जीवन गाणे गातच राहावे..भाग १
निकिता अंथरुणावर पडल्या पडल्या, विचार करत होती. झोपण्यापूर्वी तिला सिद्धेशने सांगितले होते की, ‘उद्या संध्याकाळी आई-बाबा येणार आहेत.’
तिचं रुटीन ठरलेले होते. सकाळी साडेनऊला, ती घरातलं सगळं आवरून ऑफिसला जात होती. त्या आधीच सिद्धेशही ऑफिसला
निघत होता. जाता जाता ती छोट्या सनीला, म्हणजे तिच्या तीन वर्षाच्या मुलीला पाळणाघरात ठेवत होती. तिच्यासोबत तिचा दोन वेळचा टिफिनही ती पॅक करून द्यायची. या दोघांचा नाश्ता घरी होत होता. मात्र दुपारचे जेवण ती दोघेही ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये करत होती. निकिताला सकाळी सनीचे आवरून, स्वयंपाक करणे होत नव्हते. त्यामुळेच तिला टेन्शन आले होते. की आता हे आल्यावर कसे करावे.
लग्नानंतर ही दोघेही, म्हणजे सासू-सासरे फक्त एकदाच आणि तेही दोनच दिवस, या दोघांचा नवा संसार बघायला आले होते. त्यानंतर तेआता येत होते.
सिद्धेश चे बाबा दोन महिन्यापूर्वी रिटायर झाले होते. त्यामुळे मग दोघेही काही दिवस मुलाकडे राहण्यासाठी येत होत.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
रिटायर झाल्यावर ती दोघेही कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन आली. म्हणून आता काही दिवस मुलाकडे राहावे. आणि पुण्यातील प्रेक्षणीय स्थळे पहावी. असा त्यांचा कयास. सुट्टीच्या दिवशी असाच बेत ठरवून, आसपासची बघण्या सारखी ठीकाणं पाहावी. असं ठरवून ती दोघेही राहण्यास येणार होती. गावी पाशात अडकवेल, असे काहीही नव्हते. एक मोठं घर सोडलं तर काहीच नव्हतं.
एक मुलगा, एक मुलगी. असं छोटंसं कुटुंब त्यांचं होतं. मोठा मुलगा सिद्धेश आणि लहान मुलगी सरिता. सरिता ही तिच्या घरी, म्हणजेच सासरी नाशिकला होती. अगदी सुखात नांदत होती. जावई कंपनीमध्ये चांगल्या पदावर होते. एक मुलगा एक मुलगी तिला होते. शिवाय ती पण दहा ते चार या वेळात मल्टी सर्विस या कंपनीमध्ये जॉब करत होती. घरात सासू-सासरे असल्यामुळे मुलांची तिला काळजी नव्हती.
सिद्धेश हा इंजिनियर झाला होता. आणि त्यानी त्याच्याच कॉलेजमधील मैत्रिणीशी म्हणजेच निकिताशी लग्न केले होते. तीही इंजिनियर असल्याने कंपनीत जॉब करत होती. दोघेही दिवसभर ऑफिसला जात होते. त्यामुळेच मग मुलीला म्हणजेच सनीला तिने पाळणाघरात ठेवले होते. तिच्या ओळखीच्या त्या काकू होत्या, अगदी चार-पाचच मुलं त्यांच्याकडे होती. खूप छान त्यांची काळजी घेत होत्या त्या दिवसभर.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
# # #
निकिता ऑफिसमधून आल्यावर, तिने सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला. तीचा स्वयंपाक होईपर्यंत, सनीही तीच्या मध्ये मध्ये करत होती.तिचा स्वयंपाक झाल्या बरोबर डोर बेल वाजली. सिद्धेश त्याच्या आई-बाबांना घेऊन आला होता. आल्यावर हात पाय धुऊन दोघेही फ्रेश झाले.त्यानंतर छोट्या सनीला आई जवळ घेऊ लागली. पण ती अजिबात येत नव्हती. तीचे रडणे मात्र सुरू झाले होते. मग तर ती मम्मीला सोडेच ना. तिला काही करूही देईना.म्हणून मग तिला सिद्धेश घेऊन बसला. तशी मग गप्पा मारू लागली.
