फॉलोअर

राधा ही बावरी भाग १

 

राधा ही बावरी भाग १ 

Source: Google 


अबोली दोन दिवसापूर्वीच या शहरात आलेली.  होस्टेलवर राहण्याचीही  पहिलीच वेळ होती.या शहरातही नवीनच होती, तिचा येथील कॉलेजला नंबर लागला होता. त्यामुळे रूम करून राहण्या  ऐवजी होस्टेलवर राहण्याचा तिने निर्णय घेतला होता. आई-वडील यांचाही होस्टेलवर राहण्याचाच आग्रह होता. म्हणून मग वडील तिला येथे सोडून गेले होते. कॉलेजच्या ऍडमिशन चे काम आधीच पूर्ण झाले होते. 


सकाळी उठून तिने स्वतःचे आवरले,कॉलेजला जाण्यासाठी.. पण तिला उठल्यापासून तिची पार्टनर दिसलीस नव्हती. रात्री होती पण..  जास्त तिच्याशी बोलणं झालं नव्हतं. कॉलेजच्या वेळेनुसार मग ही एकटीच कॉलेजला जाण्यासाठी निघाली.


कॉलेजच्या आवारात गेल्यावर, काही मुलं म्हणजे रॅगिंग करणारे, तिला त्रास द्यायला लागले. ती स्वतःला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. कोणीही जवळपास नव्हते. ‘ती सोडा मला, जाऊ द्या, मी हात जोडते.”

 असं ती सारखं म्हणत होती. पण तिचे ते कोणीच ऐकत नव्हते. तिच्याकडची सॅक एक जणांनी काढून घेतली होती. आणि त्यातील पेन वही काढून काहीतरी विचित्र त्या वहीवर  लिहीत बसला. आणि हसत होता स्वतः शीच. मोठ्याने हसत होता. हे सगळे ज्या भिंतीजवळ, म्हणजेच वॉल कंपाऊंडच्या जवळ चालले होते.

त्याच वॉल कंपाऊंडच्या पलीकडच्या बाजूला काॅलेजचे कॅन्टीन होते.


या कॅन्टीनमध्ये नीरज त्याच्या मित्रा सोबत म्हणजे सुबोध बरोबर कॉफी पीत बसला होता. त्याच्या कानावर हा सगळा प्रकार पडला. म्हणून त्याने कॉफीचा मग टेबलावर ठेवला, आणि तो खुर्चीवर चढून त्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला.आणि पलीकडच्या बाजूचे शूटिंग केले. त्यामुळे तिकडे नेमके काय चालू आहे? हे त्याला लगेच कळले. आणि तो ताबडतोब मित्राला घेऊन त्या स्थळी आला. कुठून एवढी ताकद त्याच्यात संचारली कोण जाणे? त्याने त्या सर्व मुलांना चांगलाच चोप दिला.आणि वर पुन्हा शाब्दिक दम देऊन तंबीही दिली.

“जर पुन्हा हिच्या वाट्याला जाल तर.. मला माहित नाही, कि मी तुमचे काय हाल करेन..समजलं का?”

नीरजचं असं बोलणं ऐकून ते जरा जास्तच घाबरले आणि मग त्या सर्वांनी तिथून पळ काढला.


 मग अबोली त्यांच्या जवळ आली. ती खुपच घाबरलेली होती.अंग थरथरत होते. पण तरीही ती दोन्ही हात जोडत म्हणाली,

”खूप खूप धन्यवाद  तुम्हा दोघांचे. तुम्ही नसता तर…? आज माझा कॉलेजचा पहिलाच दिवस आहे.”


“होऽ का, त्या मुळेच ही भुतं ऊतू आली होती तर. काही हरकत नाही.फक्त असं घाबरू नको.मी माझ्या इतरही मित्रांना सांगुन ठेवतो.आता तर ती त्रास देणार नाहीतच पण जर दिलाच तर..” आपले धुळीचे हात झटकतच नीरज म्हणाला.


“हो, मला हा प्रकार नवीनच आहे.तुम्ही दोघेही याच काॅलेजचे स्टुडंट्स आहात का?”अबोलीने तीच्या मनातील शंका व्यक्त केली.

