फॉलोअर

आषाढी एकादशी- कथा आणि वारी

 आषाढी एकादशी-कथा आणि वारी


साजिरे रूप सुंदर,
कटी झळके पितांबर,
कंठात तुळशीची हार। 
कस्तुरी टिळा,
देव माझा विठू सावळा।।


आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला, आपण ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’असे म्हणतो. तसे तर संपूर्ण वर्षांमध्ये 24 एकादशी येतात. पण या सर्व एकादशीत आषाढी एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. 
या दिवशी भगवान श्री विष्णू चार महिने क्षीरसागरातील शेषशय्यावर शयन करतात. या चार महिन्यालाच आपण ‘चातुर्मास’ असेही म्हणतो.
याविषयी पुराणांमध्ये असं आहे कि,
बळीराजाने वामन अवतारातील भगवान श्री विष्णूंना आपले सर्वस्व अर्पण केले.यामुळे भगवान श्री विष्णु बळीच्या दानशीलतेवर अतिशय प्रसन्न झाले.
त्यावेळी भगवान श्री विष्णू त्याला म्हणाले,
 “तु आता पाताळात जाऊन राहावे.”
“ठीक आहे.” राजा म्हणाला.
“आता तु काही वरदान माग.”असं श्रीविष्णु त्याला म्हणाले.
हे ऐकून राजा खुष झाला.
मग राजा आपले हात जोडत म्हणाला,
“हे भगवान, तुम्ही पण माझ्या बरोबर पाताळात निवास करावा.एवढीच माझी इच्छा आहे.”
ही राजांची इच्छा ऐकुन भगवान म्हणाले,

“मी नेहमी साठी तुझ्या कडे नाही राहु शकत,पण प्रत्येक वर्षी काही दिवस तुझ्या कडे नक्कीच येऊन राहिन.”
 ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात. 

तेव्हा पासून श्रीविष्णू, हे दिलेल्या वचना मुळे प्रतिवर्षी आषाढी एकादशी पासुन पाताळात बळीराजा कडे जाऊन राहातात.

एकादशी व्रत हिंदू धर्मातील एक पवित्र उपवास आहे, जो भगवान विष्णूच्या पूजेच्या निमित्ताने ठेवला जातो.या वर संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाच्या या ओळी,
 ‘एकादशीस अन्न पान। जे नर करिती भोजन।
श्वान विष्ठेसमान।अधम जन तो एक।।
ऐका व्रताचे महिमान।नेमे आचरती जन।
गाती ऐकती हरि किर्तन। ते समान विष्णूशी।।

या व्रताची कथा आणि महात्म्य वेगवेगळ्या पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे. त्यापैकी एक प्रसिद्ध कथा अशी आहे:
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

 फार प्राचीन काळी या भूमंडलावर एक भयंकर दैत्य होता. त्याचे नाव मुर असुर असे होते. 
एकेकाळी भगवान शंकरांची त्याने कठोर तपश्चर्या केली. या मुळे भगवान शंकर हे प्रसन्न झाले.
आणि त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले.
यावर तो दैत्य म्हणाला, “ कोणत्याही प्राण्याच्या हाताने मला मरण प्राप्त नाही झाले पाहिजे,तर फक्त एका स्त्रीच्या हातून मला मरण यावे.”
असा वर त्याने मागितला.
 प्रसन्न होत शंकर भोलेनाथांनी या राक्षसाला, “इतर कोणा कडूनही तुला मरण प्राप्त होणार नाही, तर केवळ एका स्त्री च्या हातून तुझा अंत होईल.”असा वर दिला. 
या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला.तो अत्याचार करू लागला.
आणि त्याने ‘आता आपल्याला कोणी ही मारू शकत नाही’ असा त्याच्या मनात ठाम विश्वास होता.
आणि याच विश्वासाच्या जोरावर त्याने देवांवर स्वारी केली.त्यांना युध्दात पराजित केले.त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. 
 त्यानंतर त्याने आपला मोर्चा श्रीविष्णूस जिंकण्यासाठी वैकुंठाकडे वळवला.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

भगवान विष्णूने मुर असुराशी युद्ध केले. हे युद्ध अनेक वर्षे चालले, पण मुर असुर अतिशय शक्तिशाली असल्याने त्याचा पराभव होऊ शकला नाही. अखेरीस भगवान विष्णू थकले आणि विश्रांती घेण्यासाठी एका गुहेत गेले. मुर असुराने या संधीचा फायदा घेण्याचा विचार केला आणि त्या गुहेत जाऊन भगवान विष्णूला मारण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा त्या गुहेतून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. तिचे तेज इतके प्रखर होते की, मुर असुर त्या तेजाने आंधळा झाला. त्या स्त्रीने मुर असुराशी युद्ध केले. आणि त्याला पराभूत करून, त्याचा वध केला. भगवान विष्णू उठले. आणि त्यांनी त्या स्त्रीचे आभार मानले. त्यांनी विचारले, "हे देवी, तू कोण आहेस?"