“जेवलीस का बाळा तू?” आजीने विचारले. “नईऽ मला ना आता मम्माच्या हाताने जेवायचे आहे.” असं तिने सांगितले.
“आन बरं निकिता.” त्यांनी सुनेला सांगितले. तिनेही तिच्यासाठी वरणभाताची प्लेट आणून दिली.
पण बाईने पप्पांची मांडीच सोडली नाही. आणि आजीच्या हाताने एकही घास खाल्ला नाही. ती त्यांच्याकडे जायलाच तयार नव्हती. असं पाहून संगीताताईंच्या नेत्रकडा
ओलावल्या.
नातीच्या ओढीने ती दोघेही आलेली होती. आणि इथे तर…
हे पाहून सिद्धेश म्हणाला,”अगं आई असं काय गं, तुम्ही तिला अजून नवीन आहात ना. एक दोन दिवस तिच्यासमोर राहिलात की होईल ना ओळख.”
“हो रे, तेही खरच आहे.” संगीता ताई.
“अरे तुम्ही पण असेच होता ना. घरात कोणी आले तर तिच्या पदराला धरून मागे मागेच फिरत होतात. लेकरांचे असेच असते.आपण तिला फोनवर बोलत होतो. व्हिडिओ कॉल ही करत होतो. पण ते मोबाईल मध्ये. प्रत्यक्षात नाही.” सिद्धेश चे बाबा म्हणजेच रमाकांतराव म्हणाले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
सकाळी निकिता नेहमीपेक्षा लवकर उठली. कारण आज स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे थोडाही वेळ न घालवता तिने पटापट सर्व आवरले. म्हणजे नाश्ता करण्याच्या ऐवजी, तिने सरळ पोळी भाजीच बनवली. आणि सनीचे दोन वेळचे टिफिनही बनवले. सनीचे आज सिध्देशने जरा लक्ष ठेवून आवरले होते. ती पण तयार झाली.
बाबा आणि आई हे दोघेही उठले होते. त्यांचे चहापाणी आवरले होते. दोघेही हॉलमध्ये बसले. रमाकांतराव पेपर वाचत बसले होते. “आई पोळी भाजी करून ठेवली आहे. दुपारी थोडासा वरण भात लावा. तुम्हाला गरम गरम खायला होईल.” निकिताने आईला सांगितले. “अग पण सनीला राहू दे ना घरी. तिचेही आवरून तुम्ही घेऊन चाललात.” असं आई खेदाने म्हणाली.
“नकोऽ तिला त्या काकू, तिथल्या प्ले ग्रुपच्या शाळेत नेऊन सोडतात. दोन अडीच तास. परतही घेऊन येतात.” निकिताने सांगितलं.
“आई उद्या शनिवार आहे. तर आम्ही दोन दिवस सगळे घरीच राहणार आहोत. या दोन दिवसात तुमची गट्टी जमेल. मग ती तुझ्या सोबत राहील बघ.” आईला दिलासा देत सिध्देश म्हणाला.
आणि ते तिघेही आज बरोबरच जाण्यासाठी निघाली.
तेव्हा आई सनी जवळ जाऊन बाय बाय करत तीला म्हणाली, “लवकर ये बाळा घरी.” हे पाहून सनीने नुसतीच मान हलवली.
“हो आई, मी येईल आज लवकर.” असे निकिताने जाता जाता सांगितले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
ते गेल्यावर संगीता ताईने दार लावून घेतले. आणि त्या येऊन सोफ्यावर बसल्या.
“काय मग तिथेही दोघेच होतो दिवसभर. आणि इथेही..” हातांची ॲक्शन करत त्या नवऱ्याकडे पाहत म्हणाल्या.
रमाकांतराव हळूच चष्म्या च्या वरून बायकोकडे पाहत म्हणाले,”अगं दिवसभर नाही, पण रात्री तर सगळी भेटतील ना.”
“हो तेही खरंच आहे म्हणा, चला आता मी माझे आवरते.” असं म्हणत त्या अंघोळीसाठी बाथरूम कडे वळल्या.रमाकांत राव मात्र पेपर वाचण्यात मग्न होते. ते आता पेपर मधले शब्द कोडे सोडवत होते.
