फॉलोअर

राधा ही बावरी..भाग पाच (अंतिम)

राधा ही बावरी..भाग पाच (अंतिम) 




मागील भागात आपण वाचले..
की अबोलीच्या बाबांनी नीरजला अबोलीची लग्ना संबंधी विचारले…पुढे


लग्ना साठी तयार झालेली अबोली खूपच सुंदर दिसत होती. डार्क राणी कलरचा शालू त्यावर सोनेरी शेला तिच्या खांद्यावर विसावला होता. आणि हातात हिरवा चुडा, त्यामध्ये सोनेरी मोठे कंगन आणि मध्ये मध्ये बारीक बारीक सोनेरी बांगड्या तीने घातल्या होत्या.
हातावर कोपरा पर्यंत काढलेली सुबक मेहेंदी, आणि मेहेंदीने एका हातावर काढलेले नीरज चे नाव, अगदीच सुंदर दिसत होते.अन् हे रंगलेले हात तीच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते.

तीने केलेला लग्नासाठीचा मेकअप,सोबर अशी हेअर स्टाईल मोगर्याच्या गजर्यानी खुपच छान दिसत होती.आणि साजेसा असा दागिन्यांचा साज तीने घातला होता.
विशेष म्हणजे तीच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते.डोळ्यामध्ये हळुवार लज्जा अन् त्यातही एक नवे स्वप्न होते.आताची तीची ही स्थिती म्हणजेच ती अवघ्या काही वेळातच तीच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली होती.दोघांमध्ये असलेले प्रेम आणि मैत्री यांच्या विश्वासावर तीने हे पाऊल उचलले होते.

तर नीरज ही अतिशय सुंदर लुक मध्ये तयार झाला होता. त्यामुळे तो अतिशय देखणा आणि राजबिंडा दिसत होता.त्याने पारंपरिक शेरवानी परिधान केली होती. जी सोनेरी कलरची होती.अन् त्यावर लाल रंगात सुंदर असे नक्षीकाम केलेले खुपचं छान दिसत होते.आणि त्याच्या व्यक्तीमत्वात यामुळे अधिकच भर पडली होती.
डोक्यावर सुंदर फेटा त्याने बांधला होता.
त्याला छान असा मोत्यांचा साजही होता.
त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती.
आयुष्याच्या या नवीन टप्प्यात प्रवेश करण्यासाठी तो तयार झाला होता. एक प्रकारचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
आजपर्यंत अबोली त्याची एक छान मैत्रीण होती.पण आता तीच काही वेळा नंतर त्यांची लाईफ पार्टनर होणार होती.यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.असा तो आरशात बघून स्वतःच्याच तंद्रीत असताना त्याला बाहेरून कोणी तरी ‘आवरले आहे का?’
असा प्रश्न विचारला.तसा तो तंद्रीतून जागा झाला.


 मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात प्रसन्न करणारी अशी ‘सुस्वागतम’ ची संस्कार भारतीची रांगोळी काढलेली होती. प्रवेशद्वारावर सुंदर फुलांनी आणि तोरणांनी सजवलेली कमान, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि काही ठिकाणी झळकणारे सोनेरी झुंबर ही होते. मंडपात प्रवेश करताच पहिला प्रभाव पडतो तो फुलांच्या गंधाचा, जो परिसरात एक प्रसन्नता निर्माण करत होता..

संपूर्ण मंडप विविध प्रकारच्या लाईट्सनी उजळलेला असतो, ज्यामुळे एक स्वप्नवत वातावरण निर्माण झाले होते. 

वधु-वर चालताना मंडपातले लोक आनंदाने त्यांच्याकडे बघत होते, काही फोटोही काढत होते.मंडपातले दिवे त्यांच्या वाटेवर चमकत होते, आणि फुलांच्या माळांनी डेकोरेट केलेल्या त्या वाटेवरून हे नवरी नवरदेव चालले होते.

वधूच्या बाजूने तिचे काही नातेवाईक आणि मैत्रिणी तिच्या सोबत होत्या, तर वराच्या बाजूने त्याच्या दोन्ही बहिणी, त्याचे मित्रही होते.

सगळ्यांचे चेहेरे आनंदाने उजळलेले होते, आणि हसण्याचा, गप्पांचा, आणि आनंदी आवाजाने मंडप हा भरलेला आहे..
वधुवराच्या प्रत्येक पावलावर त्यांच्या वर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
याबरोबरच सनईचे मंजुळ स्वर वातावरणात एक प्रसन्नता भरत होते.

