फॉलोअर

जीवन गाणे गातच राहावे.. भाग २

जीवन गाणे गातच राहावे.. भाग २

 

मम्मा गेल्यावर, तशीच रडवेल्या चेहऱ्याने ती आजी सोबत घरात आली. आणि टेडी बियर घेऊन ती सोफ्यावर बसली. एकदम शांत. जणू तिचे न जाण्याचे सगळं सगळे दुःख ती त्या टेडी बियर ला सांगत होती. 

आजीने मग बाबांना ‘लक्ष द्या’ असं सांगितलं.

उर्वरित कथा पुढील भागात… 

    

जीवन गाणे गातच राहावे..


बऱ्याच वेळाने मग ती आजीजवळ येऊन, “आजी तुम्ही काय कलता?” 

“मी न.. आता बप्पांची आरती करणार आहे. तु करते का?”संगीता ताई.

“नको.”सनी.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात. 

“मग ही घंटी वाजवतेका?” संगीता ताई तिला देवघरातली घंटी वाजवत वाजवत म्हणाल्या.

 

“द्या. ही वाजवते मी.” आरती करत असताना तिने आजीचे पूर्ण निरीक्षण केले.

पण तिला आरती म्हणता नाही आली. याचे फार दुःख झाले. 


असाच मग तिचा, काही वेळ आजी सोबत तर काही वेळ हा बाबांसोबत छान गेला.

 

 तीने दुपारी जेवण करताना तीचा टिफिन मागितला. पण आजीने मस्त गरम गरम वरण भात त्यावर भरपूर तूप घालून तिला खाऊ घातले. जेवण करून मग संगीता ताईंनी तिला झोपी घातले.

संध्याकाळीही पाच वाजता तिला दूध पाजुन फ्रेश केले. आणि त्यानंतर तिला म्हणाल्या, “चला आता आपण बाहेर जाऊ. ती बघ तिकडे बागेमध्ये मुले खेळत आहेत.”

“कुठे मला दाखवा.” तीने उत्सुकतेने विचारले.

 

मग तिला कडेवर घेऊन त्यांनी दाखवले. तर बरीच लहान मुलं मुली अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये खेळताना तिला दिसले.

हे पाहून ती म्हणाली,”हो मला पण जायचे तिकडे. पण आता मंम्मा येईल ना?”तीच्या मनात गोंधळ सुरू होता.

“हो येऊ दे ना. ती आपल्याला फोन करेल ना आल्यावर. जायचे ना मग?”

 तिने आपले दोन्ही हात विठ्ठलासारखे कमरेवर ठेवत होकारार्थी मान हलवली. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

दोघीही आजी आणि नात अपार्टमेंट च्या गार्डनमध्ये गेल्या. तिथे गेल्यावर नातीला खेळताना छान मैत्रिणीही मिळाल्या खेळण्यासाठी. त्यामध्ये रुही नावाची एक मुलगी होती. तिच्याशी हिचे फार जमू लागले. ती तिथे खेळण्यात इतकी रमली की,” घरी चला” म्हटलं तरी “थोडं थांब” असं दोन वेळा म्हणाली.

शेवटी..

“अग मम्माचा फोन आला आहे.चला आता.” असं म्हणाल्यावर मग ती उठली.

 

घरी आल्यावर निकिताने तिला जवळ घेतली. म्हणाली, “कसा गेला आज माझ्या बाळाचा दिवस?”

“आज मी ना घंटी वाजवली. आजी सोबत.”

 “अरे वा. अजून?”

“अजून मी बाबा सोबत खेळले बॉल. तुला माहिते का? मला ना आजीने वरण भात खाऊ घातला. 

“आवडला का गं?”

“हो आवल्ला.आणि मला ना एक मैत्रीण मिळाली आता गार्डनमध्ये खेळताना. रुही नाव आहे तिचं.”

 “वा वाऽ म्हणजे छान करमले आहे मग एका मुलीला आज.” निकिता असं म्हणाल्यावर ती लाजली. एकूणच तिचा मूड आज खूप खुश वाटत होता. 