# # #
दुसऱ्या दिवशी..
म्हणजे शनिवार असल्याने, सगळेच रेंगाळलेले होते. त्यामुळे ही दोघेच म्हणजे रमाकांत राव आणि संगीताताई सकाळी आपल्या वेळेवर उठले. आणि आपले आवरून, म्हणजेच चहापाणीही झालेहोते.आणि ते दोघेही हाॅल मध्ये गप्पा करत बसलेली होती.
सनी उठली. आणि हळूच हॉलमध्ये आली.
आजीच्या खांद्याला हात लावत म्हणाली,”मला ना तिकडे जायचे आहे.” वॉशरूम कडे बोट दाखवत ती म्हणाली.
यांच्या लक्षात आलं तिला नेमकं काय म्हणायचे आहे ते.
मग त्या उठल्या, आणि तिला वॉशरूम कडे घेऊन गेल्या.
त्यानंतर पुन्हा काही वेळाने मग ती छोटासा बॉल घेऊन परत आली. आणि पेपर वाचत असणाऱ्या रमाकांत रावांना म्हणाली,
”अहो बाबा माझ्यासोबत बॉल खेळा ना..”
“अरे वाऽ. तुला खेळता येतो का बाॅल?”
ते खुश होत म्हणाले.
“हो.. माझ्याबरोबर पप्पा आणि मम्मा दोघेही खेलतात. आणि तिकले त्या आंटी पण खेलतात.”
असं तिने आपल्या बोबड्या बोलात सांगितले.
मग दोघांनीही खाली बसून खेळायला सुरुवात केली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
असंच मग हळूहळू ती संगीताताई बरोबर पण खेळू लागली. दोन-तीन दिवसात छानच गट्टी जमली आजी आजोबा सोबत.
सोमवारी सिद्धेशने घरूनच ऑफिसचे काम केले. म्हणून सनीलाही घरीच ठेवले. पप्पा काम करत आहेत. असं पाहून तिने सर्व आजी कडूनच करून घेतले.
मंगळवारी सकाळी निकिताने सर्व आवरले. सनीचेही आवरले. मात्र आईने सकाळीच स्वयंपाक करू नको असे सांगितल्यामुळे तिला बरं वाटलं, पण तरीही तिने नाष्टासाठी भरपूर करून ठेवले.
निघताना मात्र निकिताने हळूच सनीला म्हटले,”तू राहा ना बाळा घरी. त्या आंटीं ना आज गावाला जाणार आहेत.”
“मग तू माझं कसं आवललं?” तिचा प्रश्न.
“बाळा, मला त्यांचा काल फोन आला होता. पण मी विसरूनच गेले. घरी आजी आणि बाबा आहेत ना. मी पण लवकर येईल.”निकिता म्हणाली.
“तू लवकर पलत येशील ना? तलच मी..”सनी.
“हो गं बाईऽ, येईल मी लवकर परत. बरं तू आजीच्या हाताने व्यवस्थित जेवण कर.”
निकिता म्हणाली.
जरा रडवेला चेहरा करत सनीने मानेनेच होकार दिला.
निकिता ने मनानेच हा प्लॅन केला होता. सासुबाईच्या मनातली घालमेल
ओळखुन.म्हणुन तीने संगीता ताईंच्या कडे बघून हलकेच स्माईल केले.अन् ती बाय
बाय म्हणत पटकन निघून गेली.
मम्मा गेल्यावर, तशीच रडवेल्या चेहऱ्याने ती आजी सोबत घरात आली. आणि टेडी बियर घेऊन ती सोफ्यावर बसली. एकदम शांत. जणू तिचे न जाण्याचे सगळं सगळे दुःख ती त्या टेडी बियर ला सांगत होती.
आजीने मग बाबांना ‘लक्ष द्या’ असं सांगितलं.
उर्वरित कथा पुढील भागात…
सनीचे पुढे काय होणार आहे…
हेही वाचणे, एक नवी दिशा देणारे नक्कीच ठरेल.
(ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.)
@सौ.शुभांगी सुहास जुजगर.
माझ्या या कथा आवडत असतील तर कमेंट आणि फाॅलो करा.
0 टिप्पण्या