फॉलोअर

राधा ही बावरी..भाग तीन

राधा ही बावरी ..भाग तीन 


Source:pinterest

मागील भागात…



आईकडचे आणि वडिलांकडचे नातेवाईक येऊन भेटून जात होते. पण मदतीसाठी  कुणीही थांबत नव्हते.त्या सर्वांनी देखील लग्नाची तयारी केलेली होतीपण…

 मात्र अबोलीची आत्या म्हणजेच मनीषाताईंच्या ननंद बाई या तर परत जायचे नाहीच म्हणाल्या.”भाऊला बरं झालेलं बघीन, आणि नंतरच मी तिकडे येईल.” असं नवऱ्याला त्यांनी ठणकावून सांगितली होते.

 अनेकांचे लग्ना विषयीचे निरनिराळे सूर निघू लागले.

*****

आता पुढील भाग 

काही दिवसातच सगळं सुरळीत झालं. पण पूर्वीची चपळता अबोलीच्या बाबांमध्ये राहीली नाही. बोलतानाही थोडेसे अडखळत अडखळत शब्दोच्चार ते करत होते.

त्यांनाही या आलेल्या आजारपणामुळे खूपच वाईट वाटत होते. त्यात लेकीचे ठरलेले लग्नही होऊ शकले नाही. त्याबद्दलही त्यांना खूपच खंत वाटत होती. पण कुठल्याच गोष्टी हातात नसतात.अशी मनाची समजुत घालत होते.अबोलीच्या सासरकडची मंडळी  भेटायला आली. त्यांनाही या सगळ्या कारणाने खूपच त्रास झाला होता. कारण त्यांनीही लग्नाच्या दृष्टीने सर्वच तयारी केलेली होती. आणि हे असे..

मुलगा मात्र एकदाच येऊन भेटून गेला.


‘तूर्तास तरी लग्नाचे काहीच बोलायचे नाही’ असंच अबोलीच्या बाबांनी ठरवले होते. 

अबोलीचे बाबा घरी आल्यावर सुद्धा नीरज येऊन भेटून गेला. आणि दररोज न चुकता फोन करून चौकशीही करत होता.


एक महिन्यानंतर..


आता बाबांना चांगलं बोलता येत होते. पण तरीही कुठे कुठे ते अडखळत आणि अस्पष्ट उच्चार होत होते.त्यांचा रागीट स्वभाव पण फार शांत झाला होता. चिडचिडही खूप कमी झाली होती. शिवाय शरीरातील तापटपणाही कमी झालेला होता. 


अबोलीचे जॉब साठी प्रयत्न चालू होते. तिचे इंटरव्ह्यू  ती ठरवत होती. पण लग्नाच्या या गडबडीमुळे ती थांबली होती.

आणि आता काय करावे? तिलाही काही कळेना. 

पण वडिलांनी तिला सांगितले,

”तुझे तू इंटरव्यू देत रहा. आता लग्नाची काळजी करू नको.” असं तिच्या  डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले.

 

अचानक आयुष्यात आलेल्या या प्रसंगाने त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. मुली विषयी असलेले त्यांचे मत बदलले होते. त्यांना तात्काळ दवाखान्यात आणून लगेच उपचार चालू करण्यासाठी तिने केलेली धावपळ,  त्यांनी पाहिली होती. शिवाय तिची आई त्यांच्यापासून म्हणजे दवाखान्यातुन आजिबात हललीच नव्हती. त्यामुळे मेडिसिन आणणे, घरचेही सगळे पाहणे, शिवाय येणारे, जाणारे असे सगळेच अबोलीने भावाच्या मदतीने पाहिले होते.


 डॉक्टरांनाही वेळोवेळी भेटून त्यांच्याकडून योग्य इन्स्ट्रक्शन ती घेत होती. पण तरीही त्यांच्या तब्येतीत हवी ती सुधारणा होत नव्हती.

 मनीषा बाईने छोट्या दिरांना फोन केला,”या म्हणून.”

 पण ते नुसतेच येऊन भेटून गेले. त्यांना भाऊ म्हणजेच अबोलीला मामाही नव्हता.

