झाले मोकळे आकाश..भाग दोन
वैष्णवी ची आई मात्र या लग्न समारंभात हसऱ्या चेहऱ्याने आणि आनंदाने वावरत होत्या. पण काठाच्या साडीवरील ब्लाऊज च्या बाह्यांची म्हणजे काठाची काही सुतं कडक असतात. अन् ती ब्लाऊज घातल्या वर कुठेतरी टोचत राहतात.तसे यांचे झाले होते. पोरीने लग्न तर केले होते.. पण तीने घातलेली अट अशीच कुठेतरी टोचत होती.
हे आपण मागील भागात आपण
वाचले.. आता पुढे.
वैष्णवी आणि विजय यांची आज लग्नानंतरची पहिली रात्र होती. वैष्णवीच्या मनात आधीच्या या वेळेच्या आठवणी गर्दी करत होत्या. त्या आठवणी काही पिच्छा सोडायला तयारच नव्हत्या. त्यांचा त्रासच एवढा झाला होता की,ती विसरूच शकत नव्हती. म्हणून मग आज तिच्या मनाला एक अवघडले पणही आले होते. आणि मनात अनामिक भीती ही घर करून होती.तसं विजयशी बोलताना तो तिला चांगला वाटला होता.म्हणुनच तीने हे पाऊल उचलले होते.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
अशीच काहीशी विजयची ही स्थिती झाली होती. वैष्णवीला भेटल्यावर, बोलल्यावर त्याची ही भीती कमी झाली होती. तरी पण त्याच्याही आधीच्या आठवणी त्याच्या डोक्यात होत्याच.
ती सुंदर होती, आणि गोरी पान ही होती. पण उजेड म्हणून याच्या हाती विस्तवच लागला होता. त्याचे चटके आजही जाणवत होते.एक हवंहवंसं वाटणारं नातं त्याला कधीच अनुभवाला आले नव्हते.
शिवाय तिने कधीच आवडीने किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवला नव्हता. आईच दोन्ही टाईम किचनमध्ये असायची. बाहेर कुठे जायचे म्हटले, की लगेच एका पायावर तयार होत असे.अश्याच अनेक तिच्या आठवणीचे मोहोळ त्याच्या डोक्यात घोंगावत होते.
विजय रुममध्ये आला.त्याला पाहुन काॅट वर बसलेली वैष्णवी उठुन उभी राहिली.
ती उठलेली बघून लगेच विजय म्हणाला,
“अहो बसा ना, अशा उभ्या नका राहू.”
असं म्हणत त्याने हात पुढे केला. पण तो हात न धरताच ती अंग चोरून बसल्यासारखे काॅट वर बसली. असं पाहून विजयच्या मनात अनेक प्रश्नांनी डोके वर काढले.प्रश्नार्थक नजरेने तीच्या कडे त्याने पाहिले.त्या चेहर्यावरील भाव ओळखुन तो काय समजायचे ते समजला.
त्याच्या चेहर्यावरील प्रश्न बघुन ती म्हणाली,” मी या नात्यात पुढे जाण्यासाठी मेंन्टली तयार नाहीअजुन, त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे.प्लीज समजुन घ्या मला.”
तीने एका दमात हे सगळे सांगितले.
“ठीक आहे.मलाहि असेच वाटते आहे.”
एक नाते वेगळेच असलेली ही कथा
मग त्या दोघांच्या इतर विषयांवर गप्पा झाल्या.तेव्हा दोघांनीही एकमेकांना सांगुन टाकले, ‘गत आयुष्यात जे काही झाले ते कधीच एकमेकांना विचारायचे नाही.’
*******
हळूहळू वैष्णवी तिथे रुळली. घरातही ती सगळं व्यवस्थित करू लागली. काही दिवसातच घराला नीट नेटकेपणा आला. किचनचा ताबाही तिने घेतला. सासूबाईंना काहीच बघावे लागत नव्हते. ती माहेरी दोन दिवस गेली तरी घरातील चैतन्य हरवल्या सारखे होत होते.
विजयच्याही बऱ्याच गोष्टी तीच्या शिवाय होत नव्हत्या. सकाळी दहापर्यंत कितीतरी वेळा तो ‘वैष्णवी हे कुठे आहे?’ ‘वैष्णवी ते कुठे आहे?’ असं सारखंच त्याचं चालू असायचे.
अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांच्या
नात्यात आपलेपणा येऊ लागला होता.आणि त्यांच्याही नकळत तिथे प्रेमाचा मोहर फुलू लागला.
*******
मकर संक्रांत काही दिवसावर आलेली होती. हॉलमध्ये विजय टीव्ही पहात बसलेला होता. तर त्याची आई हळूच त्याच्याजवळ येऊन बसली. आणि त्याला म्हणाली,
“विजू संक्रांत जवळ आली आहे रे.”
“मग काय करू म्हणते? तुला तिळगुळ आणून देऊ का लाडू करायला.? आणतो बरं का,” विजू म्हणाला.
“अरे तसं नाही. सुनबाई ची ही पहिली संक्रांत आहे. शिवाय बाहेर हळदीकुंकवाला ही जावे लागते. यावर्षी मी अजिबात कुठेच हळदी कुंकवाला जाणार नाही. मी तिलाच पाठवणार आहे.”
“नको जाऊस तू.”विजय.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
“तसं नाही. तर तिला संक्रांतीला साडी आणि हलव्याचे दागिने सुद्धा आण.”आईने सांगितले.
*******
संध्याकाळी वैष्णवी किचन मध्ये स्वैंपाकाची तयारी करत होती. विजय किचन मध्ये येऊन तीला म्हणाला,”जरा बाहेर येता का?”
“का, काय झाले?” तीचा प्रश्न.
“काही झालेले नाही. मी तुमच्या साठी काही साड्या आणल्या आहेत, पसंत करा.”
एक एक साडी बघताना तीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, विजय आपल्या डोळ्यात टिपत होता.आणलेल्या चारही साड्या तीला आवडल्या होत्या. पण एकच घ्यावी लागणार आहे. याची तीला खंत वाटु लागली.
काही वेळाने विजय म्हणाला,”कोणती आवडली मग?”
या प्रश्नाचे उत्तर देताना तीचा हात एकाही साडी वर स्थिर राहीना. हे पाहुन त्याला एवढे कळलेच होते की सगळ्याच म्हणजे चारही साड्या तीला आवडल्या होत्या.
“असं करतो या मी आता परत नाही करत उद्या किंवा परवा करेन परत.तुम्ही या वेळात ठरवा मग कोणती किंवा कोणत्या घ्यायच्या आहेत ते?”
“कोणत्या म्हणजे?”
यावर विजय “सांगतो नंतर.”
असं म्हणत बाहेर निघुन गेला.
विजय हा काॅट वर आडवं पडुन मोबाईल वर काहीतरी पाहत असताना, वैष्णवी तीचं सर्व आवरून रुम मध्ये आली.
आल्यावर तीने सहजच विचारले,”तुम्हाला कोणती साडी आवडली आहे?”
“साडी तुम्हाला घालायची आहे.माझं काय?”
“मला तर सगळ्याच आवडल्या आहेत.म्हणुनच मी तुम्हाला विचारले आहे.”
“हो ना मग सर्वंच ठेवा.”
“आऽऽ, नको नको, तुम्ही मला ‘केवढी हावरट आहे’ असं म्हणताल.”
“नाही ओ, असं मी काहीही म्हणणार नाही.
पण त्या मागची भावना तुम्हाला कळली म्हणजे बास.”
त्याचे हे वाक्य ऐकल्यावर तीच्या गालावर खुललेली कळी त्याला दिसु नये म्हणुन तीने आपला चेहरा लगेच दुसरीकडे फिरवला.
*******
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
संक्रांतीच्या दिवशी, नवीन साडी नेसून छान तयार होऊन, वैष्णवी शेजारच्या काकून सोबत वाण द्यायला गेली. आज ती ही पहिल्यांदाच हे करत असल्यामुळे मनामध्ये वेगळेच तीला वाटत होते.
