एक नाते असे अनोखे भाग-१
नंदाताईंनी मोजून गहू काढले. आणि त्या दारासमोरील ओट्यावर ते गहू निवडण्यासाठी बसल्या.प्रथम ते सर्व चाळून घेतले,आणि नंतर निवडुन पातेल्यात टाकत होत्या.
इतक्यात कोपर्यातल्या झाडावर बसलेला कावळा ओरडु लागला.’कावऽ कावऽ.’
म्हणुन त्यांनी झाडाकडे बघीतले.तर त्यांना एका फांदीवर तो दिसला.त्याला पाहात त्या म्हणाल्या,”हं याला उन्हाची तहान लागलेली दिसते आहे.भिंतीवरच्या पातेल्यात आहे पाणी..पण दिसेल तेव्हा.”
असं म्हणत त्या आपले काम करायला लागल्या.
परत काही वेळाने ..
गेट वाजले आणि बाहेरून कोणीतरी व्यक्ती आत आली.नंदाताईला ओट्यावर बघुन ती व्यक्ती तीथेच थबकली.
“माधवराव भालेकर येथेच राहतात ना?”
असा त्याने नंदाताई कडे बघुन प्रश्न विचारला.
“अं हो.”नंदाताई त्याच्याकडे पाहत म्हणाल्या.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
त्याने लगेच हातातली एक लग्न पत्रिका त्यांच्या हातात दिली. आणि तो इसम म्हणाला,”लग्नाला दोन दिवस आधीच या. असं काकींनी सांगितले आहे.”
पत्रिके वरचे नाव वाचत असताना नंदाताईंची कळी एकदम खुलली,”हो येईन की. लेकीच्या लग्नाला.”
क्षणभर थांबून “काय चहा वगैरे…?”
“नको नको, आणखी गावात पत्रिका वाटायच्या आहेत.” असं म्हणत तो निघुन गेला.
तो गेल्यावर नंदाताईने पत्रिका पुर्ण वाचली.
‘मंजिरी आणि पार्थ, छान आहे जोडी.’
असं त्या स्वतःशीच म्हणाल्या.
इतक्यात शेजारची केतकीची आई गेट मधुन आत येत म्हणाली,” काय दळन करता आहात का?”
“हो. काय मग केतकी ला छान मार्क पडले आहे तुमच्या.पेढे द्या आता.”नंदाताई म्हणाल्या.
“हो नक्कीच, पोरीने गेले वर्षभर खुप अभ्यास केला आहे.त्या मेहनतीचे तीला फळ मिळालेले बघुन खुप समाधान वाटते आहे.” केतकी ची आई.
“तीच्या साठी तुम्ही पण नक्कीच काही गोष्टींना मुरड घातलेली आहे ना.”नंदा ताई.
“पण आता त्याचे चीज झाले आहे,”केतकीची आई.
“हो,हे खरंच आहे बरंका.”नंदाताई.
“मला जरा जास्वंदी ची फुले हवी आहेत,आज माझा वरद लक्ष्मीचा शुक्रवार आहे.”केतकीची आई.
“आहेत झाडावर फुले, घ्या ना.”
नंदा ताईने सांगितले.
त्यांनी दोन फुलं तोडली आणि परत
त्या यांच्या जवळ गप्पा मारायला बसल्या.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
रात्री घरी आल्यावर, नंदाताईने माधवरावांच्या हातात मंजिरीच्या लग्नाची पत्रिका दिली. तर तेही फारच खुश झाले.
‘काय या पोरीने अनामिक अशी ओढ लावली आहे.’ असे ते पत्रिका वाचत वाचतच स्वतःशीच म्हणाले.
“पोरीला लग्नात काहीतरी मोठे आणि चांगलेच घ्यावे लागेल. त्याचबरोबर योगितालाही जोड आहेर, म्हणजे दोघा पती-पत्नीला घ्यावा लागेल.” नंदाताई म्हणाल्या.