“हो आम्ही दोघेही याच काॅलेजचे स्टुडंट्स आहोत फायनलचे.मी नीरज आणि हा सुबोध.तुझा परिचय?” नीरजने  तीला विचारले.

“मी अबोली.”

“ठीक आहे.चल तुला तिथपर्यंत सोडतो.” 

असं म्हणत नीरजने तिला काॅलेजच्या आवारात सोडले.


परत तिला या गोष्टीचा एकदा दोनदा थोडा त्रास झाला.पण  मग मैत्रिणी सोबत असायच्या त्यामुळे काही नाही वाटले.


नीरज मात्र आठवड्यातून एकदा तरी अवश्य भेटायचाच.मग तेव्हा काही प्राब्लेम असतील तर ही त्याच्याशी शेअर करायची. मग तोही हिला हेल्प करून तो प्राब्लेम साॅल्व्ह करत असे.याचे कारण म्हणजे हे दोघेही एकाच तालुक्यातील होते.दिपावलीच्या सुट्टीत दोघेही बरोबरच गावी आले.


नंतरही नीरज तीच्या साठी अडीअडचणीला नेहमीच उभा राहायचा.



वर्ष संपले आणि नीरजचे तेथील शिक्षण ही पुर्ण झाले. या एका वर्षात अबोली चांगलीच कॉलेजमध्ये रुळली होती. तिच्या छान मैत्रिणीही झाल्या होत्या. नीरज शेवटच्या सेमिस्टर चे पेपर देऊन गावी निघून गेला.मात्र त्यानंतर अबोली त्याला मिस करू लागली.

पण  तेथील शिक्षण संपले  तरी आठवड्यातून एकदा नीरज तीला फोन करत होता.


 तोही पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला.

पण तरीही तो रविवारी वेळ काढून तीला फोन करतच होता.आणि अडचण येत असेल तर ती सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा. प्रसंगी तीला समजावून ही सांगायचा.याच कारणांमुळे ती तीच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडली होती.

तो दीसायला साधा सिंपल होता, पण रूबाबदार होता.हुशार होता. त्याला एम.बी.बी.एस.करायचे होते पण.. नंबर नाही लागला आणि मग मेडिसीन च्या या लाईन कडे वळला.


मध्यंतरी कॉलेजमध्ये काही काम असल्याने तो आला, तेव्हा अबोलीला आवर्जून भेटला. या भेटीत तर तो तिला पूर्ण चेंज झालेला दिसला. तब्येत थोडी भरली होती. आधी शिरसडीत होता, पण आता छान पिळदार  दिसत  होता. 


काही दिवसांनी तेथील शिक्षण पूर्ण करून अबोली गावी परतली. तर वडिलांनी तिच्या लग्नाचा घाट घातला होता. हिच्या मनात तर नीरजने  घर केले होते. पण त्याच्या मनात नेमके काय होते? हे मात्र अबोलीला माहीत नव्हते. म्हणून कोणालाच काहीही सांगता येत नव्हते. 

पण नीरज विषयी तिने घरात सांगितलेले होते.

त्यांच्या वरच्या प्रेमाविषयी मात्र फक्त तीची रुम पार्टनर असलेली म्हणजेच वर्षा हीलाच माहिती होते.



*एक नाते असे अनोखे


*नाटखट कन्हैया



नीरज हा पण  शिक्षण संपवून गावी परतला.  तेव्हा त्याला कंपनीत नोकरीची ऑफर आलेली होती. आणि जॉइनिंग साठी तो काही दिवसातच बेंगलोरला जाणार होता. म्हणून त्याने अबोलीला भेटायचे ठरवले. रविवारी झालेल्या फोन मध्ये त्यांनी तसे सांगितले. 


ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेवर, अबोली तीच्या लहान भावाला घेऊन कॉफी शॉप मध्ये आली. तर नीरज तिची वाटच पाहत होता. “किती उशिर अबोली?” या त्याच्या प्रश्नाने ती दचकली.कारण ती त्याला बघण्यातच हरवली होती.खुप दिवसांनंतर ती त्याला प्रत्यक्ष पाहत होती.

“हो…”  तिला पुढे बोलूही न देता त्यानी विचारले.

“काय मग मॅडम, पेपर छान गेले ना.”

“हो छान गेलेत.”अबोली.