 वधू ही पारंपरिक साडी म्हणजेच शालु मध्ये म्हणजे साडीमध्ये शोभून दिसत होती, तर वर पारंपरिक शेरवानीमध्ये राजस दिसत होता. वधू-वराच्या चेहऱ्यावर आनंद, लज्जा, आणि अपेक्षांचे भाव स्पष्ट होते.
मंगलाष्टकांनी समारंभ अधिक भारावून गेला होता.



विवाहाचे सर्व विधी पारंपारिक पद्धतीने पार पाडले जात होते—कन्यादान, सप्तपदी, इ. मंडपाच्या मध्यभागी अग्नी प्रज्वलित करण्यात आला होता, जो विवाहाच्या पवित्रतेचे प्रतीक होता. त्यानंतर सप्तपदी पंडितांच्या मंत्रोच्चारात पार पडली.

 
सप्तपदीच्या वेळी वधु-वर एकमेकांच्या हातात हात धरून, जीवनभरासाठी एकत्र राहण्याच्या वचनांची देवाणघेवाण करत होते. कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव करीत होते.

हा लग्नाचा विधी पार पडत असताना मात्र मनिषाताईंना गलबलुन येत होते.
तर आपल्या लाडक्या मुलीला योग्य जोडीदार मिळाला याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.


  गृहप्रवेशासाठी नवदाम्पत्य दाराबाहेर उभे होते.बाहेरच्य गेट पासुन घराच्या दरवाजापर्यंत या दोघांच्या वाटेवर फुले अंथरूण, त्यांचे स्वागत केले होते.
निलिमाने छान डेकोरेट केलेल्या मापात तांदूळ भरून घेता घेताच तिने आईला सांगितले, “आई तिथे किचन ओट्यावर ओवाळण्यासाठीचे ताट करून ठेवले आहे.तू पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन जा. तोवर मी हे ताट घेऊन येतेच”

तोपर्यंत आईने म्हणजेच मीनाताईंनी भाकर पाणी ओवाळून दूर टाकले. आणि नंतर त्या दोघांचे पाच सवाष्णींनी औक्षण करून ओवाळले.
त्यानंतर निलिमाने त्यांची घरात येण्याची वाट अडवली.तीच्या प्रश्नांची उत्तरे देत दोघांनी उखाणे घेतले.
आधी नीरजला उखाणा घ्यायला लावला.तर त्याने नुसतेच,’अबोली’ असंच म्हटले.’मला असं काही येत नाही’ वर असं म्हणाला.
मग सगळ्या जणी अबोलीला म्हणाल्या, “घ्या आता तुम्ही वहीनी.”
त्यावर तीने नीरज कडे बघीतले. 
“घरासमोर अंगण, अंगणात वृंदावन,
वृंदावनात डोलते तुळस.
तुळशीला लावते दिवा,
नीरज रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी मिळावा.”
“व्वा व्वा “असं म्हणत मग निलिमाने माप ओलांडण्यासाठी हातानेच सांगितले.

 त्यानंतर अबोलीने हळूच उजव्या पायाचा स्पर्श, त्या मापाला करून तीन तिने गृहप्रवेश केला. हे सर्व होईपर्यंत रूपालीने कुंकवाचे पाणी असलेले ताट आणून ठेवले. मग अबोलीने त्या ताटात आपले दोन्ही पाय ठेवून, मग त्या पावलांनी घरात प्रवेश केला, अगदी लक्ष्मीच्या पावलांनी. 
घरात आल्यानंतर प्रथम या दोघांनी देवघरा पुढे येऊन, देवाला नमस्कार केला. आणि प्रार्थना केली,” हे देवा, आमच्यावर तुझा सदैव कृपाशीर्वाद असू दे.” अशी प्रार्थना करताना दोघांनी एकमेकाकडे पाहिले. आणि पुन्हा देवाला नमस्कार केला.
 त्यानंतर त्यांनी नीरजचीआई म्हणजेच देविकाच्या फोटो ला हात जोडत नमस्कार केला.त्यानंतर आजीच्या फोटोलाही नमस्कार केला. 

मग सगळे घरातील वयस्कर व्यक्ती म्हणजेच आत्या, मामा यांचेही आशिर्वाद घेतले.आई बाबांचे नीरज आणि अबोली आशिर्वाद घेण्यासाठी वाकले असता, बाबांचे डोळे भरून आले, आणि त्यांनी कोणताही आशीर्वाद न देताच नुसतेच दोघांच्याही डोक्यावर हात ठेवले.


