एक नाते असे अनोखे..भाग २, अंतिम
नंदाताई या साडेचार पाच महिन्याच्या गरोदर होत्या.तेव्हा माधवरावांचे आई, वडील म्हणजे सासू सासरे गावी राहत होते. तीथे शेतीकडे लक्ष देत होते.ते हुरड्याचे दिवस होते.म्हणुन मग हुरडा खाण्यासाठी ही शेतात गेली,अर्थात माधवराव ही बरोबर होते. त्यांच्या ओळखीतले आणि सासुबाई च्या मैत्रिणी ही होत्या. म्हणजे हुरडा पार्टीच होती.
तसे नंदाताई लग्न झाल्यावर अगदी बोटावर मोजण्या इतकेच शेतावर गेल्या होत्या. मात्र माधवराव प्रत्येक वेळी बरोबर होतेच. कारण माधवने शेजारच्या मोठ्या गावात चांगले दुकान टाकले होते. त्याला इकडे यायला जमतच नव्हते, तरीही शेतावर फेरफटका मारायला तो नक्की जात असे.
हुरडा खायला आलेल्या सगळ्या बरोबर नंदाताईने दिवस भर छान एन्जॉय केले.तसा हुरडा तीला जास्त खायचाहि नव्हता.
पण.. शेतातुन परत घरी आल्यापासून तीच्या पोटात दुखायला लागले.त्यामुळे ती फारच थकल्या सारखी झाली होती.जरा तीला वाटले की ‘आज आपली दिवसभर दगदग, धावपळ झाली.त्यामुळे असेल कदाचित..’
मग थोडा आराम केला की वाटेल बरे. म्हणून मग तिने आरामच करायचे ठरवले. मात्र मध्यरात्र उलटून गेली तरी तिचे दुखणे काही थांबले नव्हते. त्यामुळे मग सकाळी लगेच तिला दवाखान्यात नेले. तर ब्लिडिंगही सुरू झाले होते.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतले.नंतर ट्रीटमेंट चालू केली.दोन दिवसांनी तीला बरे वाटले. पण डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली.
पंधरा दिवसांनी परत तसेच दुखायला सुरुवात झाली. ब्लिडिंगही सुरू झाले. परत तिला दवाखान्यात ऍडमिट केले. पण व्हायचे तेच झाले. तिचे ॳॅबाॅर्शन झाले.नंदाला खुपच त्रास झाला.इतका की डिलिव्हरी बरी पण हे असे नको व्हायला..
घरातील सगळ्यांना खुप खुप वाईट वाटले.
त्याच वेळी माधवरावांना डॉक्टरांनी सांगितले, की “या परत आई होऊ शकणार नाही.”
डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माधवरावला खूप म्हणजे खूपच वाईट वाटले.
त्याचे जणू सगळे आयुष्यच शुन्य झाले होते. त्यांनी पाहिलेले सुखी संसाराचे स्वप्न, हे स्वप्नच राहिले. मुलांना चांगले आणि योग्य शिक्षण देऊन कोणत्या तरी पदावर त्यांना पाहायचे होते. जे त्यांला करता आले नव्हते, कारण त्याचे गाव हे खेडेगाव होते. आणि तीथे सर्वांना शेतीचीच ओढ होती. यातही शिक्षणासाठी शेजारच्या गावी जावे लागत होते. तसा माधवही शेजारच्या गावी शिक्षणासाठी गेला. सातवी नंतर दहावी झाली. पण पुढे शिकून नेमके काय करायचे हेच कळाले नाही. योग्य मार्गदर्शन करणारे ही कोणी नव्हते. असेच काही दिवस थांबून, त्याने मग त्याच गावात म्हणजे जिथे शिकायला गेला तिथेच छोटेसे किराणा दुकान टाकले. याच्याच पावलावर पाऊल ठेवत छोट्या भावाने ही दुकान टाकले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
डॉक्टरांनी काय सांगितले? हे त्यांनी आपल्या बायकोला म्हणजे नंदाताईला बरेच दिवस सांगितले नव्हते. पण त्या काही केल्या ऐकेना.. म्हणून मग माधवरावांना तिला सांगावे लागले. हे ऐकून मोठा हंबर्डा फोडून ती रडली. तिला त्यांनी खूप साबरायचा प्रयत्न केला. पण तिला सावरण्यासाठी यांच्याकडे शब्दच नव्हते. कारण तेही मूकपणाने अश्रू ढाळत होते. कसंतरी दोघांनी एकमेकांना सावरले. पण तरीही चार दिवस नंदाने अन्न वर्ज्य केल्यासारखे काहीच खाल्ले नाही. माधव बळेच तिला खाऊ घालायचं प्रयत्न करायचा. पण ती खात नव्हती.