ती स्त्री म्हणाली, "प्रभु, मी आपली अंश आहे आणि माझे नाव एकादशी आहे. मी आपली सेवा करण्यासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट झाले आहे." 
 तीचे हे उद्गगार ऐकुन भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. आणि त्यांनी एकादशी देवीला वरदान दिले, ”की तिच्या नावाने जे व्रत करतील, त्यांच्या सर्व पापांचा नाश होईल, आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल.”

त्यानंतर एकादशी व्रताची महती वाढली. दर महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन पक्षांमध्ये एकादशी येते. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केली जाते. आणि व्रती उपवास करतात. या उपवासामुळे शरीर शुद्ध होते, मन शांती लाभते, आणि अध्यात्मिक उन्नती साधता येते.

या व्रताचे पालन केल्याने पापांचे निवारण होते आणि भक्तांना भगवान विष्णूच्या कृपेचा लाभ होतो. विशेषतः ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, त्यांनी एकादशी व्रत आवर्जून करावे. असे मानले जाते. यामुळे आत्मशुद्धी होते आणि परमात्म्याशी एकरूपता साधता येते.

याच आषाढी एकादशीला महाराष्ट्रामध्ये, पंढरपूरची वारी ही एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात ‘पंढरपूरची वारी’ करण्याला विशेष असे महत्व आहे. ही वारी म्हणजेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला पायी पायी चालत नेण्याचा जणु सोहळाच आहे.तर तर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथांची पालखी तर श्रीक्षेत्र पैठण येथून संत एकनाथांची पालखी पंढरपूर येथे आपल्या विठू माऊलीच्या भेटीसाठी प्रस्थान करते.
संत नामदेव,संत सावतामाळी, संत नरहरी सोनार यांच्या ही पालख्या पंढरी कडे प्रस्थान करतात.

 एवढेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करत करत,’ज्ञानोबा माऊली तुकाराम’असा जयघोष ही करत,तसेच चालत चालत मुखाने अभंग,भजन म्हणणेही सुरू असते.आणि थांबल्या वर किर्तन..
हे सांगताना सांगणार्याला परमानंद होतो,तर ऐकणार्याला या भक्ती रसात न्हाऊन निघाल्या सारखे वाटते.
ही वारी म्हणजेच श्रध्दा आणि भक्तीचा एक अद्वितीय सामुहिक संगमच आहे.

या वारीची सुरुवात कधी आणि केव्हा झाली? हे हे माहीत नाही. पण पण काही पुराणात पंढरपूरची पहिली वारी ही ‘भगवान श्री शंकर, पार्वती आणि गणपती सोबत केलेली आहे. असे आढळते.

पंढरपूरच्या वारीबाबत एक पौराणिक कथा आहे. जी भगवान शंकर, देवी पार्वती आणि श्रीगणेश यांच्याशी संबंधित आहे. या कथेनुसार, श्री शंकरांनी प्रथम पंढरपूरची वारी केली होती. ही कथा अशी आहे:

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

एकदा भगवान शंकर, आणि देवी पार्वती हे दोघेही कैलास पर्वतावर निवास करत होते. 
तेव्हा अचानक भगवान शंकरांना, विठोबाची भक्ति करायची इच्छा झाली. याचाच ते विचार करत असतानाच त्यांनी ठरवले. कि आपण श्रीविष्णुंना भेटण्यासाठी पंढरपूर नगरी कडे प्रस्थान करायचे.मग देवी पार्वती ही यायचे म्हणाली.आणि श्रीगणेश ही तयार झाले.मग भगवान शंकर, देवी पार्वती आणि गणेशासह पंढरपूरला जाण्यासाठी निघाले. पंढरपूरला येऊन त्यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीची भक्ती केली.
या यात्रेत त्यांना खूप खुप आनंद मिळाला.प्रसन्न ही वाटले. 
आणि तेव्हापासून दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरला जाण्याची प्रथा सुरु झाली. असे मानले जाते. 
म्हणूनच पंढरपूरची वारी ही अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा मानली जाते. आणि या वारीत अनेक भाविक भक्त स्वेच्छेने सहभागी होतात.

याप्रमाणे, पंढरपूरची वारी ही पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण यात्रा आहे.
 
आषाढी एकादशी निमित्त ही 
#आरती विठ्ठलाची#

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
 
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
 
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
 
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥

ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
 
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥


सौ.शुभांगी सुहास जुजगर.
🌺🌺🌺🌺🌺


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या