 गेल्या काही दिवसापासून, नीरजच्या प्रेमाचा गंध तिच्या मनात दरवळत होता. नीरज या एकाच नावाभोवती तिने स्वतःला खीळवून ठेवले होते.
 दिसायला तर तो छानच होताच. पण त्याचे बोलणे, समोरच्याला समजून घेणे, समजून सांगणे, यात एक वेगळेच स्किल त्याच्या कडे होते. यामुळे ती कधी त्याच्या प्रेमात पडली? हे तिचे तिलाच कळले नाही. तिचा विश्वास बसत नव्हता की, ‘त्याच नीरजने आज आपल्या गळ्यात हे मंगळसूत्र घातले आहे.’गळ्यातले मंगळसूत्र हातात घेऊन तीचं असं हे विचार चक्र सुरू होते.
तर दुसरे मन नीरजच्या बाहुपाशात विसावण्यासाठी अधीर झाले होते.


नीरज ची रूम ही राजने आणि निलिमाच्या नवर्याने पुढाकार घेऊन खुप सुंदर सजवुन घेतली.हार्ट शेपचे फुगे पुर्ण रूम मध्ये लावले होते. मध्ये फुलांच्या माळा ही सोडलेल्या होत्या. तसेच बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप काढून, बाजूला मोगऱ्याची फुले पसरलेली होती. बेडच्या बाजूलाच टेबलवर मंद तेवत असणारी एक समई ठेवली होती. आणि एक छानसा मंद मंद सुवास रूममध्ये दरवळत होता. 

अबोलीला यासाठी छान तयार केले होते. ती अतिशय सुंदर दिसत होती. पिस्ता कलरची डार्क गुलाबी काठांची साडी तिने घातली होती. त्यावर कुंदन वर्क केलेले होते. आणि थोडासा मेकअपही तीने केला होता. डोळ्यामध्ये काजळ, हलक्या कलरचे आयलाईन तीने रेखली होती.कपाळावर छोटीशी टिकली,
केसांमध्ये मोगर्याचे गजरे, हातावरच्या मेंदीचा रंगही खुपच डार्क झाला होता.




असं तयार होऊन तिने नीरजच्या रूममध्ये प्रवेश केला. तेव्हा तिच्या पैंजणांच्या आवाजाने नीरजचे लक्ष वेधून घेतले.
 तिच्या डोळ्यात हलकीशी लाज अन् चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.
तिने आणलेला केशरी दुधाचा ग्लास टेबलवर ठेवला. आणि ती नीरज जिथे उभा होता तिथे गेली.
 तेव्हा नीरजने आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवत म्हटले,” खूप खूप स्वागत आहे तुमचे महाराणी, माझ्या या राजमहालामध्ये.” 

“धन्यवाद राजेसाहेब, या दासीला महाराणी केल्याबद्दल.” असं अबोली मुजरा करत म्हणाली.
 आणि दोघेही मोठ्याने हसू लागले. मग नीरजने तीचा हात हाती घेऊन तिच्या डोळ्यात पाहिले. तर त्याला दिसली त्याचीही राधा, गेल्या कित्येक दिवसापासून त्याच्यावर प्रेम करत होती, पण अव्यक्त. आज या श्रीरंगाच्या प्रीत स्पर्शाने ते प्रेम परिपूर्ण होणार होते. खुलणार होते. 
“इतकं प्रेम करत होती, आणि कधीच एका शब्दाने देखील सांगितले नाही?”नीरज.
हे ऐकताना अबोली आपलाच पदर हातात घेऊन त्यांच्या गोंड्यांशी चाळा करत म्हणाली,”आधी आई बाबांना सांगितले,पण बाबांनी ऐकलेच नाही.”
“मग मला नाही सांगावे वाटले?माझा फोन येत होता ना?”नीरज जरा रागातच बोलला.
“नाही माझी ……..!”अबोली.
तीला पुढे बोलवेना.

कहि वेळ गप्प राहुन ती म्हणाली,“पण आत्ता आपण एकत्र आहोत ना.”
तीचे हे ऐकून तोही निवळला. आणि त्याने मग तीला आपल्या बाहुपाशात घेतले. मग तीही सर्व विसरून तीथे एकरूप झाली.
             समाप्त.
(ही कथा संपुर्णपणे काल्पनिक आहे)
@सौ.शुभांगी जुजगर.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या