“मग तिच्या भावाला म्हणजेच यशलाच का तसे ठेवायचे मग? त्यालाही छान ड्रेस आणतो.”असं माधवराव म्हणाले.
“हो त्यालाही घ्यावेच लागेल.” नंदाताई म्हणाल्या.
“मग तिला काय घ्यायचे द्यायला?” माधवरावांनी विचारले.
“तिला दररोज उपयोग होईल असं काहीतरी देऊ.” जरा विचार करत नंदाबाई म्हणाल्या.
“ठीक आहे बघ तू काय घेता येते ते. लग्नाला अजून दहा-बारा दिवसाचा अवकाश आहे.”हातातली पत्रिका टेबलवर ठेवत माधवराव म्हणाले.
“चांगलंच घेऊ काहीतरी. तिच्या हसण्याने, छुम छुम वाजवत चालणार्या पावलांनी,तीच्या बोबड्या बोलाने चैतन्य नांदले या घरात.
काहि दिवस का होईना..मन सांगत होते की ‘हे आपले नाही. पण मायेची ओढ थांबत नव्हती.ती उफाळूनच येत होती.आणि याच ओढीला तीच्या त्या नाजुक कोमल स्पर्शाने पुर्णत्व येत होते.भले तीच्यात अन् माझ्यात कुठलेच नाते नव्हते पण या मायेच्या ऊबीने आम्हाला बांधुन ठेवले होते.”
हंम्म एक उसासा टाकत, परत त्या म्हणाल्या, “काहितरी पुर्वजन्मीचेच ऋणानुबंध नक्की असतील आमच्यात. जाऊ दे, असू दे काय असेल ते, चला मला स्वयंपाक करायचा आहे. किचनकडे वळत नंदाताई म्हणाल्या.
पण स्वैंपाक करता करताच त्या
छोट्या मंजिरीच्या आठवणीत
हरवल्या.
नंदाताईचे घर आधी गावात होते. छोटेच होते.पण त्यातही दोन किरायदार राहत होते. नंदाताई च्या मिस्टरांची शेती प्लस आणखी काहीतरी छोटासा बिझनेस होता. घरात हे दोघे आणि सासूबाई होत्या.यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. पण घरात पाळणा हलला नव्हता. या कारणाने दोघी सासु सुनेत थोडीफार कटकट होत असायची. पण नंदाताई समजून घेत होत्या.आणि माधवरावही मनावर घेत नव्हते. ती वेळ निघून गेली की सगळं नील व्हायचं.
अशातच माधवरावांच्या आईने त्यांच्या मागे ‘अरे माधवा दुसरे लग्न कर मुलासाठी.. मी हयात आहे तोपर्यंत.’
असे त्या सारखं म्हणायच्या,पण माधवरावांनी आईचे हे मनावर घेतलं नाही.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
असेच दिवस जात होते. काही दिवसापूर्वीच एक नवीन किरायदार आले. दोघे नवरा बायको आणि दीड वर्षाची मुलगी असे तिघेजण.
योगिता,
म्हणजेच नवीन आलेली किरायदार.
ती आपल्या मुलीला घेऊन, एकदा तरी नंदाताईंच्या घरात चक्कर मारत असे. ती छोटी मुलगी आली की सासूबाईंना मग फारच बरे वाटायचे. नवीन नवीन ती तिच्या आईला सोडतच नव्हती. पण हळूहळू तिच्या बोबड्या बोलात नंदाताईला, सासूबाईला बोलू लागली. काही दिवसातच तिला नंदाताई आणि सासूबाईंचा चांगलाच लळा लागला. ती आल्यामुळे घरातही बरे वाटायचे या दोघींनापण..
अशातच योगिताला पुन्हा दिवस राहिले. या दिवसात तिचे काही दुखले खुपले तर नंदाताई चा तिला आधार वाटे. आणि विशेष म्हणजे छोट्या मंजिरीकडेही त्या लक्ष देत होत्या.