म्हणायची,” मी मातृत्व गमावून बसले आहे. ज्या गोष्टींनी स्त्री ला गौरवीलेलं आहे. आणि नेमके तेच माझ्याकडून देवाने हिरावून घेतले आहे . काऽ का?अशी शिक्षा मला दीली आहे त्याने?”
असं म्हणुन रडत असे. पण काही खात नव्हती.
पुढे सासूबाई मात्र प्रत्येक महिन्यात तिच्या गोड बातमीची वाट बघायच्या. आणि निराश व्हायच्या.
असंच एक दिवस मग त्या या दोघांकडे आल्या.आणि म्हणाल्या,”अरे माधवाऽ, हिला चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जा.आता दीड वर्ष झाले तिला तसं होऊन, पण परत अजूनही गोड बातमी नाही.”
हे ऐकून नंदाबाईला आपले अश्रू आवरता आले नाही. पण मग माधवने तिला सगळं सांगितलं. तेव्हा मात्र तिलाही खूप मोठा धक्काच बसला.
नंदा जवळ येत त्यांनी तीच्या डोक्यावरून हात फिरवला . तेव्हा तर मग तीचा आजवर मनात कोंडलेला हुंदका बाहेर पडला. आणि ती सासुबाईंच्या कुशीत शिरली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
दिवस हळूहळू पुढे सरकत होते. मंजिरी आता पाच वर्षाची झाली. बालवाडीतून शाळेत जाऊ लागली. तरीही तिचा नंदाताईशी असलेला लळा कमी झाला नाही. उलट आता ती त्यांच्याच घरातील मुलगी असल्यासारखे हक्काने तेथे राहत होती. योगितालाही मग जास्तीत जास्त वेळ, हा छोट्या यश साठी देता येत होता.
पुढे मग…
म्हणजे मंजिरीच्या वडिलांची बदली जिल्ह्याबाहेर झाली. आणि ते खेडेगावाही होते. तिथे शाळा होती, पण तितकीशी चांगली नव्हती. तेव्हा नंदाताईंनीच मग ‘तिला येथेच राहू द्या. तिचे शिक्षण व्यवस्थित होईल.’ असे सांगितले.
नंदाताईचे यजमान माधवराव हेही म्हणाले, “मलाही काही हरकत नाही. ठेवा तुम्ही तिला इथेच.”
पण मंजिरीचे बाबा लवकर तयार होईना. पण पुढील पाच वर्ष त्यांची बदली तेथून होणार नव्हती. शिवाय यशलाही अजून दोन-तीन वर्ष शाळेला जाण्यासाठी अवकाश होता. म्हणून मग दोघांनीही काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला की तिला येथेच ठेवायचे. म्हणजे नंदाताई आणि माधवराव कडे.
यादरम्यान नंदाताईंच्या सासूबाई देवा घरी गेल्या होत्या. माधवराव दिवसभर त्यांच्या बिझनेस च्या व्यापात राहायचे. त्यामुळे मग घरी फक्त एकट्या नंदाताईच राहत होत्या. म्हणून मग हिची म्हणजे मंजिरीची सोबतच त्यांना होईल. असे त्यांना वाटले.
आणि माया लावायला असं कोणीतरी आहे. हे खूप मोठे समाधान त्यांना मिळणार होते. मायेचा झरा कितीही रिकामा करा. पण कधीच अटत नाही अगदी असेच नंदाताईचे होते.
असंच मग मंजिरी सातवी पर्यंत नंदा ताईकडेच होती. त्यानंतर योगिताने तालुक्याच्या गावी राहायला सुरुवात केली. आणि दोन्ही मुलं चांगल्या शाळेत घातले. नंदाताई आणि माधवराव मात्र अधून मधून योगीताकडे जाऊन मंजिरीला भेटत होते. आणि सुट्ट्यामध्ये मंजिरी ही यांच्याकडे चार दिवस नक्कीच येऊन राहत असे. पुढे मंजिरी कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्याला गेली. मग मात्र तिचे येणे खूपच कमी झाले.