त्यामुळे सगळी जबाबदारी या दोघीवरच पडली होती.

बायकोची होणारी घालमेल. बेडवर पडुन ते पाहात होते.त्यात अबोलीचीही होणारी ओढाताण बघुन ते आतल्या आत दुःखी होत होते.आपल्या या दुखण्याने पोरीचे लग्नही लांबवावे लागले आहे.ही टोचणी मात्र आयुष्य भर टोचत राहणार होती.


नीरजचा रात्री तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन आला.

”हं कशी आहे बाबा तब्येत आता?”त्याने विचारले.

“हो,आता खुपच बरे वाटत आहे मला.खुप प्रयत्न केले आहेत तु माझ्यासाठी.तुझे आभार कसे मानु तेच कळत नाही.एकदा घरी ये ना मला भेटायला.”  हे बोलताना थोडंसं त्यांना भरून आलं होतं.कोण, कोठला हा मुलगा? पण आपल्या साठी वेळेवर धावत आला.अजुनही काळजी करतो आहे. आणि आपली सगळी नाती…?

“ठीक आहे,येईन शनिवारी म्हणजेच सुटीच्या दिवशी.”असे त्याने सांगितले.


अबोली च्या आईने आधी म्हणजेच अबोलीचे लग्न ठरण्याआधी नवऱ्याला, नीरज विषयी सर्व सांगितले होते. परंतु त्यांना हे असं काही मान्य नव्हते.

त्यांना त्यांच्या नात्यातील मुलगा आवडला होता.आणि तोच जावई म्हणुन पसंत होता.त्यामुळे नीरज विषयी ते काही ऐकुन घ्यायलाच तयार नव्हते.


*गोष्ट किरणची



विकेंडला  म्हणजेच शनिवारी नीरज भेटायला आला.येताना बास्केटभर फ्रुटस् त्याने आणले.

तो आल्यावर भरपुर गप्पा झाल्या.त्याच्यासाठी स्पेशल नाष्टा मनीषाबाईने बनवला होता. 


नाश्ता झाला की लगेच तो जायला निघाला. अबोलीला मात्र त्याच्याशी खूप खूप बोलायचे होते. पण .. 

निघताना बाबा त्याला म्हणाले,”तुझी  खुपच  मदत झाली आहे बघ.कर्ता पुरूष जर आजारी पडला तर सगळे घरच आजारी पडल्या सारखे होते. मला वाटत होते उठून पटकन हे करावे, किंवा ते करावे.. पण जमत नव्हते.”

असं म्हणताना त्यांचे डोळे पुन्हा भरून आले. 

“अरे अरेऽ असं काय? माझ्या बाबांसाठी मी हे केलेच असते ना. माझे काय आणि अबोलीचे काय? मला काही नाही वाटत.अशा  परिस्थितीत  मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. त्यात गैर काहीच नाही.”

असं नकारार्थी मान हलवत नीरज म्हणाला. यावर अबोलीचे बाबा म्हणाले,

“आता माझ्यासाठी आणखी एक करशील?” बाबांचा निरजला प्रश्न. 

“हा बोला ना? शक्य असेल तर नक्कीच करेन.”असं तो विश्वासाने म्हणाला.

“माझ्या अबोलीचा हात मी तुझ्या हातात देऊ इच्छितो.म्हणजेच तीच्याशी लग्न करशील?”

बाबांचा हा प्रश्न ऐकून नीरज सहित घरातील सगळेच अवाक् होऊन, त्यांच्या कडे बघु लागले. अबोलीचा तर स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. नीरजही हे ऐकून क्षणभर  गोंधळलाच. कारण हे सर्वांना खूपच अनपेक्षित असं होतं.

कारण तिचं लग्न ठरलेलं होतं. नुसतं ठरलेलं नाही. तर लग्नाची तारीख ही यांच्या आजारपणामुळे लांबवावी लागली होती. शिवाय मुलगा ही चांगल्या पोस्टवर होता. ‘हो  होता’ पण त्याला आपल्या माणसासाठी वेळ नव्हता. आणि हेच कारण जाणुन,अबोलीच्या बाबांनी त्यांचा विचार बदललेला होता. लग्न नुसतेच ठरलेले होते. परंतु कुठलाही विधी अजून झालेला नव्हता. साखरपुडा ही हळदीच्या आधी होणार होता.