सायंकाळी घरी हळदी कुंकू ठेवले होते. त्यासाठी वैष्णवी व्यवस्थित तयार झाली होती. हलकासा मेकअप आणि छान हेअर स्टाइलही केली होती.हलव्याचे दागिनेही तिने घातले होते. काळ्या साडीवर ते खुपच शोभून दिसत होते.हळदी कुंकवाला येणारी प्रत्येक स्त्री ‘सुनबाई छान मिळाली हो.’असं आईला म्हणत होती. आणि मग त्या हिला उखाणा ही घ्यायला लावत होत्या.
काही वेळानंतर विजयच्या मित्राची बायको हळदीकुंकवाला आली.मग तिच्यासोबत काही गप्पा झाल्या.सासुबाई हॉलमधून उठून किचनमध्ये गेल्या. यांना बोलू द्यावे म्हणून.. मग या दोघीच होत्या गप्पा मारायला. तेव्हा मग ती वैष्णवीला हळूच छेडत म्हणाली,
”वैष्णवी लग्नातल्यापेक्षा तू आज खूपच सुंदर दिसत आहेस.विजु भाऊजींच्या प्रेमाची जादू चेहऱ्यावर झळकते आहे, बरं का? आणि आज नक्कीच विकेट जाणार असं दिसतंय.”
हे ऐकुन वैष्णवी खुपच लाजली.
त्या नंतर मग उखाणा ही तीने घ्यायला लावला.
“कृष्णाची बासरी वाजते वृंदावनी,
विजयरावांची मी झाले गृहिणी.” असा वैष्णवी ने उखाणा घेतला.
“वा वा.छान.”असं म्हणत ती उठली.आणि निघताना वैष्णवीला म्हणाली,”असाच प्रेमाने संसार करा.”
काही वेळाने विजय हॉलमध्ये आला.
तो केव्हाच ऑफिस मधुन घरी आला होता. पण हाॅलच्या ऐवजी तो चॅनल गेट मधुन आत आला होता. त्याला बघून वैष्णवी म्हणाली, “तुम्ही कधी आलात?”
हे विचारताना तिच्या मनातल्या समुद्रात उठलेल्या लाटांची फक्त तिलाच कल्पना होती.
तीला हे असं छान छान तयार झालेले बघुन, म्हणजेच छान साडी, नाकात इवलुशी नथ, कानात झुमके, आणि गळ्यात सुरेख असे हलव्याचे दागिने, हाताला बाजुबंद, यामुळे तर तीचा लुक चांगला दिसतच होता.सोबतच कपाळीच्य कुंकवामुळे उठूनही दिसत होता. तीचं असं हे रुप बघुन क्षणभर विजयला वाटले ‘लगेच तीला मिठीत घेऊन प्रेमाचा वर्षाव करावा.’ पण दुसर्याच क्षणी तो मागे वळला स्वतः ला सावरत.
*******
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
लग्नाला सहा महिने झाले होते. दोघांनीही भरपुर वेळ घेतला होता.पण अजुन ही हे नाते….
तशी वैष्णवी या घरात छान रमली होती.हां थोडे आईचे आणि तीचे तू तू-मै मैं होत होते. पण काही वेळाने ते विसरुन त्या दोघीही गोड बोलत असे.
असेच मग या दोघी हाॅलमध्ये सकाळचा नाष्टा झाल्यावर गप्पा मारत बसल्या होत्या.दुपारच्या स्वयंपाकाचे ठरवत असताना विजयची आई म्हणाली,”अगं विजुचा वाढदिवस आहे दोन दिवसांनी.”
“हो का?” वैष्णवी.
“आम्ही काही सेलिब्रेट वगैरे करत नाही. त्याच्या आयुष्यात जे घडले, तेव्हा पासुन पोराला आवडच राहिली नाही कश्यात.”असं आई जरा खंतावतच म्हणाल्या.
असं ऐकल्यावर वैष्णवी काहीच बोलली नाही.
पुन्हा आईचं म्हणाल्या,”मीच सकाळी त्यांचे औक्षण करते.आणि गोड काहितरी करून खायला देते.त्याचे काही असो,पण माझ्या साठी हा दिवस फारच मौल्यवान आहे.”
या दोघांच्या नात्यातला दुरावा तीला ही जाणवत होता.पण…
यावर मग वैष्णवी म्हणाली,”आपण करू वाढदिवस सेलिब्रेट!”
(काय होईल वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे?)
वाचु या पुढील भागात….
सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या