असंच मग तिचं पाळणाघर हळुहळु बंदच केलं संगीता ताईने. मात्र तिला शाळेत नेण्यासाठी आणण्यासाठी गाडी ठरवली. एक दोनअडीच महिन्यात सनी आता छान घरात रमली. शाळेत आणि बाहेर खेळणे ही तिचे, भरपूर होऊ लागले. बिल्डिंगमध्ये तिला मैत्रीणिही झाल्या. त्यामुळे ती आता न किरकिर करता जेवण करू लागली. आवडीनिवडी ही फारशा राहिल्या नाही. हे सर्व बदल निकिताने आणि सिद्धेशने नीट ऑब्जर्व केले होते. आणि सिद्धेशला आईसाठी जणू त्यांचे बालपणच परतून आलेले त्याला दिसत होते. कारण त्याची बहीण सरिता ही, त्याच्या समोरच लहानाची मोठी झाली होती. घरातल्या जबाबदाऱ्यामुळे तिच्याकडे आणि आपल्याकडेही तिला जास्त लक्ष देता नाही आले.पण आता..

रमाकांत राव यांना ही हे सर्व पाहून खूपच छान वाटत होते.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


 सगळे हॉलमध्ये बसलेले होते. सनीचे तिच्या बाबांसोबत काहीतरी खेळणे चालूच होते. रात्रीच्या जेवणासाठी थोडा वेळ होता म्हणून, सर्वजण बसले होते. सिद्धेश आणि संगीता ताई च्या गप्पा सुरू होत्या. 

इतक्यात निकिताने एक पाकीट संगीता ताईच्या हातावर ठेवले. त्याबरोबरच त्या तिच्याकडे पहात म्हणाल्या,”काय आहे हे निकिता?”

“आई उघडून बघा ना.” निकिता असं म्हणाल्यावर त्यांनी पाकीट उघडले. तर त्यात पैसे होते. “कशाचे पैसे आहेत हे?” त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिलेले चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. 

“तुम्ही रागावणार नसाल तर सांगते.” निकिता. “नाही रागवणार.” आई.

“आई हे तुमचे पैसे आहेत.” निकिता.

“माझे पैसे तुझ्याकडे कसे?” 


“सांगते.” निकिता आई शेजारी बसत म्हणाली. “आई मी सनीला पाळणा घरात ठेवत होते.अर्थात मला नव्हते आवडत पण..तरीही ठेवत होते.पण तुम्ही आल्यापासून ते बंद केलेआहे. आता तुम्ही दोघे घरी असता. म्हणून मी तिला घरी ठेवून निवांत ऑफिसला जाते.तीही तुमच्या सोबत राहुन खुपचं खुष असते.”निकिता.

इतक्यात सनी, तीची गाडी खेळत खेळत येऊन आजीच्या मांडीवर बसते.

“अगं तिकडे खेळावे बेटा.” सिध्देश.

“आजी आजोबांचे प्रेम तिला मिळते आहे. यातच मला खूप आनंद आहे. मी तर माझे आजी-आजोबा पाहिले देखील नाहीत.त्यांचे प्रेम तर लांबच राहिलं. माझी लेक नशीबवान आहे.तीला तुमच्या सहवासात राहण्याचे भाग्य लाभले आहे.” निकिता.

“निकिता, अगं काय हे?” सिद्धेशने तिला मध्येच विचारलं.

“अहो तुम्ही तरी समजून घ्या ना. आईच्या बाबांच्या प्रेमाची, वात्सल्याची पैशात मोजणी होतच नाही. पण ही एक 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


आपली जबाबदारी आहे. ती त्या काही अंशी पार पाडत आहेत. आपण बाहेर जातो तर पैसे कमावण्यासाठी. तर तुम्ही हे एक ठेव म्हणून सांभाळा. नाही म्हणु नका.” निकिता म्हणाली.  

