलवर बुके आणि गिफ्ट ठेवलेले होते. ते तो पाहू लागला. तर इतक्यात वैष्णवीला जाग आली. तसंही ती अडीच वाजेपर्यंत जागीच होती.
उठून ती विजय जवळ आली. आणि रागातच म्हणाली,”फोन का नाही घेतला माझा? किती मिस कॉल आहे. बघितले आहेत का?”
“हो, बघितले. कामात होतो मी. काय गरज होती तुम्हाला माझ्यासाठी हे करण्याची?”असा त्यानी बुके आणि गिफ्ट कडे हात करत तिलाच प्रश्न विचारला.
“का म्हणजे? मी लग्न केलं आहे ना तुमच्याशी.” असं तीही चिडून म्हणाली.
“हं” असं म्हणत तो स्वतःशीच हसला.
“एवढ्या चार दुकाना फिरून गिफ्ट आणले, बुके आणला, केकही मागवला आणि तुम्ही चक्क पहाटे चार वाजता आला. इथे क्षण क्षण झालेली या जीवाची घालमेल मी कशी कळणार तुम्हाला? काय काय विचार मनात येत होते. नको त्या शंका मनात घर करत होत्या.आणि त्याचे तुम्हाला काहीच नाही. किती शांतपणे सांगत आहात. ‘कामात होतो’ उशीर झालाआहे. म्हणून एक फोन करून तरी सांगायचे होते ना.”
तिला एवढी चिडलेली विजय प्रथमच पाहत होता. तिला हाताचा इशारा करत तो म्हणाला,” मला माहित नव्हते. वाढदिवसाचा तुम्ही काही प्लॅन केलेला आहे .जर जर माहित असते तर मित्रांनी ठेवलेल्या बर्थ डे पार्टीत जाण्याचे नव्हे,मी गेलोच नसतो ना.”
“हो बरोबर ना, मित्र प्रेमाचे आहेत, आमचे काय??”
“मित्र जवळचे आहेत, प्रेमाचे नाही.”
असं म्हणत त्याने आपले तोंड दुसरीकडे फिरवले आणि म्हणाला,”प्रेमाची माणसं जवळ आहेत पण त्यांना कळत नाहीना.” असं म्हणताना त्याच्या दोन्ही डोळ्यात नकळत पाणी तरळले.
हे पाहुन तीला अतिशय वाईट वाटले.आणि आजच्या या महत्त्वाच्या दिवशी आलेले त्याच्या डोळ्यातले पाणी तीच्या बंद मनाची कवाडं सताड उघडुन, आत पर्यंत गेलं.ती म्हणाली,
“तुम्हाला कळतंय का? त्या माणसाचे प्रेम?”
यावर तो प्रश्नार्थक मुद्रेने तीच्या कडे बघत म्हणाला,”म्हंजे तू..?”
हा त्याचा प्रश्न ऐकुन तीनं मानेनेच होकार भरत विजय ला मिठी मारली.आणि मग त्याने तीला आपल्या बाहुपाशात घेतले.आणि म्हणाला,”असं असेल तर आजचा वाढदिवस माझ्यासाठी खुपचं स्पेशल आहे, आणि अविस्मरणीय सुध्दा.”
“होऽऽ”असं म्हणताना तीच्या ही डोळ्यात आनंदाश्रू भरले होते.
या नात्याला आता एक नवी सुरुवात…
(ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे. 🙏)
सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या