नीरज ने असे विचारताच तिचे मन कॉलेजमध्ये पोहोचले. आणि नीरजने केलेल्या पहिल्याच दिवशीच्या मदती पासुन तिला बर्याच अशा गोष्टी एका क्षणात नजरे समोरून गेल्या.यामुळे लगेच ती म्हणाली,

“तुम्ही सुरुवातीला मला खूप खूप मदत केली. सुरुवातीलाच नाही तर वेळोवेळी माझ्यासाठी तुम्ही मदतीचा हात दिला.खूप खूप आभारी आहे मी तुमची.”

“ए तुला आज असं काय झालं आहे? का असे बोलते आहेस?” अबोलीचे बोलणे ऐकून नीरज थोडासा रागवला.


“मला त्यावेळी जे योग्य वाटले ते मी केले. मी तुला काहीतरी सांगायचे म्हणून भेटायला आलो आहे.”

तो असं म्हणाल्यावर अबोलीच्या मनाला छान फुलपंखी गुदगुल्या झाल्या. की आता हा काय सांगणार आहे? तिचे कान ते ऐकण्यासाठी आतुर झाले होते. जर यानी माझ्या मनातले ओळखले असेल तर ठीकच आहे.

 इतक्यात कॉफी आली, आणि काॅफी पीत पीत तो पुढे म्हणाला,” बरं तू पुढे शिकणार आहेस का? काही मदत लागली तर सांग. करेन मी.” नीरजनी विचारले.

 “सध्या तरी विचार नाही. बाबा लग्नाचे पाहत आहेत तेव्हा…”

“ठीक आहे, मला जॉब लागलेला आहे. आणि त्यासाठी मला बेंगलोरला जायचे आहे. तर येथील आठ दिवसानंतर जॉइनिंग आहे. काही दिवसातच मी तिकडे जाणार आहे. त्यामुळे आता आपली परत भेट कधी होईल? सांगता येत नाही.” असं म्हणत त्यांनी मोबाईल मध्ये टाईम बघितला.

“आणि चला मला उशीर होतो आहे. परत आल्यावर भेटण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नाहीतर आपला रविवार आहेच ठरलेला. आणि जर वेळ नाहीच मिळाला तर मेसेज नक्कीच करेन.”

अबोलीला मात्र त्याच्या कडुन वेगळंच काहीतरी ऐकायचे होते आणि हे ऐकल्यावर निराशा तीच्या चेहऱ्यावर  स्पष्ट  जाणवत होती. तरीही तीने ते न दाखवता,”ok असं म्हणाली.

“बरं निघु मी?”असं म्हणत तो उठून चालु ही लागला.


 हे सर्व पाहून ती मात्र स्वतःला कोसळत  राहीली.” की अबोली, तू काहीही विचार करतेस, हे असं काहीही होणार नाही. पण दुसरं मन सांगत होतं,तू तरी कुठे  त्याला सांगितलं की तुझे प्रेम आहे म्हणून.. कदाचित त्याचे ही असेच असेल तर.. विनाकारण त्याने मैत्री टीकवली आहे का? हेही बरोबरच आहे.ती असाच विचार करत राहिली.



तो त्याच्या जाॅब साठी बेंगलोरला निघुन गेला.

रविवारी मात्र फोन करायला तो विसरत नव्हता.


असेच काही दिवसांनंतर,

त्याचा रविवारी फोन आला.तर हिने उचललाच नाही.तीन चार मिस कॉल झाले.

मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने फोन केला.

आज मात्र तीने फोन घेतला.

“काल कुठे होतात मॅडम?”

“इथेच होते.”तीने सांगितले.

“मग फोन का नाही उचलला.?”त्याचा प्रश्न.

“हो ते..     “

“काही कार्यक्रम होता का?”

“हो, ते पाहुणे आलेले होते.मला बघण्या करिता.”तीने जरा घुश्शातच  सांगितले.


पुढील भागात नक्की काय होईल?

होईल का अबोलीचे लग्न त्या पहायला आलेल्या मुला बरोबर…

 नक्कीच वाचा पण पुढील भागात..

(ही कथा पुर्ण पणे काल्पनिक आहे 🙏)

@सौ.शुभांगी सुहास जुजगर.


*राधा ही बावरी..भाग दोन  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या