“आमच्या साठी पण तीचे बालपण म्हणजे, आमचीच लेकरं जणु पुन्हा लहान झाली आहेत.असं वाटतं आहे. ते कोणी पैश्यात मोजत नाही. म्हणुन असं वाटतयं की हे पैसे देऊन तु परकं केलंस.” संगीता ताई म्हणाल्या. 

“काय आहे हे निकिता?” असा तिला रमाकांत रावांनी सवाल केला.

“नाही बाबा मला काही विचारू नका.” निकिता म्हणाली.

“आई हे पैसे तुम्ही कश्याला ही खर्च करा. आम्ही कोणीच, काहीही म्हणणार नाही.आणि बाहेर पडल्यावर तुम्हाला काहिहि आवडले तर ते बिनधास्त घ्या. ते घेण्यासाठी कोणालाही पैसे मागायचे नाही.तुम्हाला वाटेल की मी सुनेला कसे पैसे मागु? त्यामुळे हे तुमच्या जवळ राहू द्या. हे अगदी मनापासून मी सांगते आहे.बघा ना एक दोन महिने आपण करून बघू. उरलेले पैसे मी अकाउंट ओपन करून देते त्यात ते भरा हवं तर..”

 असं म्हणुन निकिता कीचन मध्ये निघुन गेली.

पैसे तर सुनबाई परत घेईनाच, नाईलाजाने मग त्यांनी ते ठेवून घेतले.


रात्री झोपताना त्यांचे विचारचक्र सुरुच होते.

माझ्या कामाचे आजपर्यंत मला कधीच पैसे मिळाले नव्हते.हीने मला ते दिलेले आहे.तर तीच्या वर राग धरू, की तिचे कौतुक करू.काहीच कळेना.

घरातली धुणीभांडी करायला बाई लावली तर, ती महिन्याला दीड दोन हजार रूपये घेते.पण आपण आपल्या कामाचे कधीच मोल केले नाही.मग सुनबाई करते आहे, तर वाईट काय आहे त्यात..

बायको अशी विचारात असताना बघुन रमाकांत राव म्हणाले,”अगंऽ सुनबाई ऐवढे आग्रहाने देते आहे तर घे आनंदाने. मला मात्र हे आयुष्यात कधीच जमले नाही.फक्त ‘हे सगळं तुझंच आहे.’ असंच मी म्हणत राहिलो.पण तुला मी मागीतल्या शिवाय कधीही पैसे दीलेले नाही.”

 “असं काय म्हणता तुम्ही?माझं सर्वस्व म्हणजेच माझे घरचं होते ना.मुलांच्या सुखामध्ये आणि तुमच्या सुखामध्ये माझं सुख ओसंडून वाहत होते.” संगीताताई काहिश्या भूतकाळात हरवत म्हणाल्या.

“तुला त्या वेळी भरपुर काय काय करावे वाटत होते पण, परिस्थितीमुळे हात बांधलेले होते. तर आता त्यामध्ये डोकावून बघ. कदाचित एखादा सुर आजही तुझी प्रतिक्षा करत असेल.”असं म्हणत त्यांनी तीच्या मनातील घालमेल दुर केली.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


# # #


दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे तो रविवार होता. 


सगळेजण चहा पीत बसले होते रमाकांत राव त्यांचे पेपर मधले कोडे सोडवत बसले होते. चहा पिता पिता संगीता ताई सिध्देशला म्हणाल्या.

“ सिद्धेश चल बरं आपण मार्केटमध्ये जाऊ.मला सनीला खेळण्यासाठी सायकल आणायची आहे.”

हे ऐकून दोघेही म्हणजेच निकिता आणि सिद्धेश एकमेकाकडे अवाक् होऊन बघु लागले.आणि एकमेकांच्या हातावर टाळी देत हसु लागले. रमाकांतरावच्या चेहऱ्यावर देखिल आनंद फुलुन आल्याचे दिसून आले.

         

     # समाप्त #


(ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे)


भाग१


@ सौ. शुभांगी सुहास जुजगर.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या