काही गोष्टी वेळीच सुधारल्या पाहिजे. अन् वेळ निघुन  गेली तर तीची गाठ बनते, आणि मग ती आयुष्यभर टोचत राहते.अगदीअसेच कहिसे  त्यांना वाटले म्हणून…


या अशा वेळी  हळुच नीरजने अबोलीच्या चेहर्या कडे बघीतले,तर तेव्हा तीच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वाहत असलेला दिसला.दुसर्याच क्षणी तीचे ही नीरज कडे लक्ष गेले.त्याच्या कडे बघताना तीच्या नजरेत होकार आणि लाज असे दोन्हीही त्याला जाणवले.

अबोली त्यालाही आवडत होती. पण कधी बोलुन दाखवण्याचा धीरच झाला नाही.

सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन तो म्हणाला,”कसं शक्य आहे हे?तीचे तर लग्न ठरलेले आहे अन्..?


बोलण्याची ही संधी अबोलीने हेरली आणि ती लगेच म्हणाली,”मला नाही करायचे त्या चष्मीश सोबत लग्न.”

हे वाक्य ऐकून नीरज  तीच्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला,”म्हणजे तुला हे लग्न मान्य नव्हते का?”

“कसं मान्य असेल,कारण तीचं प्रेम तर तुमच्या वर आहे ना?”अमोल एकदमच बोलुन गेला.पण लगेच त्याने आपले दोन्ही हात तोंडावर ठेवले.

“ये तू गप्प बस रे.” अबोली त्याला दटावत म्हणाली.

अमोलचे बोलणे ऐकून नीरज लाही लाजल्या सारखे झाले.

‘जे आपल्याला जमले नाही, तेच अबोलीलाही जमले नाही.ओ गाॅड.’’असं  मनातल्या मनात म्हणत त्याने वर बघितले.

“आई बाबांना विचारून सांगतो “असं तो म्हणाला.

आणि तो निघुन गेला.


******

नीरज ने घरी आल्यावर, तिकडे झालेले सगळे वडिलांना सांगितले.तर हे ऐकल्यावर ते फारच खुष झाले.आणि ते म्हणाले,


”तुझ्यावर जर तिचे मनापासून प्रेम असेल, तर मला आनंदच आहे. त्यामुळे तुझ्या बाबतीत मी चिंतामुक्त होईल. नीलिमालाही मी ताईच्या घरी दिल्यामुळे, तिच्या बाबतीत ही निश्चिंत झालो आहे. कारण ताई मुळे तिला आईची उणीव कधीच भासणार नाही. आणि आता तू ही  म्हणतो आहेस की, ही माझी खूपच बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे माझी आता काळजीच मिटली बघ.” नीरजचा हात हातात घेऊन दिलीपराव म्हणजेच त्याचे वडील म्हणाले. 



बाबांनी या लग्नाला संमती दिल्याबद्दल त्यालाही आनंद झाला होता. “तुम्ही तयार आहात बाबा? माझ्या या लग्नाला तुमची काहीच हरकत नाही?” पुन्हा खात्री करून घेण्यासाठी नीरजनेही बाबांना विचारले.


 

“नाही बेटा, जीवनात योग्य जोडीदार मिळणे, याला भाग्यच लागते. आणि ते तुला लाभलं आहे. नाहीतर आमचं तुझी आई गेल्यापासून नुसतेच अडखळत अडखळत जगणं सुरू आहे. फक्त तुम्हा दोघांचे आयुष्य हे  व्यवस्थित मार्गाला लागलेले बघीतले की…” खंतावलेल्या सुरात बाबा म्हणाले.


काय होणार आहे पुढे? नक्कीच वाचा.

@सौ शुभांगी सुहास जुजगर.



*राधा ही बावरी.. भाग दोन





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या