याच मंजिरीची लग्नपत्रिका आज त्यांच्या हातात पडली होती. तिला जवळच्याच नात्यात दिले होते. त्यामुळे साखरपुडा हा घरातल्या घरातच उरकला होता.
नंदा ताईला दोन-तीन दिवस आधी लग्नाला जाण्याची खुप खुप इच्छा होती पण…
माधवरावांच्या काही शारीरिक व्याधीमुळे त्या त्यांना एकटे सोडून जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे दोघेही लग्नाच्या आदल्या दिवशी गेले.
या दोघांनाही आलेले बघून योगिताला आणि तिच्या मिस्टरां खुप खुप आनंद झाला. मंजिरीला हळद लागलेली होती. पण तरीही तिने नंदाबाईंना घट्ट मिठी मारली. त्याचबरोबर नंदा ताईंच्य डोळ्यातल्या अश्रूंनी गालावरून खाली उडी मारली. तशीच अवस्था मंजिरीचीही झाली होती.
“मी खूप सतवलं ना मावशी तुला?” मंजिरी म्हणाली.
“नाही गं बाळा, उलट माझेच भाग्य, की तू माझ्याकडे होतीस. आणि मला तुझे लाड करता आले.तुझ्या आवडीचे खाद्यपदार्थ मला तुझ्यासाठी करता आले. शांत हो आता. या क्षणी हे अश्रू बरे नाही दिसत.” असं म्हणत नंदाताईंनी तिचे डोळे पुसले.
“झालं आता या मायलेकींना दुसरे कोणीच लागत नाही.” असं म्हणत योगिताने जरा विषय बदलाला.कारण आजुबाजूला तीच्या नंदा, जावा होत्या.
“अगं, जरा त्यांना चहापाणी जेवणाचे काही विचार?” असं मंजिरी कडे बघत ती म्हणाली.
हळद लागलेली मंजिरी खूपच गोड दिसत होती. पिवळी साडी तिला फ्रेश निळ्या रंगाची लेस होती. आणि त्याच कलरचा तिने ब्लाऊज घातलेला होता. सिम्पल हळदीची ज्वेलरी ही तिने घातली होती. दिसायला नाजूक असल्यामुळे छान उमलत्या कळी सारखीच ती दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून नंदाताईने स्वतःच्या डोक्यावर ठेवून बोट मोडली. आणि म्हणाल्या,”कुणाची नजर नको लागायला.”
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
नंदाताईच्या हातात अक्षदा होत्या मंगलाष्टक चालू होते. तसतसे यांच्या मनातही कालवा कालव सुरू होती. यांना सासूबाई म्हणत होत्या ते गीत सारखंच आठवत होतं.
‘लेक परक्याचे धन,
कितीही ठेवा सांभाळून,
तरी जाई, जावई घेऊन,
अशी कशी ही रित बाई….।
असं आठवल्यावर नकळत त्यांच्या नेत्रकडा ओलावल्या.
इतक्यात वाजंत्री वाजली, सर्वांनी अक्षता टाकून टाळ्या वाजवल्या. लग्नात बरीच जण ओळखीचे भेटले म्हणून मग गप्पा ही रंगल्या. लग्न लागल्यानंतर एक एक विधी सुरू झाला. कन्यादान करताना मात्र नंदा ताई आणि माधवराव यांनाही बसवले. यावेळी मात्र दोघांनाही ‘आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले’ हे करताना ब्राह्मण मंत्र म्हणत होते, तस तसे आयुष्याला पडलेला पीळ हा उकलत आहे असं जणू दोघांच्याही मनात सुरू होते. ‘कन्यादान’ हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.आणि त्या दानाचे पुण्य आज या मुलीमुळे यांच्या पदरात पडलेलं होतं.
आपल्या जन्माला येण्यापूर्वीच,या जगाचा निरोप घेतलेल्या बाळाची आठवण दोघांना ही या क्षणी तीव्रतेने झाली होती.
कन्यादान झाल्यानंतर मंजिरी साठी आणलेले गिफ्ट दोघांनी तिच्या हातात दिले. त्यानंतर नंदाताईला काय वाटले काय माहित त्यांनी आणलेले गिफ्ट म्हणजेच सोन्याचा नेकलेस स्वतः तिच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, “हा कायम गळ्यात असू दे.या मावशी ची आठवण म्हणुन..
हे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर खुप समाधानाचे भाव झळकत होते.
(ही कथा पुर्ण पुणे काल्पनिक आहे.)
§ समाप्त §
@सौ. शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या