काही दिवसानंतर योगिताला मुलगा झाला. तिचे बाळंतपण करण्यासाठी तिची आई आलेली होती. आणि चांगले चार महिने त्या राहिल्या.
त्यानंतर मात्र सगळे योगिता वर पडलं. आणि दोन मुलांचं करता करता योगिताला नाकी नऊ येऊ लागले. त्यामुळे मग नंदाताईच मंजिरीला दोन्ही वेळेस स्वतःसोबत बसून जेऊ घालू लागल्या. घरात बाळाने शी केलेली तिने पाहिली.त्यामुळे ती नंदाताई कडेच जास्तीत जास्त खेळत होती.
छोटी मंजिरी घरात असली की, नंदाताईंना घर भरल्यासारखे वाटत होते. त्यामुळे त्यांनाही ती हवीहवीशी वाटायची.तिच्या त्या बोबड्या बोला ने घरात चिव चिवट असायचा. चैतन्य असायचे, बऱ्याच गोष्टी मग तिच्यासाठी घरात यायच्या.
माधवराव तर संध्याकाळी घरी येताना, न विसरता चॉकलेट आणत असत. बाजार असलेल्या दिवशी हमखास शेव चिवडा ठरलेलाच असे.
काही दिवसापूर्वी हे दोघे पति पत्नी अक्कलकोटला श्री. स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले होते. तर तेथून त्यांनी मंजिरीसाठी छोटीशी ट्रेन आणली. ती जेव्हा मंजिरीला दाखवली, तेव्हा तर ती फारच खुश झाली.
पण हातात घेऊन ती म्हणाली,”मी या ट्रेन बलोबल कसं खेळू?”
असा तिचा प्रश्न ऐकून माधवरावांना हसू आले. मग त्यांनीच हॉलमध्ये ट्रेनच्या रुळाच्या पट्ट्या ठेवल्या, आणि मग हळूच तिचे इंजिन आणि सर्व डबे एकमेकांना जोडून ठेवले.नंतर तिचे बटन फिरवले मग ते इंजिन शिट्टी वाजवत वाजवत चालू लागले. तसे तिच्या मागे जोडलेले डबेही त्याच्यासोबत चालू लागले. तेव्हा या फिरणाऱ्या रेल्वे कडे पाहून छोट्या मंजिरीला खूप आनंद झाला. आणि या आनंदातच ती टाळ्या वाजवत वाजवत, उड्या ही मारू लागली. तिच्या या आनंदामध्ये मग माधवराव आणि नंदाताई ही खूपच खुश झाले. पण सासूबाईंनी मात्र टोमणा मारलाच,
“ दुसऱ्यांच्या लेकरांचाच आनंद घ्या. ‘दुसरं लग्न कर’ म्हणते आहे तर ऐकतो का माझं…?”
आपल्या चेहऱ्यावर कसनुसे भाव आणत सासुबाई म्हणाल्या.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.
“आई गप्प बस गंऽ, परत असं काही बोलू नको.” माधवराव तिला हाताने इशारा करत म्हणाले.
पण तरीही नंदाताईने हे ऐकलेच. तसे या आनंदावर विरजण पडल्यासारखे झाले.त्यांचा चेहरा लगेच उतरला. आणि त्या स्वतःच्या मनाला म्हणू लागल्या,” मी हा आनंद या घराला नाही देऊ शकत. देवा, काय माझी ही परीक्षा घेतो आहे?” असा प्रश्न त्यांनी स्वयंपाक घरात येऊन देवघराकडे पहात विचारला. आणि डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा यमुना त्यांनी हलकेच आपल्या पदराने टिपुन घेतल्या.आणि आपल्या पोटावर हात फिरवत असताना त्यांना तो दिवस आठवला…
काय असेल पुढे, नक्की काय झाले असेल नंदा ताईला…? नक्कीच वाचा पुढील भागात..
@सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या